वामिका : विराट-अनुष्काच्या मुलीचं नाव ठरलं, सोशल मीडियावर फोटो शेअर

फोटो स्रोत, AnushkaSharma
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या मुलीटं नावं वामिका असं ठेवलं आहे. नुकताच सोशल मीडियावर आपल्या मुलीचा फोटो टाकून त्यांनी हे जाहीर केलं.
गेल्या महिन्यात मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फोटो शेअर केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिघांचा फोटो शेअर करून लिहिलं, "आम्ही एकमेकांसोबत आजवर सुखशांती, साथ आणि कृतज्ञतेने संसार करत आलोय. पण या छोटुकलीने, वामिकाने, आम्हाला वेगळ्याचं जगात नेलंय!
काही क्षणात आम्हाला अश्रू, हास्य, काळजी, आनंद अशा वेगवेगळ्या भावनांचा प्रवास घडतो. झोप अजूनही दुर्मिळच आहे, पण आमची हृदय आनंदाने भरलेली आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना, सकारात्मक उर्जा शुभेच्छांसाठी धन्यवाद."
या आधी विराट आणि अनुष्काने माध्यमांना विनंती केली होती की त्यांच्या मुलीचे फोटो काढू नयेत आणि प्रकाशित करू नयेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)