नितीश कुमार - ही बिहार विधानसभा निवडणूक माझी शेवटची निवडणूक

नितीश कुमार, बिहार

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES/GETTY IMAGES

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड पक्षाचे नेते नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं प्रचारसभेत सांगितलं आहे.

बिहारमधील पूर्णिया इथं सुरू असलेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीसह तसंच एकदा काँग्रेस राजदबरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवलेलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आज ( गुरुवार, 5 नोव्हेंबर) केलेलं विधान हे मतदारांना शेवटच्या क्षणी केलेलं भावनिक आव्हान म्हणून पाहिलं जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत अँटी-इन्कंबंसी म्हणजेच सत्ताविरोधी लाट असल्याचं सांगितलं जात आहे. याचा फटका जनता दल (संयुक्त)ला बसू शकतो. पण याचा अर्थ जेडीयू पूर्णपणे कमकुवत स्थितीत आहे, असं तज्ज्ञांना वाटत नाही.

कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना आलेल्या अडचणी त्यांना घरी परतताना निर्माण झालेल्या समस्या यांच्यावरून नितीश कुमार यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

स्थलांतरित मजूर नितीश कुमार यांच्यावर नाराज असून त्यांचं मतदान विरोधात जाऊ शकतं, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

चिराग पासवान नितीश कुमार यांच्या विरोधात उभे ठाकल्याने आणि जनता दलाविरोधात उमेदवार उभे केल्याने निर्माण झालेला धोका मोठा नाही, त्याचा मतदानावर काहीच परिणाम होणार नाही, असंच जनता दल आणि भाजपला वाटतं.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी सांगतात, "NDA ही एक बेजोड आघाडी आहे. चिराग पासवान यांना जनतेमधला असंतोष समजून येत आहे

कमल नोपानी म्हणतात, "आम्ही नितीश कुमार यांच्या 15 वर्षांचा कार्यकाळ पुढे ठेवून मत मागण्यासाठी जाणार आहोत. लोकजनशक्ती पार्टी फक्त वोटकटवा पार्टी म्हणून शिल्लक राहील. त्यांच्यासारखे लोकच बिहारच्या विकासात बाधा निर्माण करत आहेत."

पत्रकार अरुण पांडेय यांच्या मते, "आतापर्यंत ही निवडणूक NDA विरुद्ध महागठबंधन अशी होती. पण आता लोकजनशक्ती पार्टी स्वबळावर लढत असल्यामुळे रंजक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिरंगी निवडणूक पाहायला मिळू शकते. लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवारांमुळे जनता दलाचं नुकसान होण्याची शक्यता आहे."

नितीश विरुद्ध तेजस्वी

बिहारमध्ये यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्याविरुद्ध तुल्यबळ पर्याय दिसून येत नाही.

अनुभवी नितीश कुमार यांच्याविरुद्ध नवोदित तेजस्वी यादव अशी ही लढाई आहे. नितीश कुमारांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळू शकतो, असं पांडेय यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)