BBC ISWOTY : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्काराची तिसरी आवृत्ती आपल्या भेटीला

बीबीसी स्पोर्ट्सवुमन

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY)पुरस्काराची तिसरी आवृत्ती आपल्या भेटीसाठी आली आहे.

8 फेब्रुवारीला यंदाच्या या पुरस्कारासाठीची नामांकनं जाहीर केली जाणार आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून बीबीसीतर्फे दरवर्षी भारतात क्रीडा क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या यशस्वी महिला क्रीडापटुंचा गौरव केला जातो.

वाचकांना पाच नामांकनांपैकी त्यांच्या आवडत्या स्पोर्ट्सवुमनसाठी ऑनलाईन मतदान करता येईल. भारतातील क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि क्रीडा लेखकांच्या ज्युरीनं ही पाच नावं अंतिम केलेली असतील. बीबीसीच्या भारतीय भाषांच्या बेवसाईट आणि बीबीसी स्पोर्ट्स या वेबसाईटवर ऑनलाईन वोटिंग करता येणार आहे.

2020 मध्ये या पुरस्काराची मानकरी ठरलेली भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनं हा पुरस्कार पुन्हा एकदा क्रीडापटूचा गौरव करण्यासाठी परतला असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

"बीबीसी ISWOTY हा एक अत्यंत खास असा उपक्रम आहे. त्यातून तरुण पिढीला प्रोत्साहन तर मिळतंच पण त्याचबरोबर महिला क्रीडापटुंना ओळखही मिळते. बुद्धीबळपटू म्हणून जेव्हा बीबीसी ISWOTY साठी नामांकन मिळालं, तेव्हा मला भारतासह जगभरातून प्रेम मिळालं," असं कोनेरू हंपी म्हणाल्या.

"2022 हे वर्ष खास आहे. केवळ आम्ही ISWOTY ची तिसरी आवृत्ती घेऊन येत आहोत म्हणूनच नव्हे, तर बीबीसीची 100 गौरवशाली वर्षही आम्ही यावर्षी साजरी करत आहोत.

निर्भयपणा आणि धाडस असं बीबीसीचं स्पिरीट खऱ्या अर्थानं साजरा करणारा हा पुरस्कार आहे. सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करत जगात समानता आणि न्यायाची मूल्य रुजवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत," असं बीबीसी न्यूजच्या इंडिया हेड रुपा झा यांनी म्हटलं.

स्पोर्ट्सवुमन

या पुरस्काराच्या विजेत्यांचं नाव 7 मार्च 2022 रोजी जाहीर केलं जाणार आहे. त्याचबरोबर बीबीसीतर्फे आणखी दोन क्रीडापटुंचाही गौरव केला जाणार आहे. 'बीबीसी इमर्जिंग प्लेयर' पुरस्काराद्वारे क्रीडा क्षेत्रातील नव्या प्रतिभेचा सन्मानचा केला जाईल.

तर 'बीबीसी लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड' म्हणजेच जीवनगौरव पुरस्काराद्वारे भारतीय क्रीडा क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या दिग्गज क्रीडा व्यक्तिमत्वाचा गौरव केला जाणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)