कोरोना काळात अर्थव्यवस्था रुळावर ठेवण्यासाठी RBI नं केल्या 'या' 6 घोषणा

फोटो स्रोत, Getty Images
वाढत्या कोरोना संकटात भारताची अर्थव्यवस्था रुळावर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या काळात जनतेला अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत असल्याने हे निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना संसर्गाचा धोका वाढला असला तरी यावेळी या संकटाचा सामना करताना अर्थव्यवस्थेचंही नुकसान होऊ नये, यासाठी वेगळी रणनीती आखण्यात आलेली असल्याचं त्यांनी सांगितलं.
शक्तिकांत दास यांनी गेल्यावर्षीची बरीच आकडेवारी सादर करत गेल्यावर्षीपेक्षा यावेळी अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचं सांगितलं. यंदा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या किंमती नियंत्रणात राहतील, अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
निर्यात वाढली आहे आणि परकीय चलन साठादेखील वाढला आहे, ज्यामुळे भारताचा आत्मविश्वास वाढला आहे, असंही त्यांनी नमूद केलं. कोरोनाच्या दुसर्या लाटेला थोपवण्यासाठीच्या प्रयत्नात मदत करण्यासाठी आरबीआयनेही अर्थव्यवस्थेसाठीच्या काही घोषणा केल्या असल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
रिझर्व्ह बँकेने केलेल्या घोषणा-
1) लस आणि हॉस्पिटलमधली सुविधांसाठी बँका अतिरिक्त कर्ज पुरवतील. कोव्हिड कर्ज बुक अंतर्गत हे कर्ज वाटप होईल. पुढच्या वर्षापर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल.
2) रिझर्व्ह बँकेने आरोग्य सेवेसाठी 50,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
3) रिझर्व्ह बँक दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा 35 हजार कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीज खरेदी करेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
4) रिझर्व्ह बँकेने राज्यांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा शिथिल केली असून ती 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे राज्यांना पैसे घेणे सुलभ होईल.
5) लोकांना बँकिंग सुविधांमध्ये अडचण येऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने अनेक प्रकारांमध्ये व्हिडीओ-आधारित केवायसीची व्यवस्था केली आहे.
6) रिझर्व्ह बँकेने छोट्या व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र कर्जाची व्यवस्था केली आहे. हे त्या व्यवसायिकांसाठी लागू असेल ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतलेलं नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








