गडचिरोलीच्या जंगलात 26 नक्षलवादी ठार- महाराष्ट्र पोलीस

फोटो स्रोत, Getty Images/AFP
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 कमांडोबरोबर झालेल्या चकमकीत कोटगूल-ग्यारापत्तीच्या जंगलात 26 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या कारवाईमध्ये 26 नक्षलींचा खात्मा केल्याची माहिती दिली, असं एएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
ग्यारापत्तीच्या जंगलात झालेल्या या चकमकीत 4 जवान जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पोलिसांच्या जखमी झालेल्या चारही जवानांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
गडचिरोलीमध्ये नक्षलविरोधी मोहीमेमध्ये नक्षलवाद्यांच्या एका कमांडरसह 25 जण ठार झाल्याची माहिती असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
सध्या ठार झालेल्यांची ओळख पटवणं सुरू आहे. तोपर्यंत कुणाचंही नाव घेणार नसल्याचं, दिलीप वळसे पाटील एएनआयशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, आज चकमकीत ठार झालेल्या 26 जणांची ओळख पटली नसून त्यात नक्षलवाद्यांचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात सकाळी ही चकमक सुरू होती. या परिसरात अजूनही पोलिसांकडून सर्चिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
हा परिसर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असून घनदाट जंगलाने व्यापला असल्याने संपर्क बाहेर करणे ही कठीण होत आहे.
धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात काही हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारच्या रात्रीपासूनच पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवत असताना जंगल परिसरात दबा धरून बसलेल्यांनी पोलीस जवानावर अंदाधुंद गोळीबार केला.
त्यानंतर पोलिसांनीही जशाच तसे प्रतिउत्तर दिले. या चाललेल्या दिवसभराच्या धुमश्चक्रीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि 26 पोलिसांनी 26 मृतदेह हस्तगत केल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी जंगलात शोध मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईत ग्यारापत्तीच्या जंगलातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात काही साहित्य जप्त केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)