पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात चर्चेत असलेल्या अरुण राठोडच्या घरी चोरी

पूजा चव्हाण

फोटो स्रोत, Instagram

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या, अरूण राठोडच्या घरी चोरी झालीये. अरुणच्या वडीलांनी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल केलीये.

परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल शहाणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अरूणच्या घरी चोरी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

त्याचवेळी, संजय राठोड गुरुवारी 18 तारखेला आपली बाजू मांडतील असं पोहरादेवीचे महंत यांनी सांगितलं आहे. संजय राठोड यांना समर्थन देण्यासाठी यवतमाळमध्ये हालचालीही सुरू झाल्या आहेत. असं वृत्त एबीपी माझानं वृत्त दिलं आहे.

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर एक ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या ऑडियो क्लिपमध्ये अरुण राठोडचं नाव आहे. यात, महाविकास आघाडी सरकारमधील एका कथित मंत्र्यासोबत अरूण राठोड बोलत असल्याचं समोर आलं आहे.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

अरुणच्या घरी चोरी म्हणजे, या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असा आरोप, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

कुठे झाली चोरी?

अरुणचे कुटुंबीय बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात रहातात. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अरुणचं नाव पुढे आल्यानंतर त्याचं कुटुंब बेपत्ता झालं होतं.

चार दिवसांनंतर घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत बीबीसीशी बोलताना परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल शहाणे सांगतात, "अरुणच्या वडिलांनी घरात चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. 1 लाख रूपये कॅश आणि 80 हजार रूपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे."

"पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. विविध दिशांनी पोलीस तपास करत आहेत. तपासात आढळून येणाऱ्या गोष्टींवर पुढील कारवाई केली जाईल," असं एपीआय विशाल शहाणे पुढे म्हणाले.

कोण आहे अरूण राठोड?

पूजाचा मृत्यू झाला त्यादिवशी अरुण पूजासोबत होता अशी माहिती आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये अरुण महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यासोबत बोलत असल्याचं समोर आलं आहे. या संभाषणात अरुण, या मंत्र्याला पूजा आत्महत्येचा विचार करत असल्याचं सांगताना ऐकू येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पूजाच्या मृत्यूनंतर अरूण गावात परतलेला नाही.

"हा पुरावे दाबण्याचा प्रयत्न"

अरुण राठोडच्या घरी चोरी झाल्याप्रकरणी भाजपने ही प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, "अरूण राठोडच्या घरी चोरी होणं हे संशयास्पद आहे. राज्य सरकारमधील उच्चपदस्थ या प्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत." असा आरोप त्यांनी केलाय.

सोशल मीडियावर लिक झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये सरकारमधील कथित मंत्री अरूणला पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप घे, असं सांगत आहे. पूजाच्या मृत्यूनंतर तीचा लॅपटॉप अद्याप मिळाला नसल्याची माहिती आहे.

"या प्रकऱणी गुन्हा दाखल होऊन अरूणला संरक्षण देण्यात आलं पाहिजे होतं. ऑडियो क्लिप तपासण्यात आल्या नाहीत. लॅपटॉप जप्त करण्यात आला नाही. कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले नाही." असं अतुल भातखळकर पुढे म्हणाले.

कॅबिनेटमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप

पूजाच्या मृत्यूप्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप भाजपने केला आहे. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे.

संजय राठोड

फोटो स्रोत, facebook

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

मंगळवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेना नेत्यांनी ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)