निमरत कौर: सोशल मीडियावर महिलांना ट्रोल करणं सोपं असतं का?

फोटो स्रोत, Raindrop PR
- Author, सुशीला सिंग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मी सोशल मीडियावर क्लिवेज दाखवून फोटो टाकते. मी राजकारणावर बोलते. काँमेट वाचते तेव्हा लोक अस्वस्थ झाल्याचं मला स्पष्ट दिसतं. ही मुलगी असं कसं करू शकते असं त्यांना वाटतं." ख्याती श्री सांगत होती. ख्याती दिल्लीत राहते.
ती म्हणते, "जे लोक मला ट्रोल करतात त्यांना मी सडेतोड प्रत्युत्तर देते. मी माझ्या आईवडिलांना सुद्धा उलट उत्तरं देते मग मला कोणी ट्रोल केलं तर त्याला मी उत्तर का देऊ नये? या सगळ्या गोष्टींमुळे शारीरिक, मानसिक परिणाम होतो. पण आपल्याकडे कायदा असताना मला घाबरायची काय गरज आहे?"
अभिनेत्री निमरत कौरलाही नुकतंच मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. निमरत ने एका कार्यक्रमात खोल गळ्याचा ड्रेस घातला होता, आणि त्यासाठी तिला सोशल मीडियावर ट्रोल केल गेलं.
नेमकं काय झालं?
निमरत द कपिल शर्मा शो मध्ये पाहुणी म्हणून आली होती. अभिषेक बच्चन आणि निमरत यांचा दसवी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
ट्विटरवर Dewang@RetardedHurt लिहितात, "बायकांनो असे कपडे घालण्याचा काय उद्देश आहे मला जाणून घ्यायचं आहे. जर पुरुषांना आकर्षित करायचं आहे तर का? आणि नसेल आकर्षित करायचं तर मग का?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या प्रश्नाच्या उत्तरादाखल prisha@starksswillow लिहितात, "कोणाला आकर्षित करण्यापेक्षा स्वत:साठी सुंदर दिसणं हे उद्दिष्ट होऊ शकत नाही का?"

फोटो स्रोत, Khyati Shree
तर Nayanaa@LasciviousQueen उत्तर देतात. त्या म्हणतात, "त्यात काय चुकीचं आहे? मी पुरुषांच्या कपड्यांवर अशा प्रकारच्या कमेंट्स पाहिल्या नाहीत. महिलांना जे सोयीचे असेल ते घालतील."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
या ट्रोलिंगवर निमरत कौर ने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोशल मीडियावरची मतं
सोशल मीडिया आपली मतं मांडण्याचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. मात्र ही मतं मांडताना काही मर्यादा पाळायला हव्यात. आता हे कसं आणि कोण ठरवणार?
पंजाब विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ वुमन स्टडीजच्या प्राध्यापिका अमीर सुल्ताना म्हणतात, "आपल्या देशात स्वातंत्र्य आणि समानतेने राहण्याचा हक्क आपली राज्यघटना देते. जर निमरतला एखादा ड्रेस आवडला असेल तर त्यावर टिप्पणी करण्याचा कोणाला बंदी घालण्याचा किंवा टिप्पणी करण्याचा अधिकार नाही."
त्यांच्या मते, "जे लोक निमरत कौरला ट्रोल करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतात असेही रिवाज आहे जिथे विधवा महिलांना ब्लाऊज घालण्याचं स्वातंत्र्य नाही आणि त्यांना पूर्ण आयुष्य पांढऱ्या साडीत व्यतित करावं लागतं. तेव्हा ही संस्कृती का विसरली जाते. तेव्हा कोणी का कमेंट करत नाही? त्यांच्यासाठी कोणी का आवाज उठवत नाही की हे सगळं चूक आहे. त्यांनाही पूर्ण कपडे, ब्रा, ब्लाऊज घालायचा अधिकार असायला हवा."
अभिनेत्री प्रिया बापटने बीबीसी शी बोलताना तिची व्यथा सांगितली. एकदा तिने सहा किलोमीटर धावल्यावर एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आणि तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.
ती सांगते, "सहा किलोमीटर धावल्यावर माझ्या चेहऱ्यावर गुलाबी छटा आली होती. ती मला फार आवडली होती. तो रंग अगदी नैसर्गिक होता कारण धावल्यानंतर रक्ताचा प्रवाह वाढतो. मला छान वाटलं म्हणून पोस्ट केला. त्यानंतर लोकांनी मला ट्रोल केलं की अरे ती तू किती म्हातारी दिसतेय, तुला बोटॉक्स करायची गरज आहे, तुला फेस अपलिफ्टमेंट करायची गरज आहे."
ती म्हणाली, "या घटनेचा माझ्यावर खूप परिणाम झाला. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं. जेव्हा माझ्या घरचे मला विचारतील की हे तू काय चुकीचं करतेस तेव्हा मी कदाचित विचार करेन की मी खरंच काही चुकीचं करतेय का?"
प्रियाने सिटी ऑफ ड्रीम्स, वजनदार, टाईम प्लीज, अशा अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे. सिटी ऑफ ड्रीम्स या मालिकेत तिनं समलैंगिक मुलीची भूमिका केली होती. या सीरिजमधला एक सीन लीक झाला होता आणि तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
बायकांनाच लक्ष्य का केलं जातं?
प्रिया बापटच्या मते, "सोशल मीडियावर महिलांनाच मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातं. लोक कमेंट करतील, त्यात काही संमिश्र प्रतिक्रिया असतील आणि लोक ट्रोल करतील." ती सल्ला देते की, जर वाईट प्रतिक्रिया आल्या तरी फारसं लक्ष देऊ नये.
डॉ. अमीर सुलताना म्हणतात की, अशा ट्रोल्सकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. पण प्रश्न असा आहे की वेशभुषेचा मुद्दा आला की महिलांनाच का ट्रोल केलं जातं?

फोटो स्रोत, Priya Bapat
त्या म्हणतात, "जेव्हा एखादा पुरुष पारदर्शक कपडे घालतो, जेव्हा अंडरवेअरवर काहीच घालत नाही तेव्हा सिक्स पॅक अब, मस्क्युलॅनिटी किंवा मसल पॉवर दिसते आणि त्याला कोणी ट्रोल करत नाही. तिथे फक्त लोक फक्त स्तुती करतात. पण तुम्ही शरीरप्रदर्शन का करत आहात असा प्रश्न कोणी विचारत नाही. हे फार चुकीचं आहे."
मात्र एखाद्या स्त्रीवर एखादी विशिष्ट वेशभूषा करण्याची बळजबरी केली जाते तेव्हा त्यावर टीका व्हायलाच हवी.
गेल्या काही वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया ने अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक फोटो प्रकाशित केला होता आणि तिच्या क्लिवेजवर ट्विट केलं होतं. हे ट्विट नंतर हटवण्यात आलं आणि वर्तमानपत्राने त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं.
मानसिकता बदलण्याची गरज
या ट्विटवर दीपिकाने नाराजी व्यक्त केली होती आणि त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. तिच्या ट्विटला सात हजार रिट्विट होते आणि '#IStandWithDeepikaPadukone' हा हॅशटॅग भारतात ट्रेंड झाला होता.
एखाद्या महिलेला तिच्या कपड्यावरून जोखणं एका विशिष्ट मानसिकतेचं लक्षण आहे.

फोटो स्रोत, Priya Bapat
फेमिनिस्ट फिल्म मेकर आणि लेखिका पारोमिता वोहरा म्हणतात की, "जेव्हा महिला सार्वजनिक जीवनात असतात तेव्हा त्यांचं कायमच खच्चीकरण होतं. महिलांवर हल्ला करण्याचा हा एक मार्ग आहे, त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न आहे."
त्यांच्या मते, "महिलेच्या आवडीनिवडीचा आदर केला पाहिजे. ती कोणते कपडे घालतेय यावरून तिचा आदर करायचा की नाही हे ठरवायला नको."
आता काळ बदलला आहे आणि महिला सोशल मीडियावर आपली मतं खुलेपणाने मांडत आहेत. समाजानेही हा बदल स्वीकारला पाहिजे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








