हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला रामराम, राहुल गांधींवर केली टीका

हार्दिक पटेल

फोटो स्रोत, Getty Images

गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवर त्यांनी राजीनामापत्र टाकलं आहे.

मी अतिशय हिमतीने काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला विश्वास आहे की माझा प्रत्येक सहकारी आणि गुजरातची जनता या निर्णयाचं स्वागत करेल.

हे पाऊल उचलल्यानंतर मी काही सकारात्मक कार्य करू शकेन असा मला विश्वास वाटतो, असं ते म्हणाले.

राजीनामा पत्रात काय म्हटलं आहे?

हार्दिक पटेल म्हणतात, "गेल्या तीन वर्षांत मला असं लक्षात आलं आहे की काँग्रेस पक्ष फक्त विरोधाचं राजकारण करत आहे. मात्र लोकांना फक्त विरोधक नाही तर एक सक्षम पर्याय हवा आहे. अयोध्येत रामाचं मंदिर असो, CAA-NRC असो किंवा जम्मू काश्मीरचा मुद्दा असो देशाला या समस्येचं निराकरण हवं होतं. काँग्रेस पक्ष यात फक्त अडवणूक करत होता.

गुजरात असो किंवा पटेल समाज असो काँग्रेसची भूमिका फक्त विरोधकाची होती. जनतेच्या भविष्यासाठी कोणताही रोडमॅप तयार न केल्यामुळे प्रत्येक राज्यात जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"काँग्रेसच्या नेत्यांना असलेलं गांभीर्य हाही एक मोठा मुद्दा आहे. मी काँग्रेसच्या समस्या घेऊन जेव्हाही ज्येष्ठ नेत्यांना भेटलो तेव्हा त्यांचं लक्ष समस्यांपेक्षा मोबाईलवर जास्त होतं. जेव्हाही काँग्रेस नेतृत्वाची सर्वांत जास्त गरज होती तेव्हा आमचे नेते परदेशात होते. गुजरात आणि गुजराती लोकांचा द्वेष करण्याची त्यांची भूमिका होती. असा परिस्थितीत काँग्रेसचा लोक का म्हणून स्वीकार करतील?

आम्ही आमच्या गाडीने 500-600 किमी यात्रा करतो आणि जनतेत मिसळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आम्हाला लक्षात येतं की जनतेच्या मुद्द्यांपेक्षा दिल्लीच्या नेत्यांना त्यांचं चिकन सँडविच कसं मिळालं नाही याची चिंता त्यांना जास्त असते."

"काँग्रेस पक्षाने युवकांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाबरोबर यायची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे मी मोठ्या हिमतीने काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या या निर्णयाचा माझे सहकारी आणि जनता स्वागत करतील असा मला विश्वास आहे. जनतेने दिलेल्या प्रेमाचा मी कायम ऋणी राहीन."

हार्दिक पटेल 2019 पासून काँग्रेसमध्ये होते. त्याआधी पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)