पंकजा मुडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचं बॅंक खातं गोठवलं, कारण...

फोटो स्रोत, Getty Images
भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं बॅंक खातं गोठवण्यात आलंय.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफची रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबादच्या ईपीएफओ (EPFO) कार्यालयाचे अंमलबजावणी अधिकारी सुधीर वानखेडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ईपीएफओ कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. ईपीएफओने केलेली कारवाई पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.
बॅंक खातं गोठवण्याची कारण?
ईपीएफओ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल 1 कोटी 46 लाख रूपये थकवले होते.
त्यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ही कारवाई करण्यात आलीय.
ईपीएफओ कार्यालयाचे अंमलबजावणी अधिकारी सुधीर वानखेडे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितालं, "वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं अकाउंट सील करून 92 लाख रूपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे."
"उर्वरीत 56 लाख रूपयांची थकबाकी वसूल करण्याचं काम सुरू आहे," अशी माहिती वानखेडे यांनी दिलीय.
थकबाकीचं प्रकरण काय आहे?
ईपीएफओ कार्यालयाच्या माहितीनुसार, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळात कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची 1 कोटी 46 लाख रूपयांची थकबाकी होती.
पीएफचे पैसे भरण्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती. पण, या नोटीशीनंतरही कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरण्यात आल्याने खातं गोठवण्याची कारवाई करण्यात आली.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत
पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहे.
पगार न मिळाल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील 700 कामगारांनी गेल्यावर्षी मार्च महिन्यात संप पुकारला होता. पगार मिळण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी विधीमंडळ अधिवेशावेळी आंदोलनही केलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








