कोरोना लस : ’ड्राय रन' म्हणजे नेमकं काय? ती कशी पार पडते?

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रातल्या पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांध्ये आज (2 जानेवारी) कोरोना लशीची 'ड्राय रन' केली जाणार आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना याविषयी सांगितलं, "महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून कोरोना लशीचं ड्राय रन पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांध्ये 2 जानेवारीला होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात लशीकरणासाठी 3 केंद्र असतील आणि प्रत्येक केंद्रावर 25 जणांना लशीकरणासाठी निवडलं जाईल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दरम्यान, देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
2 जानेवारीला देशातील सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच 'ड्राय रन' घेतली जाईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
देशात प्रत्येक राज्यात कमीत कमी 3 ठिकाणी ही 'ड्राय रन' केली जाईल. काही राज्यांनी जिल्ह्यांचाही समावेश या ड्राय रनमध्ये केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन आणि राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी लसीकरणसंदर्भात राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला, असं केंद्र सरकारने सांगितलं.
ड्राय रन म्हणजे काय?
ड्राय-रन हा एक सराव किंवा रंगीत तालीमप्रमाणे आहे. यामध्ये कोव्हिड-19 ची लस आल्यानंतर लसीकरण मोहीम कशा प्रकारे राबवली जाईल, त्यासाठी काय तयारी करावी लागेल, या गोष्टींचा विचार केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
लसीकरण मोहिमेत कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्या अडचणी कशा प्रकारे दूर केल्या जातील, हे सुद्धा यावेळी तपासलं जाईल.
यानंतर 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना ही लस प्राधान्याने दिली जाणार आहे.
राज्यांकडून याबाबतचा डेटाबेस तयार केला जात आहे. यासाठी को-विन या अप्लीकेशनवर फॉर्म भरून सर्वप्रथम लोकांची नोंदणी करून घेतली जाईल. त्यानंतर लसीकरणाची तारीख, वेळ आणि केंद्र लोकांना मॅसेज करूनच कळवण्यात येणार आहे.
ड्राय रनसाठी कशी आहे तयारी?
केंद्र सरकारने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, को-विन मोबाईल अपचा वापर स्थानिक पातळीवर कसा केला जातो, हे पाहणं या ड्राय रनचा प्रमुख उद्देश आहे.
याशिवाय लसीकरण करण्याच्या प्रक्रियेचं नियोजन कशा पद्धतीने चालतं, यामध्ये समन्वय राखण्यात कोणती आव्हानं येऊ शकतात, हे पाहिलं जाईल. यामुळे ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.
हे सगळं काम 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीनुसारच केलं जाणार आहे. प्रभारी अधिकाऱ्याला लसीकरणासाठी निवडण्यात आलेल्या 25 लोकांची ओळख पटवावी लागेल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला या सर्वांची माहिती को-विन अॅपवर अपलोड करावी लागेल. हे सगळं काम एका मॉक-ड्रिलप्रमाणे असेल. प्रत्यक्षात कुणाला लस दिली जाणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात अजूनही कोणत्याही लशीला मंजुरी मिळालेली नाही. ड्राय रनचा उद्देश लस देणं नव्हे तर लसीकरण प्रक्रिया योग्य प्रकारे अंमलात येईल किंवा त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं गरजेची आहे, हे तपासणं आहे.
देशातील लसीकरणासाठी सुमारे 96 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे, असं केंद्र सरकारने कळवलं आहे.
आपण लशींच्या वितरणासाठी तयार आहोत, असं देशाच्या सर्वोच्च कार्यालयातून सांगितलं जातं, तेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो. आरोग्य कर्मचारी आणि शास्त्रज्ञांमध्ये यामुळे उत्साह निर्माण होईल, असं CSIR चे संचालक डॉ. शेखर मांडे यांनी सांगितलं.
चार राज्यांमध्ये आधीही झाली ड्राय रन
देशात आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात आणि पंजाब या चार राज्यांमध्ये कोव्हिड-19 लशीची ड्राय-रन 28 डिसेंबरला सुरू करण्यात आली होती. हे दोन दिवस चाललं.
आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात, गुजरातच्या राजकोट आणि गांधीनगर, पंजाबात लुधियाना आणि शहीद भगत सिंह नगर (नवांशहर) तर आसामच्या सोनीतपूर आणि नलबाडी या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
या ठिकाणी ड्राय रन यशस्वी ठरल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. तसंच यावेळी राज्यांनी दिलेल्या सूचनांचीही नोंद घेण्यात आली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








