पद्म पुरस्काराची यादी: प्रभा अत्रेंना पद्मविभूषण तर नीरज चोप्रा, सुंदर पिचाई यांचा पद्म पुरस्काराने गौरव

प्रभा अत्रे

फोटो स्रोत, Getty Images

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारनं मानाच्या पद्म पुरस्कार्थींची घोषणा केलीय.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्यासह चार जणांना 'पद्मविभूषण' पुरस्कार, तर सायरस पूनावाला, सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्यासह 17 जणांना 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मश्री पुरस्कार एकूण 107 जणांना जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी

  • प्रभा अत्रे (कला)
  • राधेश्याम खेमका (साहित्य आणि शिक्षण) - मरणोत्तर
  • जनरल बिपीन रावत (नागरी सेवा) - मरणोत्तर
  • कल्याण सिंग (लोकसेवा) - मरणोत्तर

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी

  • गुलाम नबी आझाद (लोकसेवा)
  • व्हिक्टर बॅनर्जी (कला)
  • गुरमित बावा (कला)
  • बुद्धदेव भट्टाचार्य (लोकसेवा)
  • नटराजन चंद्रशेखरन (व्यापार आणि उद्योग)
  • कृष्णा इल्ला आणि सुचित्रा इल्ला (व्यापार आणि उद्योग)
  • माधूर जाफरी
  • देवेंद्र झझारिया (क्रीडा)
  • रशीद खान (कला)
  • राजीव मेहऋषी (नागरी सेवा)
  • सत्या नडेला (व्यापार आणि उद्योग)
  • सुंदर पिचाई (व्यापार आणि उद्योग)
  • सायरस पूनावाला (व्यापार आणि उद्योग)
  • संजय राजाराम (विज्ञान आणि अभियांत्रिकी) - मरणोत्तर
  • प्रतिभा राय (साहित्य आणि शिक्षण)
  • स्वामी सचिदानंद (साहित्य आणि शिक्षण)
  • वशिष्ठ त्रिपाठी (साहित्य आणि शिक्षण)

तसंच पद्म पुरस्कारांमध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, संशोधक डॉ. हिम्मतराव बाविस्कर, सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार डोंगरे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील या व्यक्ती ठरल्या पुरस्काराच्या मानकरी

पद्मविभूषण - प्रभा अत्रे (कला)

पद्मविभूषण -

  • सायरस पूनावाला (व्यापार आणि उद्योग)
  • नटराजन चंद्रशेखरन (व्यापार आणि उद्योग)

पद्मश्री -

  • डॉ. हिम्मतराव बाविस्कर (वैद्यकीय)
  • सुलोचना चव्हाण (कला)
  • डॉ. विजयकुमार डोंगरे (वैद्यकीय)
  • सोनू निगम (कला)
  • अनिल कुमार राजवंशी (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
  • डॉ. भीमसेन सिंघल (वैद्यकीय)
  • डॉ. बालाजी तांबे (वैद्यकीय) - मरणोत्तर

डॉ. हिम्मतराव बाविस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. बाविस्कर हे जागतिक कीर्तीचे संशोधक आहेत. विंचू विषबाधेच्या उपचारांवरील त्यांचं संशोधन प्रसिद्ध आहे. द लँसेटसह अनेक प्रतिष्ठित मासिकांमध्ये त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. वैद्यकीय पेशातील भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरवले आहे. काही दिवसांपूर्वीच हेलिकॉप्टर अपघातात ज्यांचे निधन झाले ते भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना देखील मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.

गीता प्रेस गोरखपूर आणि कल्याण मासिकाचे संपादक राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे. तर राजकारणातील कारकीर्दीसाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना देखील पद्मविभूषणने गौरवण्यात आले आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)