BRICS परिषद: नरेंद्र मोदी म्हणतात, 'दहशतवाद ही जगासमोरची सर्वांत मोठी समस्या'

फोटो स्रोत, ANI
"आज दहशतवाद ही जगासमोरची सर्वांत मोठी समस्या आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदी ब्रिक्स देशांच्या 12 व्या शिखर परिषदेमध्ये बोलत होते. ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिषदेत सहभागी झाले होते.
कोरोना साथीमुळे यावेळी ब्रिक्स देशांची ही परिषद ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दहशतवाद ही जगासमोरची सर्वांत मोठी समस्या असल्याचं सांगताना मोदींनी म्हटलं, "दहशतवादाला समर्थन आणि मदत देणाऱ्या देशांनाही दोषी ठरवलं जाईल, हेही आपण पहायला हवं. या समस्येला आपण सगळ्यांनी मिळून सामोरं जायला हवं."
दहशतवादाबरोबरच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचंही यावेळी बोलताना मोदींनी म्हटलं.
अनेक जागतिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, कारण कालानुरुप यात बदल घडवले गेले नाहीत.
"संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करणं अतिशय आवश्यक आहे आणि या बाबतीत भारताला ब्रिक्स देशांकडून समर्थनाची अपेक्षा आहे," असं मोदींनी म्हटलं.
WHO, WTO किंवा IMF सारख्या संस्थांमध्येही सुधारणांची गरज असल्याचंही मोदींनी म्हटलं.
कोव्हिडनंतर जगाची अर्थव्यवस्था सावरण्यात ब्रिक्स देशांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असंही मोदींनी म्हटलं.
रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगही या परिषदेत सहभागी झाले होते.
मोदींनी आपल्या भाषणादरम्यान पुतीन यांचा उल्लेख केला, त्यांची स्तुती केली. मात्र त्यांनी एकदाही जिनपिंग यांचं नाव घेतलं नाही.
जिनपिंगही मोदींच्या भाषणाच्या वेळेस कॅमेऱ्यात पाहण्याऐवजी इकडे-तिकडे पाहत होते.
काय आहे ब्रिक्स?
ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समूह आहे. आधी यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश नव्हता. तेव्हा हा गट केवळ 'ब्रिक' म्हणूनच ओळखला जायचा. 2010 साली दक्षिण आफ्रिका सहभागी झाल्यानंतर हा समूह 'ब्रिक्स' बनला.
ब्रिक्स देशांची पहिली परिषद 2009 साली झाली होती. त्यानंतर दरवर्षी ही परिषद सदस्य देशांमध्ये आयोजित केली जाते. यावर्षी ही परिषद रशियाममध्ये 21-22 जुलैला होणार होती. पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि आता 17 नोव्हेंबरला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडत आहे.
पुढचं संमेलन भारतात होणार आहे, पण त्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर








