शरद पवार : संजय राऊतांवर कारवाईची काय गरज होती

फोटो स्रोत, TWITTER/PMO
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली.
या भेटीमध्ये राज्यपाल नियुक्त 12 सदस्य आणि संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या ईडीच्या कारवाई बाबत चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
या गोष्टी मी त्यांच्या कानावर घातल्या, त्यांची प्रतिक्रिया विचारली नाही, असं पवार यांनी मोदींनी त्यावर काय म्हटलं असं विचारल्यावर सांगितलं आहे.
तसंच या भेटीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं, त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, "आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही."
तसंच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. बिगर भाजप पक्षांची बैठक बोलवायला हवी आणि भविष्याची चर्चा करायला हवी, असं त्यांनी पुढे सांगितलंय.
नवाब मलिकांवरील कारवाईवर मात्र मोदींशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगत राष्ट्रवादीचा कुठलाही मंत्री बदलणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय.
राज ठाकरे यांच्या विषयावर मी काही बोलू इच्छित नाही, असं यावेळ पवार म्हणाले.
मोदी-पवार भेट
संसदेतील पंतप्रधान कार्यालयात शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. बुधवारी (6 एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही भेट झाली.
सध्या राज्यात ED च्या कारवाईवरून राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकीय परिस्थिती शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
तत्पूर्वी, दिल्लीत असलेल्या शरद पवारांनी मंगळवारी (5 एप्रिल) सहभोजनाचा एक कार्यक्रमही आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे याविषयी राजकीय क्षेत्रात चर्चा होत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








