होळी-धुलिवंदन : कोरोनाचं मळभ झटकून भारतात अशी साजरी झाली होळी, पाहा फोटो गॅलरी

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरस रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत असताना दुसरीकडे देशात नागरिकांनी उत्साहाने होळी आणि धुलिवंदन हे दोन्ही सण उत्साहात साजरे केले.
दोन वर्षांपूर्वी होळीनंतर काही दिवसांनी कोरोनाचा प्रसार देशात सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी होळी साजरी करण्यावर प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले होते.
पण यावर्षी मात्र नागरिकांनी मनसोक्त होळी आणि धुलिवंदन साजरी केल्याचं दिसून आलं.
लोकांचा हा जल्लोष पाहूया फोटो गॅलरीच्या माध्यमातून..

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच राज्यांनी लोकांच्या एकत्रित येण्यावर निर्बंध घातली होती. मात्र यंदाच्या वर्षी होळीपूर्वी काही दिवस आधीच देशातील सर्वच राज्यांतील कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
देशात कधी काळी लाखांच्या घरात असलेली रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्याच्या घडीला दैनंदिन सरासरी केवळ 2500 कोरोना रुग्ण देशात आढळून येत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मानवी आयुष्य कोरोनापूर्व काळाप्रमाणेच पूर्वपदावर येत असल्याचं सध्या चित्र आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, देशातील रुग्णसंख्येत घट होत असली तरी अजूनही कोव्हिडसंबंधित नियमांचं पालन करण्याची सूचना आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही दिवसांपासून चीन, सिंगापूर, तसंच दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या आरोग्य मंत्रालयाकडून खबरदारी बाळगण्याची सूचना मिळाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण तसं असलं तरी यंदाच्या होळी सणाच्या आनंदावर कोरोनाचा प्रभाव दिसून आला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
आगामी काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनानंतर पहिल्यांदाच एखादा सण इतक्या मोठ्या स्वरुपात साजरा करण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








