कोंबड्याने घेतला मालकाचा जीव, कोर्टात हजर केलं जाणार

कोंबडा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

तेलंगणात कोंबड्यांच्या अवैध झुंजीत एका कोंबड्याच्या पंज्यावर चाकू बांधला होता. या कोंबड्याने आपल्याच मालकाचा जीव घेतला.

हा कोंबडा निसटायचा प्रयत्न करत होता. या दरम्यान झालेल्या झटापटीच त्याच्या पंजावर बांधलेल्या चाकूने मालकाला गंभीर इजा झाल्या. मालकाला दवाखान्यात दाखल केलं पण प्रचंड रक्तस्राव झाल्याने मालकाचा जीव गेला.

पोलीस आता त्या 15 लोकांचा शोध घेत आहेत ज्यांनी ही कोंबड्यांची झुंज अवैधरीत्या आयोजित केली होती. ही घटना तेलंगणातल्या लोतुनुर गावात घडली आहे.

या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कोंबड्याला पोलीस स्टेशनात नेण्यात आलं ज्यानंतर त्याला एका शेतावर पाठवून दिलं. पोलिसांचं म्हणणं आहे की कोंबड्याला झुंजीसाठी सज्ज केलं जात होतं तेव्हाच त्याने निसटायचा प्रयत्न केला.

मालकाने त्या कोंबड्याला पकडण्याच प्रयत्न केला. या कोंबड्याच्या पायाला 7 सेंटीमीटर लांब चाकू बांधला होता. कोंबडा आणि मालकाच्या झालेल्या झटापटीच या चाकूने मालकावर वार झाले आणि तो जखमी झाला.एएफपी या वृत्तसंस्थेनुसार या झुंजीचं आयोजन करणाऱ्या तसंच यात सहभागी असणाऱ्या लोकांबर खून, अवैध सट्टेबाजी आणि कोंबड्यांच्या झुंजीचं आयोजन केल्याचा आरोप लावला आहे.

याआधीही कोंबड्यांनी घेतलाय मालकाचा जीव

द न्यू इंडियन एक्सप्रेसनुसार स्थानिक पोलीस अधिकारी बी जीवन यांनी म्हटलं की कोंबड्याला पुढच्या तारखेला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

भारतात कोंबड्यांच्या अवैध झुंजीवर 1960 साली बंदी घालण्यात आली होती पण तेलंगणाच्या ग्रामीण भागात आजही याचं काही ठिकाणी आयोजन केलं जातं.

कोंबड्यांच्या झुंजी सहसा मकर संक्रांतीच्या दरम्यान आयोजित केल्या जातात.

कोंबड्याने आपल्या मालकाची हत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.

गेल्या वर्षी आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्याच्या पायाला बांधलेल्या ब्लेडने गळा चिरल्या गेल्यामुळे मृत्यू झाला होता.

सीएनएननुसार मालक आपल्या कोंबड्याला झुंजीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली आणि त्या मालकाचा मृत्यू झाला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)