नरेंद्र मोदींनी लष्करी गणवेश घातल्यामुळे एवढा गहजब का?-सोशल

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, TWITTER

गेल्या काही वर्षांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीचा सण जवानांसोबतच साजरा केला.

यावर्षी मोदी राजस्थानमधील जैसलमेर इथे होते. जैसलमेरमधल्या लोंगेवाल पोस्ट इथं मोदी यांनी दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पाकिस्तानचाही उल्लेख आपल्या भाषणात केला.

पंतप्रधानांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत, लष्करप्रमुख एम एम नरवणे आणि बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थानाही उपस्थित होते.

जैसलमेर लोंगेवाला पोस्टवर जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, "जगातली कोणतीही शक्ती आपल्या वीर जवानांना देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यापासून रोखू शकत नाही."

पंतप्रधान मोदी या दरम्यान रणगाड्यातही बसले होते. त्यावेळी त्यांनी लष्करी पोशाख घातला होता. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या फोटोत ते लष्करी पोशाखासह रणगाड्यात बसलेले दिसत होते.

त्यांच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. लोकशाहीमध्ये एखाद्या बिगरलष्करी नेत्याला किंवा नागरिकाला लष्करी पोशाख परिधान करण्याचा अधिकार आहे? लोकशाहीत बिगरलष्करी नेतृत्वानं अशा तऱ्हेनं सैनिकी गणवेश घालणं किती योग्य आहे? असे प्रश्नही विचारले गेले.

या मुद्द्यावर लष्करातून रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांनीही आपली मतं व्यक्त केली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

लेफ्टनंट जनरल एच एस पनाग (सेवानिवृत्त) यांनी ट्वीट करून उपहासानं म्हटलं, "सॅल्यूट! पीएम लीडिंग फ्रॉम दि फ्रंट"

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

कौस्तुभ (@___kaustubh) यांनी पंतप्रधानांच्या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, "त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट एक फॅन्सी ड्रेस इव्हेंट आहे. हा युनिफॉर्म मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे त्यांना माहित नाहीये. ते केवळ आपल्या भक्तांना खूश करण्याच्या आणि वेगवेगळ्या पोशाखात मॉडेलिंग करण्याची आपली बालपणीची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

लेफ्टनंट जनरल प्रकाश कटोच (निवृत्त) यांनी ट्वीट करून म्हटलं, "आपण कोठे हल्ला करण्याच्या तयारीत आहोत-डेपसांग?"

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

पनाग यांनी या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं, "सर, मला पूर्ण विश्वास आहे की, ते तिथेही गेले असतील. गोपनीय!"

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

ब्रिगेडियर जय कौल यांनी लिहिलं आहे की, "कोणता कायदा आर्म्ड फोर्सेस किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसचा गणवेश घालण्याची परवानगी देतो? हे योग्य नसल्याचं कोणीतरी त्यांना सांगावं."

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

एका युजरनं लिहिलं आहे, "ओह, मला वाटलं की हे गलवान असेल."

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

पनागने याबद्दल लिहिताना म्हटलं, "ते नक्कीच डीबीओ, गलवान, पँगोन्ग, कैलास या ठिकाणी गेले असतील. पण हे दौरे गोपनीय आहेत. त्यांना पब्लिसिटी आवडत नाही. महान नेता!"

प्रशांत टंडन नावाचे एक यूजर विचारतात की, "लोकशाहीत निवडून आलेल्या नेत्यानं आर्मी युनिफॉर्म घातला पाहिजे?"

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

ते पुढे लिहितात, "सैनिकांसोबत सहभावना दाखविण्याच्या हेतून प्रतीकात्मक कॅप किंवा जॅकेट घालणं योग्य आहे. पण पूर्ण युनिफॉर्म? या युनिफॉर्मवरची चिन्ह ही पीएम, संरक्षण मंत्री किंवा तिन्ही सेनादलांचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींसाठी डिझाइन केली गेली नाहीत."

उपहासाने त्यांनी असंही म्हटलं की, "लोंगेवाल लेहपासून 1,500 किलोमीटर लांब आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 9
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 9

एका युजरनं मोदी यांनी लष्करी गणवेश घालण्याचं समर्थन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "सुभाषचंद्र बोसही आर्मीत नव्हते. पण ते लष्कराचा गणवेश घालायचे. सैनिकच तो देत असतात. प्रमोशनसाठी सैनिकांमध्ये पोहोचलेल्या एसएसआर, वरुण धवनच्या बाबतीतही असं झालं होतं. त्यांनी सैनिकांचं मनोबल वाढवलं ही महत्त्वाची गोष्ट आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 10
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 10

सिस्तला सत्यनारायण यांनी लिहिलं आहे की, "जर मोदी राजकारणी नसते तर ते बॉलिवूडमध्ये असते. लष्करी पोशाखाबद्दलचं त्यांचं आकर्षण सामान्य आकलनापलीकडचं आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 11
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 11

एका युजरनं लिहिलं आहे, "घाबरू नका. जर ते राजकारणातून निवृत्त झालेच, तर ते नक्कीच बॉलिवूडमध्ये जातील."

"ते एक महान नेते आहेत आणि त्यांच्यासारखा पंतप्रधान आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य आहे," असं एका युजरनं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)