वर्धा येथे होणार 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

फोटो स्रोत, Dekdoyjaidee/Getty Images
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे. तशी घोषणा महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
उदगीर येथे एप्रिल 2022 मध्ये पार पडलेल्या 95 व्या मराठी साहित्य संमेलनानंतर आता पुढील संमेलन कुठे होणार याबद्दल साहित्य वर्तुळात उत्सूकता निर्माण झाली होती.
विदर्भ साहित्य संघाचे यावर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे 96 वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्ती केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचविले होते.
या संदर्भात माहिती देताना उषा तांबे म्हणाल्या की, "महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी वर्धेला भेट दिली. तेथील मैदाने, वाहनतळ, पुस्तक प्रदर्शनांचे स्थळ आणि निवास व्यवस्था यांची पाहणी केली.
"96 व्या अखिल भारतीय संमेलनासाठी वर्धा हे स्थळ योग्य असल्याचा अहवाल स्थळ निवड समितीने रविवारी विदर्भ साहित्य संघात झालेल्या बैठकीत दिला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे."
हे संमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








