हाफीज सईदच्या घराजवळील बॉम्ब स्फोट 'भारत पुरस्कृत'- इम्रान खान यांचा आरोप

इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

लाहोरमध्ये जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदच्या घराजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटासाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार ठरवलं आहे.

लाहोरच्या टाऊन परिसरात 23 जून रोजी झालेल्या स्फोटामध्ये एका पोलिसासह 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 24 जण जखमी झाले होते.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)मोईद युसूफ यांनी इस्लामाबादेत एका पत्रकार परिषदेत यासाठी भारत जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे.

"याचे धागे-दोरे भारतापर्यंत पोहोचत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतीय नागरिक आहे," असा आरोप मोईद युसूफ यांनी केला आहे.

पाकिस्ताननं लावलेल्या या गंभीर आरोपांवर सध्या भारतानं मात्र काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हल्ल्याचा थेट संबंध भारताची गुप्तचर संस्था (R&AW)बरोबर असल्याचं मोईद युसूफ यांनी म्हटलं आहे.

रविवारी (4 जुलै) मोईद युसूफ, माहिती मंत्री फवाद चौधरी आणि पंजाब प्रांताचे पोलीस प्रमुख इनाम गनी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. प्रशासनाकडं स्फोटातील आरोपीचे विदेशी संबंध असल्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. त्यात फायनान्स, बँक अकाऊंट, ऑडियो आणि इतर पुरावे असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

इम्रान खान यांनीही केलं ट्वीट

पत्रकार परिषदेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी (4 जुलै) रात्री ट्वीट केलं. या हल्ल्याचा संबंध भारताशी असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांचं कौतुक केलं.

इम्रान खान यांनी याला थेट 'भारत पुरस्कृत दहशतवाही हल्ला' असं म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

"लाहोरमधील जौहर टाऊन परिसरात झालेल्या स्फोटाच्या चौकशीची माहिती देशाला देण्याचे निर्देश मी माझ्या टीमला दिले आहेत. मी पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाच्या कामाच्या वेगाचं कौतुक करेल. त्यांनी आपले नागरिक आणि गुप्तचर संस्थांच्या मदतीनं चांगले पुरावे मिळवले," असं ट्वीट त्यांनी केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

"याच समन्वयामुळं दहशतवादी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची ओळख पटली आहे. पुन्हा एकदा या गंभीर दहशतवादी घटनेची योजना आणि आर्थिक मदतीचा संबंध पाकिस्तानच्या विरोधात भारत प्रायोजित दहशतवादाशी असल्याचं समोर आलं आहे. जागतिक समुदायानं या कृत्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय संस्थांना एकत्रित करायला हवं."

भारताकडून मात्र अद्याप या आरोपांबाबत काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही.

प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हटलं?

"ज्या दिवशी हा हल्ला झाला होता, त्या दिवशी पाकिस्तानच्या तपास संस्थांवरही हजारो सायबर हल्ले झाले होते. त्याचा हेतू या हल्ल्यात सहभागी असलेल्या नेटवर्कवरून आमचं लक्ष विचलित व्हावं हा होता. पण त्यांना ती संधी मिळू शकली नाही," असं पाकिस्तानचे NSA मोईद युसूफ म्हणाले.

"या हल्ल्याचे सर्व धागे-दोरे हे पाकिस्तानच्या विरोधातील भारत प्रायोजित दहशतवादाशी जुळत असल्याचं, मी स्पष्टपणे सांगू इच्छितो," असंही ते म्हणाले.

लाहोरच्या टाऊन परिसरात 23 जून रोजी झालेल्या स्फोटामध्ये एका पोलिसासह 3 जणांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लाहोरच्या टाऊन परिसरात 23 जून रोजी झालेल्या स्फोटामध्ये एका पोलिसासह 3 जणांचा मृत्यू झाला होता.

आरोपींकडून जे फोन आणि इतर इलेक्ट्रिक सामान मिळालं आहे, त्याच्या न्यायवैद्यक तपासणी (फॉरेन्सिक) वरून या हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा संबंध भारताशी असल्याचं सिद्ध होतं, असं युसूफ यांनी म्हटलंय.

"आम्हाला हे जाहीर करण्यात जराही शंका नाही की, या हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतीय गुप्तचर संस्था रॉशी संबंधित आहे आणि तो भारतात राहतो," असा आरोपही त्यांनी केला.

पत्रकारांनी यावेळी मोईद युसूफ यांना जम्मूच्या एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत प्रश्न केला. हा हल्ला पाकिस्ताननं घडवला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.

त्यावेळी हा आरोप फेटाळून लावत युसूफ यांनी "हा आरोप केवळ आरोप आहे," असं म्हटलं.

हल्ल्याच्या कटाबाबात आणखी काय माहिती दिली?

पंजाब पोलिसांचे प्रमुख इनाम गनी यांनी पत्रकार परिषदेत जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदच्या घराजवळ झालेल्या हल्ल्याची आरोपी ईद गुल बाबत माहिती जाहीर केली.

आरोपी ईद गुल इस्लामाबादहून गाडी घेऊन लाहोरला आला होता, असं त्यांनी सांगितलं.

"इस्लामाबादेत गाडी कुठं तयार झाली, ती सर्व माहिती आणि कागदपत्रं आमच्याकडं आहेत. पोलिसांकडं गाडीसह आरोपी, त्याचे मोबाईल फोन आणि इतर सर्व संपर्कांची माहिती उपलब्ध आहे. आरोपीनं इस्लामाबादहून लाहोरला जाण्यासाठी रस्त्याचा मार्ग स्वीकारला. कारण या मार्गावर पोलीस तुम्हाला अडवत नाहीत. त्यामुळंच तो सहज या मार्गाने पोहचण्यात यशस्वी झाला."

या हल्लेखोराचे वडील आणि भाऊ हेदेखील संशयितांच्या यादीत आहेत. कदाचित यामुळेच या हल्ल्यासाठी ईद गुलचा वापर करण्यात आला असावा, असंही ते म्हणाले.

या प्रकरणात जागतिक संबंध आहेत. अद्याप सुनावणी व्हायची आहे, त्यामुळं फार माहिती जाहीर करणं शक्य नसल्याचं गनी म्हणाले.

आरोपीला कोणत्या बँकांमधून आणि कोणत्या अकाऊंटवरून पैसे मिळत होते, याची माहिती उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं.

"आरोपीचा संबंध अफगाणिस्तानशी आहे. पण त्याला चांगली पंजाबी येत असल्यानं, तो दुसऱ्या देशाचा असेल असा संशय कुणालाही आला नाही."

'देशाच्या शत्रू संस्थांचा समावेश'

विशेष म्हणजे यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी 28 जूनला पत्रकार परिषदेत, लाहोरमधील या स्फोटत सहभाग असलेल्या 'आंतरराष्ट्रीय आणि स्थानिकांची ओळख पटली आहे,' असं सांगितलं होतं. "केवळ चार दिवसांमध्ये देशातील विविध भागांमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे," असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

या घटनेत वापरण्यात आलेली गाडी खरेदी करणारे, स्फोटकं आणणारा व्यक्ती, रेकी करणारे आणि स्फोटात सहभागी असलेल्या सर्वांना अटक करण्यात आली आहे. यात 'देशाच्या शत्रू संस्थांचा समावेश आहे,' असं ते म्हणाले.

"मुख्य आरोपी आमच्या ताब्यात आहे. ज्याच्या मदतीनं गाडी खरेदी केली तो, ज्याने गाडी दुरुस्त केली तोदेखील आमच्या ताब्यात आहे. ज्यानं गाडीत स्फोटकं लावली आणि ज्यानं गाडी उभी केली त्यालाही ताब्यात घेतलं आहे," असं पंजाब पोलिसांचे प्रमुख इनाम गनी यांनी सांगितलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नातं सध्या अत्यंत तणावाच्या स्थितीतून जात आहे. अनेकदा अशा शक्यता व्यक्त केल्या जातात की, दोन्ही देश पडद्यामागं चर्चा करत आहेत. पण दोन्ही देश कधीही ते मान्य करत नाहीत.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि पाकिस्तानच्या लष्कराचे लेफ्टनंट जनरल फैज अहमद यांची भेट घेतल्याची शक्यता माध्यमांतून अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे.

फेब्रुवारीमध्ये दोन्ही बाजुंचं नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी लागू करण्यावर एकमत झालं होतं.

तर 23-24 जूनला दुशांबेमध्ये शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या NSAच्या बैठकीत मोईद आणि डोभाल उपस्थित होते. पण त्यांच्यात भेट झाली नसल्याचं दोन्ही बाजुनं सांगण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)