महेश मांजरेकर- 'नाय वरनभात लोन्चा..'च्या ट्रेलरमधून 'ती' दृश्य काढत आहोत

फोटो स्रोत, facebook
राष्ट्रीय महिला आयोगाने 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' सिनेमाच्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह दृश्यांबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आता ट्रेलरमधून 'ती' दृश्य वगळल्याचं स्पष्ट केलं आहे.
बुधवारी (12 जानेवारी) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सिनेमाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिलं होतं. सिनेमातील काही लैंगिक दृश्य सेंसॉर करण्याचं त्यांनी सुचवलं होतं.
महेश मांजरेकर यांनी याबाबत आपलं सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
"समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखत आम्ही 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या सिनेमाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी दृश्य काढून टाकली आहेत. जुना प्रोमो सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला आहे. सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात येत आहे," असं महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
दिवंगत ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. येत्या 14 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'प्रोमोमधूनच नव्हे तर चित्रपटातूनही ती दृश्य काढली आहेत'
आपल्या निवेदनात ते म्हणतात, 'जुना प्रोमो काढून टाकून नवीन प्रोमो प्रकाशित करण्याच्या सूचना संबंधित माध्यमांना देण्यात आल्या आहेत. सिनेमाच्या निर्मितीसंस्थेपासून, लेखक, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ आम्ही सर्व जण तमाम स्त्रियांचा मनापासून आदर करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणताही चुकीचा संदेश पोहचवण्याचा आमचा हेतू नव्हता.'
'प्रोमोमधील काही दृश्यांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आक्षेपार्ह वाटणारी दृश्य केवळ प्रोमोमधून नव्हे तर चित्रपटातूनही वगळण्यात आली आहेत,' असंही पुढे त्यांनी स्पष्ट केलं.
सेन्सॉरने या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र दिलं असलं तरी आक्षेपार्ह आणि भविष्यात ज्याचा त्रास होईल अशी वाटणारी दृश्य सुद्धा काढून टाकली आहेत, अशी माहितीही महेश मांजरेकर यांनी आपल्या निवेदनातून दिलं. तसंच हा चित्रपट प्रौढांसाठी असणार आहे, असं आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत असंही ते म्हणाले.
महिला आयोगाने पत्रात नेमकं काय म्हटलंय?
10 जानेवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात काही आक्षेपार्ह दृश्य असून हा ट्रेलर इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अल्पवयीन मुलांसाठीही ही दृश्य उपलब्ध आहे. राष्ट्रीय महिला आयोग याचा निषेध करत असल्याचंही पत्रात म्हटलं आहे.
आयोगाने म्हटलंय, माहिती व प्रसारण मंत्रालयाने याची दखल घ्यावी आणि अशी दृश्य सेन्सॉर करावीत. अशाप्रकारची आक्षेपार्ह दृश्य खुल्या पद्धतीने प्रसारित करण्यावरही आयोगाने आक्षेप घेतला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
या पत्राची एक प्रत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही पाठवण्यात आली आहे.
महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.
यापूर्वी महेश मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबर 2020 रोजी महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या दिवशीच, नथुराम गोडसेवर चित्रपट तयार करण्याची घोषणा केली. यावरूनही त्यांच्यावर टीका करण्यात होती.
महाराष्ट्र महिला आयोगाचाही आक्षेप
महाराष्ट्र महिला आयोगानेही या सिनेमातील दृष्यांवर आक्षेप घेतले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर लिहितात, "महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला. असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना,कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले आहे. "
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








