एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, EKNATH SHINDE OFFICE

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. शासकीय महापूजेनंतर या जोडप्याचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान करण्यात आला.

आषाढी एकादशी महापूजा

फोटो स्रोत, Eknath shinde office

एकनाथ शिंदे शनिवारी (9 जुलै) रात्री उशिरा पंढरपूरला पोहचले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहाने आयोजित केलेल्या पर्यावरणाची वारी या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, EKNATH SHINDE OFFICE

"यंदा राज्यभरात चांगल्या पावसाला सुरुवात झालेली असल्याने सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या आहेत. काहीसा उशिरा का होईना पण राज्यातील शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत. तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत." ही मागणी पांडुरंगाकडे केली असल्याचं ते म्हणाले.

तसंच पंढरपूर शहराचा विकास तिरुपतीच्या धर्तीवर करण्यासाठी प्रारुप आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

दरम्यान, एकनाथ शिंदे आज दिवसभर पंढरपूर परिसरात विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री बनल्यानंतर महाराष्ट्रात हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)