कोरोना लस : भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन'ला आपात्कालीन वापरासाठी परवानगीची शिफारस

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

भारत बायोटेकच्या कोरोनावरील लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस DCGI च्या तज्ज्ञांच्या समितीने केल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी ANI वृत्तसंस्थेला दिली आहे.

कोव्हॅक्सिन (Covaxin) असं भारत बायोटेकच्या कोरोनावरील लशीचं नाव असून, ही लस भारतीय बनावटीची आहे.

ड्र्ग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ही संस्था लशीच्या वापरासंदर्भात अंतिम निर्णय घेते. या संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकच्या लशीची शिफारस केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस भारत बायोटेक कंपनीने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीसोबत मिळून तयार केली आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने कोव्हॅक्सिनच्या आधी पोलिओ, रोटा व्हायरस आणि झिका व्हायरसवरील लसही विकसित केली आहे.

कोरोना लस

फोटो स्रोत, SOPA IMAGES

कोव्हॅक्सिन ही भारत सरकारने आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली दुसरी लस ठरली आहे.

कालच (1 जानेवारी 2020) ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनकाद्वारा विकसित 'कोव्हिशिल्ड' लशीला केंद्र सरकारच्या एसईसीने (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी) आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्डच्या उत्पादनाची जबाबदारी आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)