प्रियंका गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात, 'रेमडेसिवीरची साठेबाजी हा मानवतेविरोधात अपराध'

देवेंद्र

रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा आणि साठेबाजीवरून महाराष्ट्रात राजकारण तापलं असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केलीय.

"भाजप नेत्याचे हे कृत्य मानवतेविरोधात," असल्याची घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या, "देशातील कानाकोपऱ्यात लोक रेमडेसिवीर औषध मिळावे यासाठी वणवण फिरत आहेत. आपला जीव वाचावा म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत एका जबाबदार पदावर राहिलेले भाजपचे नेते रेमेडेसिवीर ओषधाची साठेबाजी करतात हे मानवतेविरोधात आहे."

प्रियंका गांधी यांनी ही प्रतिक्रिया ट्वीट केली असून यात एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. प्रतिक्रिया देत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस पोलिसांशी चर्चा करत असताना दिसतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यावसायिक हा भाजपचा कार्यकर्ता असल्याने त्यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला गेले असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

ते म्हणाले, "भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून व्यावसायिकाला वाचवण्यापेक्षा जनतेला मदतीसाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसीवीरचा पुरवठा करू नये असा आदेश काढणे निषेधार्थ आहे. सरकार जनतेचे असते त्यात राजकारण असू नये.

काय घडले?

दमणच्या ब्रुक फार्मा (Bruck Pharma) या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी (17 एप्रिल) मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतलं.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आक्षेप नोंदवला.

विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून रेमडेसिवीर दिलं जात असल्याने मंत्र्याचा सहायक धमकी देतो तसंच पोलीस त्यामुळेच ताब्यात घेतात असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तर व्यावसायिकाला वाचवण्यासाठी फडणवीस पोलीस स्टेशनला का गेले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला.

'पोलिसांवर दबाव नको'

याप्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबत सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलंय.

दिलीप वळसे पाटील, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Facebook

याला प्रत्युत्तर देत असताना "मी अशा कारवाईच्या धमक्यांना भीक घालत नाही." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

'रेमडेसिवीर सरकारलाच देणार होतो'

रेमडेसीवीरचा हा साठा राज्य सरकारला देणार होतो तसंच यासंदर्भात संबंधिक मंत्र्यांच्या सचिवांशी बोलणे झाले होते असा दावा भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

सरकारने आवाहन केले आम्हाला सहकार्य करा आता आम्ही सहकार्य करत आहोत तर आरोप केले जात आहेत असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)