UPSC Result : यूपीएससीचा निकाल जाहीर, शुभम कुमार देशात पहिला

शुभम जाधव

फोटो स्रोत, Shubham

फोटो कॅप्शन, शुभम जाधव
    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

IAS, IPS, IRS अशा 25 सेवांसाठी एकूण 761 जणांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी साधारण 900 ते 1000 उमेदवारांची निवड या परीक्षेमार्फत होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परीक्षेचा निकाल चांगलाच लांबणीवर पडला होता. कोरोनाच्या लाटेमुळे मुलाखतीचा अंतिम टप्पा पुढे ढकलण्यात आला होता.

शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर जागृती अवस्थी आणि अंकिता जैनने अनुक्रमे तिसरा क्रमांक मिळवला आहे.

संपूर्ण निकाल तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

शेतकऱ्याचा मुलगा आयएएस

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या शिंदेवाडी गावात राहणाऱ्या शुभम जाधव यांचा 445 वा क्रमांक आला आहे.

शुभम जाधव यांचे आईवडील शेती करतात. पाचव्या प्रयत्नामध्ये त्यांना हे यश आलं आहे. त्यांनी आधी तीन वेळा मुलाखतीपर्यंत मजल मारली.

यंदा चौथ्या मुलाखतीत यश आल्यामुळे त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आनंद व्यक्त केला आहे.

"काहीतरी यश माझ्या हाताला लागलं आहे. एवढ्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली. आईवडील, नातेवाईक आणि गुरुजनांच्या पाठिंब्यांमुळे हे शक्य झालं. माझे आत्ये भाऊ अमोल क्षीरसागर यांनी मला मला फार मदत केली पाठिंबा दिला, प्रोत्साह दिलं. त्यामुळे इथपर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे, असं शुभम यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं आहे.

लेखन करता करता UPSC पास

रजत उभयकर यांनी नागरी सेवा परीक्षेत भारतातून 49 वा क्रमांक मिळवला आहे. त्यांना फोन केला तेव्हा हे यश अजूनही झिरपत होतं. तरीही स्वत:ला सावरत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

व

रजत यांचा प्रवास विलक्षण आहे. IIT कानपूर मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी एक वर्ष एका बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांनी काम केलं पण लेखन वाचनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग त्यांनी चेन्नई येथील एशियन स्कूल ऑफ जर्नलिझमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिल आणि पुस्तक लिहिता लिहिता त्यांनी या परीक्षेचा अभ्यास केला आणि यश मिळवलं. यूपीएससीची परीक्षा द्यायची हे आधीपासून त्यांच्या मनात होतं. पत्रकारितेचा अभ्यास करताना मजुरांच्या आयुष्याबद्दल त्यांनी वाचलं आणि या लोकांच्या आयुष्यावर काहीतरी लिहावं असं त्यांच्या मनात आलं.

"मला समाजातल्या या लोकांबदद्ल कुतुहल होतं अनेकदा मी ट्रकमध्ये लिफ्ट घेतली होती आणि मग मला असं वाटलं की त्यांचं आयुष्य कसं असतं ते एकदा जवळून पहावं. मग मी आऊटलुक या मासिकात काम करत असताना मी माझ्या संपादकांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मी नोकरी सोडतोय कारण मला ट्रक ड्रायव्हर लोकांबरोबर प्रवास करायचा आहे. तेव्हा संपादकांनी मला सांगितलं की तू या विषयावर लेखमाला लिही. त्यातूनच ट्रक दे इंडिया या पुस्तकाचा जन्म झाला."

पुस्तक लिहिता लिहिताच त्यांनी यूपीएससीचा अभ्यास केला. 2-3 तास लेखन आणि उरलेल्या वेळात अभ्यास असा त्यांचा दिनक्रम होता. 2019 मध्ये त्यांना 378 वा रँक मिळाला आणि आता त्यांना 49 वा क्रमांक मिळाला.

रजत यांना भारतीयांच्या जीवनाबद्दल आस्था आहे. त्यातूनच मग प्रवास, लेखन, वाचन आणि आता सनदी अधिकारी असा प्रवास त्यांनी केला. त्यांची परराष्ट्र सेवेत जायची इच्छा आहे. पण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी लेखन वाचन करत राहणार असल्याचं रजत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

रजत बीबीसीच्या Worklife India या कार्यक्रमातही सहभागी झाले होते.

अल्पदृष्टी असली तरी स्वप्नं मोठी

आनंद पाटील यांनी 325 वा क्रमांक यावर्षींच्या परीक्षेत मिळवला आहे. आनंद यांची दृष्टी अधू आहे. त्यांना नीट दिसत नाही. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर चाणक्य मंडलला प्रवेश घेतला. तिथे त्यांनी या परीक्षेचा अभ्यास केला. पुस्तक वाचण्यासाठी त्यांनी भिंगाचा वापर केला तसंच ऑनलाईन लेक्चर्सचा आधार घेतला. पाहण्यापेक्षा ऐकणं सोपं असल्याने त्यांनी हा मार्ग स्वीकारला.

युपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तरं लिहावी लागतात. त्यावेळी त्यांनी लेखनिकाची मदत घेतली खरी मात्र त्यांनी स्वत:च उत्तरं लिहिली आणि लेखनिकानी ती वाचून दाखवली. अशा पद्धतीने त्यांनी हे शिवधनुष्य पेललं.

कोरोनामुळे यावर्षी यूपीएससीच्या मुलाखती लांबल्या. मात्र कोल्हापुरात राहणाऱ्या आनंद यांचा जीव पुरामुळेही चिंतेत पडला. पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन ते आधीच पुण्यात दाखल झाले आणि तिथून दिल्लीत मुलाखतीसाठी आले.

युट्यूब आणि इतर संसाधनांचा वापर करत असतानाच बीबीसी मराठीच्या सोपी गोष्ट या दैनंदिन माहितीपूर्ण कार्यक्रमाचाही फार उपयोग झाला असं आनंद यांनी आवर्जून सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)