'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं पोस्टर रिलीज, रणदीप हुड्डाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

फोटो स्रोत, Press Eye
महेश मांजरेकर दिग्दर्शन करत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपटाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारत आहे. सोशल मीडियावर रणदीपच्या लूकवर बरीच चर्चा पाहायला मिळते आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त रणदीप हुड्डा याचा पहिला लूक लाँच करण्यात आला आहे. या पोस्टरवर 'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है' असे लिहिले आहे. या चित्रपटाचं शूटिंग ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे.
गेल्या वर्षी सावरकरांच्या 138व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केली होती. त्यानंतर आता वर्षभराने म्हणजेच आज 28 मे रोजी विनायक दामोदर सावरकर यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त सावरकरांचा पहिला लूक लाँच करण्यात आला आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे.
"जेव्हा हर्षद मेहता, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांचे चित्रपट ट्रेंडमध्ये असताना मला वीर सावरकरांच्या जीवनाची कथा सांगण्यात जास्त रस वाटला. कारण ते भारताचे पहिले डायनॅमिक हिरो होते. 1947 मधील फाळणी वाचवायला मदत करणारे एकमेव वीरपुरुष होते. या चित्रपटाद्वारे मला, केवळ एक चित्रपट निर्माता म्हणून नव्हे, तर एक भारतीय म्हणून, सावरकरांच्या संघर्षाची वस्तुस्थिती जगाला सांगायची आहे."
"स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा धाडसी लढा, इंग्रजांना घाबरवणारे त्यांचे निर्भीड व्यक्तिमत्त्व आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची हिंदुत्वासाठी असलेली बांधिलकी खूप प्रेरणादायी आहे. सर्वांनी गैरसमज करून घेतलेल्या या हिरोला आपल्याला आता समजून घेण्याची वेळ आली आहे. त्यांना जे हवं होतं ते त्यांना कधीच मिळालं नाही आणि म्हणूनच सावरकरांना भारतरत्न आणि नोबेल पारितोषिक दिलं जावं अस मी निवेदन करतो", असेही संदीप सिंग म्हणाले.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
"लोकांच्या मनात सावरकरांबद्दल वेगवेगळे आवृत्त्या असू शकतात, पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटातील सावरकरांच्या व्यक्तिरेखेपेक्षा काही फरक पडणार नाही. सावरकर वास्तविक जीवनात होते. ते प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक होते आणि आम्ही हे सुनिश्चित करू की त्यांना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही", असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले.
अभिनेता रणदीप हुड्डा यांनी याबाबत बोलताना म्हटले की "भारताच्या स्वातंत्र्य आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वात उंच नायकांपैकी एकाला हा सलाम आहे. मला आशा आहे की मी एका खऱ्या क्रांतिकारकाचे योगदानाचे आव्हान पेलू शकेन आणि इतक्या दिवसांपासून दडून राहिलेली त्याची खरी कहाणी जनतेला सांगू शकेन."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी पेलली आहे.
याआधी वेद राही यांनी सावरकरांवरील चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 2001 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुधीर फडके यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. त्या चित्रपटात शैलेंद्र गौर यांनी सावरकरांची भूमिका केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








