NEET-MBBS : नीट परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेश कधी आणि कसे होतात?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

बारावीचे विद्यार्थी म्हणजे केवळ बोर्डाचे विद्यार्थी नसतात. तर डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, सीए, शिक्षक अशा अनेक क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे हे लाखो विद्यार्थी असतात. 17 जुलै रोजी झालेल्या नीट परीक्षेची उत्तरतालिका म्हणजेच anser key NTA च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यामुळे सरकारी व्यवस्थेने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

नीट ही प्रवेश परीक्षा एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते.

महाराष्ट्रात साडेसहा हजार प्रवेशांच्या जागांसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी स्पर्धेत असतात.

नीट परीक्षा आणि एनटीए

नीट हे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट याचं लघुरुप आहे. सरकार संचलित सर्व वैद्यकीय संस्थांमधील अंडरग्रॅज्युएट मेडिकल अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा होते.

उच्च शिक्षणासाठी असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच फेलोशिपसाठी स्वतंत्र, विशेष, स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं म्हटलं जातं. त्याद्वारे ही परीक्षा घेतली जाते.

एनटीए संस्था ऑनलाइन अप्लिकेशन मागवणे, एन्ट्रन्स परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे तसेच ऑल इंडिया रँक डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेस, आरोग्य मंत्रालय यांना कळवणं अशी कामं करते.

नीट परीक्षेची माहिती एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट केली जाते. ती वाचण्यासाठी https://nta.ac.in/Home येथे क्लिक करा.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यावर्षी 17 जुलै रोजी ही परीक्षा पार पडली

उत्तरतालिका- आन्सर की

17 जुलै रोजी झालेल्या प्रवेशपरीक्षेची answer key म्हणजेच उत्तरतालिका neet.nta.nic.in या संकेतस्तळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

याबरोबरच विद्यार्थअयांनी दिलेल्या उत्तरांची पत्रिका आणि प्रश्नपत्रिकाही उपलब्ध करुन देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना त्यांसंदर्भातील शंका उपस्थित करण्याची संधी मिळेल, त्यानंतर अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येईल.

त्य़ानंतर निकाल घोषित करण्यात येईल.

आन्सर की म्हणजेच उत्तरतालिका कशी मिळवाल?

प्रथम neet.nta.nic.in. या संकेतस्तळावर जा

त्यानंतर होम पेज वर जा

तेथे NEET आन्सर की ची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.

तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, पासवर्ड किंवा इतर आवश्यक माहितीद्वारे लॉगिन करा.

सबमिट बटण दाबून आन्सर की पाहा.

NEET परीक्षेसोबतच बारावीचा निकाल विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा का आहे?

नीट या एन्ट्रन्स परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नीटचं रँकिंग अत्यंत महत्त्वाचं असतं. पण केवळ नीट परीक्षेच्या निकालाच्या आधारे वैद्यकीय प्रवेश होत नाहीत.

युपीएससी

फोटो स्रोत, Getty Images

या विद्यार्थ्यांना MBBS, BDS, AYUSH, ANIMAL HUSBANDARY, DENTAL यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास बारावीत PCB ग्रुपमध्ये म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयात किमान 50% गुण असणं अनिवार्य आहे. त्यामुळे नीटच्या निकालासोबतच बारावीचा निकालही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो.

महाराष्ट्रात बारावीचे बहुसंख्य विद्यार्थी एचएससी बोर्डाचे असतात. सीबीएसई बोर्डाचे बारावीचे विद्यार्थी तुलनेने अत्यल्प आहेत.

राज्यात वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेश वैद्यकीय संचालनालय म्हणजे (DMER) या स्वतंत्र आस्थापनेकडून होत असतात. याठिकाणी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सर्व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश होतात. प्रवेशासाठी गुणवत्ता यादी सुद्धा ऑनलाईन जाहीर केली जाते.

नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पण विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी तेव्हाच पात्र होतो जेव्हा त्याच्याकडे बारावीचा (PCB) 50% गुण मिळाल्याचे निकाल पत्र हाती असते. अशा परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सुरू होईपर्यंत एचएससी बोर्डाचा निकालच जाहीर झाला नाही तर यंदा विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येऊ शकतात.

दरवर्षी एचएससी बोर्डाची परीक्षा मार्च-एप्रिल या महिन्यात पूर्ण होते. मे अखेरपर्यंत निकालही जाहीर होतो. पण यंदा परीक्षाच होण्याची शक्यता धूसर असल्याने निकालाचे निकष आणि प्रत्यक्षात निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

बारावी परीक्षा कशा होणार?

फोटो स्रोत, Getty Images

DMER चे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही एचएससी बोर्डाच्या निकालासाठी थांबू शकत नाही. पण सहसा अशी परिस्थिती उद्भवणार नाही. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीपर्यंत एचएससी बोर्डाचा निकाल जाहीर होणं गरजेचं आहे. तोपर्यंत विद्यार्थी इतर कागदपत्र दाखल करू शकतात."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)