होळीचे रंग असे तयार होतात : पाहा फोटो

फोटो स्रोत, Getty Images
होळीच्या काही दिवसांआधीच कानपूरच्या वस्त्यांमध्ये लोक रंगांमध्ये न्हाऊन निघालेले दिसतात. एवढंच नव्हे तर तिथे मोठमोठाले रंगीबेरंगी ढीगही दिसतात.
'बापरे! एवढी कसली घाई?' असा प्रश्न पहिले पडतोच. मग कळतं. हे कानपूर आहे. उत्तर प्रदेशमधल्या हाथरसनंतर होळीचे रंग बनवण्यात कानपूरचा नंबर लागतो.

फोटो स्रोत, Rohit ghosh
कानपूरच्या मधोमध असलेल्या परिसरांमध्ये तर जानेवारीपासूनच रंग बनवण्याचं काम एखाद्या कुटीर उद्योगाप्रमाणं सुरू होतं.

फोटो स्रोत, Rohit ghosh
होळीचे रंग बनवणारे ताराचंद जयसवाल सांगतात, "हे रंग डायपासून तयार केले जातात. संपूर्ण भारतात डायचं केंद्रस्थान म्हणजे अहमदाबाद. तिथूनच आम्ही डाय विकत घेतो. त्याची अंदाजे किंमत एक हजार रुपये प्रति किलो असते."

फोटो स्रोत, Rohit ghosh
ताराचंद जयसवाल सांगतात, "एका ड्रममध्ये डाय आणि पाणी मिसळलं जातं, आणि मग त्यात आरारूट किंवा ग्लुकोज टाकलं जातं. त्यानंतर या मिश्रणाला चांगलं घोळून कमीत कमी दोन दिवस उन्हात वाळायला ठेवलं जातं. या मिश्रणाचं पावडर तयार होतं, ज्याला मग चाळणीने गाळलं जातं."

फोटो स्रोत, Rohit ghosh
"उत्तर प्रदेशात हाथरसनंतर कानपूरमध्ये होळीच्या रंगांचा सर्वांत मोठा व्यापार होतो. आणि कानपूरमध्ये हटिया ही रंगांची सगळ्यांत मोठी बाजारपेठ आहे," अशी माहिती कानपूर होळी महोत्सवचे महासचिव ज्ञानेंद्र विश्नोई यांनी दिली आहे.
हटिया तर कानपुरमधल्या सर्वांत जुन्या परिसरांपैकी एक. अरुंद रस्ते, दोन्ही बाजूंनी बहुमजली इमारती, असं इथल्या वस्तींच चित्र.

फोटो स्रोत, Rohit ghosh
विश्नोई पुढे सांगतात, "हटियाच्या जवळपास प्रत्येक गच्चीवर रंग बनवण्याचं काम जानेवारी महिन्यात सुरू होतं. होळीची तारीख जवळ येताच हे काम युद्धपातळीवर सुरू होतं."
"गच्चीवर वाळायला ठेवलेला रंग कधी वारं आलं तर रंग उडून घरांमध्येही जातो, कधी कधी वाळू घातलेल्या ओल्या कपड्यांनाही जाऊन चिटकतो. या गच्च्यांवरच या रंगांची पॅकिंग केली जाते," असं ते पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Rohit ghosh
विश्नोई स्वतः हटियात राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते मागणी करत आहेत की हटिया आणि आसपासच्या परिसरात रंग बनवण्याच्या कामावर बंदी आणली पाहिजे.
"माझ्यामुळे काही रंग कारखाने हटियामधून बाहेर गेलेत," ते सांगतात.

फोटो स्रोत, Rohit ghosh
पण होळीशी एक मोठं आणि सर्वश्रृत हिंदी वाक्य कायमचं जोडलं गेलं आहे - "बुरा न माने होली है".
म्हणूनच कानपूरमध्ये जर कोणाच्या कपड्यांना होळीच्या आधीही रंग लागला तरी तो वाईट मानून घेत नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








