मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजीराजेंना नरेंद्र मोदींनी दिली नाही वेळ

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना 3 पत्र पाठवली आहेत, त्यांची उत्तरं अपेक्षित आहेत, असं खासदार सभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या काळामुळे मोदी भेट टाळत असावेत, असं सुद्धा त्यांनी पुढे म्हटलं आहे.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मनमोकळी उत्तरं दिली आहेत. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश :
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
प्रश्न - सरकारी वकील उशिरा पोहोचले, सरकार गंभीर नाही, सक्षमपणे भूमिका मांडत नाही, असे आता सरकारवर आरोप होत आहेत. तुम्ही याकडे कसं पाहाता?
उत्तर - प्रामुख्याने या 20-25 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. अशोकरावांशी माझं बोलणं झालेलं आहे. वेळोवेळी मी स्पष्टपणे हीच भूमिका मांडली आहे की आपलं नियोजन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कोऑर्डिनेशन नीट असलं पाहिजे. सामान्य प्रशासनाच्या सचिवांनी हे कोऑर्डिनेशन केलं पाहिजे. आणि ज्याची मला भीती होती, तेच आज झालं आहे. कोऑर्डिनेशन नीट झालं नाही त्याचे बरेच फटके आज आपल्याला पाहायला मिळाले.
प्रश्न - पण, सुप्रीम कोर्टाने सरकारला आता संविधान पीठाकडे जाण्याची परवानगी दिली आहे. संविधान पीठाकडे हा मुद्दा जाणार असेल तर तो लवकर निकालात निघेल असं नाही का वाटत तुम्हाला?
उत्तर - तिथं विषय जायलाच पाहिजे, त्यात काही दुमत नाही. माझं सरकारला तेच म्हणणं होतं. पण जेव्हा 18 तारखेला एक वर्षासाठी स्थिगिती मिळाली तेव्हा सरकारनं कोर्टात पत्र काय दिलं की ऍप्रोप्रिएट बेंच द्यावं. आता ऍप्रोप्रिएट बेंच म्हणजे काय? आता कालच माजी मुख्यमंत्री म्हणतात ही के घटनापीठाकडे जावं ही चांगली बाब आहे. पण माझा प्रश्न आहे की जी भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारनं मांडायला पाहिजे त्याच्याआधीच तुम्ही काल हे जाहीर करून टाकलीत. हा एक मुद्दा आहे आणि त्यापेक्षा जेव्हा ऍप्रोप्रिएट बेंचचा मुद्दा तुम्ही मांडलात तेव्हाच हा विषय मांडायला हवा होता ना की लार्जर बेंचकडे हा विषय जायला पाहिजे. प्लॅनिंगच नाही ना कुठल्या बाबतीत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - तुम्ही आक्रमकपणे मराठा आंदोलनाचं नेतृत्व हाती घेतलं आहे. तुम्ही चेहरा झाला आहात आंदोलनाचा. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचा पाठिंबा आहे, ते झालं पाहिजे ही सर्वांची भूमिका आहे. मग आताची आंदोलनं कुणावर दबाव टाकण्यासाठी आहेत. सुप्रीम कोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का? पण त्यांनी हे प्रकरण संविधान पीठाकडे ऑलरेडी दिलं आहे.
उत्तर - नाही ते आज सांगितलं असेल, पण विषय हा न्यायप्रविष्ट असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर प्रेशर टाकण्याचा काही विषयच नाही. प्रेशर कुणावर टाकायला पाहिजे तर सरकारवर टाकायला पाहिजे. आज सरकार महाविकास आघाडीचं आहे. पूर्वी दुसरं सरकार असेल. तो अधिकार आहे. पण तुम्ही जर सरकारवर प्रेशरच टाकलं नाही ते निवांत राहीले तर काय करणार? आज बघा ना एवढं प्रेशर टाकूनसुद्धा चुका केल्याच ना त्यांनी. आज ही काय साधी चूक आहे की सरकारी वकिलच सुनावणीला हजर नाही.
प्रश्न - नाही पण ते नंतर सागण्यात आलं की तांत्रिक अडचणींमुळे मुकुल रोहतगी येऊ शकले नाहीत.
उत्तर - हे काय उत्तर नाही ना. आज एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे ते नव्हते मुकुल रोहतगी. पण त्यांचा ज्युनिअर वकील होताच ना इथं. तो का आला नाही. त्यानी का सांगितलं नाही की असे असे रोहतगी अडचणीत आहेत आणि आम्हाला टाईम द्या म्हणून.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - तुमचे मोदी आणि फडणवीसांशी चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा आता तुमचं ऐकत आहेत असं दिसतंय मग घटना दुरुस्तीसाठी तुम्ही आता पुढाकार घेणार आहात का?
उत्तर - छत्रपतींचा ऍडव्हान्टेंज हा असतो की या घराण्यात जन्म झाल्यामुळे सर्वांशी संबंध चांगले असतात आणि तेही आपल्याला सन्मानपूर्वक वागवतात. तिथं माझी गरज असेल समन्वय घडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे. माझं देवेंद्र फडणवीसांशीसुद्धा बोलणं असतं. उद्धवजींशीसुद्धा बोलणं असतं. मी नरेंद्र मोदींकडेसुद्धा टाईम घेतला आहे, पण तो टाईम आम्हा सगळ्या खासदारांना मिळाला नाही. पण जिथं समन्वयाची गरज आहे तिथं मी नक्की लक्ष घालेन. पण हा न्यायप्रविष्ट विषय असल्याने आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागणार आहे. त्यात वेगवगेळे मार्ग आहेत. हाच एसीबीसी काही एकमेव मार्ग आहे असं काही नाही. त्याला वेगवेगळे मार्ग आहेत ते आपण टप्प्याने घेऊ.
प्रश्न - तुमचा मोदींशी नेमका काय पत्रव्यवहार झाला आहे. भेटीसाठी नेमकी कधी वेळ मागितली होती?
उत्तर - जेव्हा पार्लमेंट सुरू होतं तेव्हा मी सर्व खासदारांना आवाहन केलं होतं की आपला 85 टक्के गरीब मराठा समाज जो बहुजन समाजाचा घटक आहे, आपल्या ज्या व्यथा आहेत त्या आपण मोदींना सांगू. बहुतांश शिवसेना आणि भाजपचे खासदार असतील, राष्ट्रवादीचे तर पवार साहेबांनी सांगितलं की आमचे सगळे खासदार येतील. काँग्रेसच्या खासदारांनीसुद्धा सपोर्ट केला. तर या व्यथा मांडण्यासाठी मी त्यांच्याकडे वेळ मागत होतो, पण त्यांनी ती वेळ दिली नाही. त्याला कारण असं आहे की कोरोना महामारीच्या एवढ्या संकटात एवढ्या सगळ्या खासदारांशी कसं काय भेटणार? हा त्यांचा उद्देश असावा पण मी आजही आशा करत आहे की त्यांनी आम्हाला वेळ द्यावा.

फोटो स्रोत, NARENDRA MODI
प्रश्न - पण मोदी व्हर्च्युअल मिटिंगच्या माध्यमातून सर्वांशी बोलत आहेत. त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला आहे का?
उत्तर - मी मोदींना 3 पत्र पाठवलेली आहेत. त्याचं उत्तर अपेक्षित आहे.
प्रश्न - तुमची भूमिका सतत भाजपच्या मिळतीजुळती असते, भाजप सरकारने तुम्हाला खासदार केलं आहे, देवेंद्र फडणवीसांची स्तुती करता मग, तुम्ही भाजपच्या बाजूने आहात हे मान्य का करत नाहीत. तुम्ही दरवेळी माझ्यासाठी सगळे सारखे आहेत असं का बोलता.
उत्तर - आज हा प्रश्न तुम्ही का विचारत आहात याची मला कल्पना नाही. विषय मराठा आरक्षणाचा आहे. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. सन्मानपूर्वक त्यांनी मला बोलवलं आहे आणि मी सन्मानपूर्वक इथं आलो आहे. तेही माझ्याकडून पक्षीय भूमिकेची अपेक्षा करत नाहीत. मी समाजासाठी काम करत आहे आणि त्यांनी दिलेलं आहे मला हे फ्रीडम. सारखा हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे. माझं काम पाहा. काय पक्ष पक्ष करत आहात तुम्ही? राजा असूनसुद्धा आज प्रजेसारखं काम करत आहे.
प्रश्न - कामावर बोलणं विचारणं योग्यच आहे, पण एखाद्या पक्षाच्या बाजूची भूमिका घेण्यात गैर काय आहे?
उत्तर - ज्यावेळी भूमिका घ्यायची आहे तेव्हा घेतो. जे बरोबर आहे ते बरोबर म्हणतो. जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणतो. आणि छत्रपतींना तो व्हीटोच आहे की आम्हाला आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही वागणार. पण मग त्यावेळी त्यांनी विचार करायला पाहिजे होता की यांना घ्यायचं की नाही घ्यायचं. यांना तो सन्मानपूर्वक करायचं की नाही. इथं त्यांनी सन्मान दिला म्हणून त्यांचे आभारही मानतो. जाहीर आभार मानतो.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - तुम्ही छत्रपतींचा व्हीटो बोलत आहात पण आपण लोकशाहीमध्ये आहोत. आणि तुम्ही लोकशाही नियुक्त खासदार आहात.
उत्तर - नाही लोकशाहीत खासदार असलो तरी मी म्हणत नाही ना की मी संभाजीराजे आहे. लोकच म्हणतात ना संभाजीराजे आहे. युवराज महाराज म्हणतात लोक. का म्हणतात? तो लोकांचा आदर आहे. जो आदर मिळतो तो आम्ही लोकांच्या सेवेसाठी देतो. पण जिथं पार्लमेंटला सपोर्ट करायचा आहे, मी त्यांना सपोर्टच करतो. 102, 103 ला मी त्यांना सपोर्ट केलेलाच आहे.
प्रश्न - तुम्ही निवड़णुकीच्या राजकारणात येणार आहात का?
उत्तर - अजून मला 2 वर्षं आहेत राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचे. 2 वर्षं एन्जॉय करू द्याला ना मला लोकांच्यासाठी. पुढं पाहू.
प्रश्न - छत्रपती घराणी सर्वांची आहेत. पण अलिकडच्या काळात ही घराणी एका विशिष्ट जातीपुरती मर्यादित होताना दिसत आहेत असं नाही का वाटतं? प्रकाश आंबेडकरांनीसुद्धा यावरून टीका केली होती.
उत्तर - साफ चुकीचा प्रश्न आहे. माझ्या भाषणाची सुरुवातच शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींसाठी स्वराज्य कसं आणलं अशी असते. राजर्षी शाहू महारांजी जे माझे पणजोबा आहेत त्यांनी बहुजन समाजाला न्याय दिला. आता मला सांगा जर शाहू महाराजाचं धोरण होतं की बहुजन समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे तर आज मराठा समाज त्यात नाहीये. 1967पर्यंत सेंटरमध्ये आरक्षण होतं. आता या गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही नाही घ्यायची का. आणि असं कोण म्हणतंय की मी दुसऱ्या समाजाचं करत नाही. मी जाहीरपणे बोलतो की मी फक्त आरक्षणारपुरता मराठा समाजाबरोबर आहे नंतर परत माझा बहुजन समाजच आहे. धनगर समाजाला जाहीरपणे पाठिंबा देतो. या मिनिटाला मराठा समाजाला माझी गरज आहे म्हणून मी त्यांच्या बरोबर आहे.
प्रश्न - दोन राजे एकत्र का येत नाहीयेत. वारंवार दिसून आलं आहे की तुम्ही एकमेकांच्या सोमर येणं टाळत आहात, आरक्षण आम्हाला नाही, तर कोणालाच नाही. अशी भूमिका अत्यंत चुकीची आहे, असा टोला सुद्धा तुम्ही त्यांना हाणला आहे.
उत्तर - मी केव्हाच नाही म्हटलेलं नाही, माझं आणि त्याचं एकदम चांगलं आहे. माझे आणि त्यांचे नेहमी फोन होतात, नेहमी चर्चा होते. आता एका कार्यक्रमाला त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते आले नसतील. उद्या कुठल्याही कार्यक्रमाला मी तयार आहे. मी तर केव्हाही तयार आहे. काहीच माझ्या मनात खोट नाही. मी पवार साहेबांना टोला मारत नाही तर त्यांना का मारू. ते तर आमचे भाऊ आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी मागणी केली ही उदयनराजेंनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं, तुम्हाला असं वाटतं का?
उत्तर - त्यांनी नेतृत्व करावं आनंदाची बाब आहे.
प्रश्न - तुमचे वडील शाहू छत्रपती यांनी बीबीसीच्या मुलाखतीत मराठ्यांना एकत्र आणणं हे इतिहास काळापासून कठीण आहे असं म्हटलंय. त्याचा तुम्हाला पत्यय आला आहे का?
उत्तर - नाही ते पूर्वी पासून आहे. अडचणी आहेतच की मराठा समाज एकत्र होत नाही. तो लढवय्या समाज आहे. त्यामुळे सर्वांना वाटतं की मीच मोठा आहे. आणि ठीक आहे पार्ट ऍन्ड पार्सोल ऑफ लाईफ आहे ते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
प्रश्न - काय कारण आहे मराठे एकत्र येत नाहीत. कायम त्यांना दुहीचा का शाप आहे. तुम्ही मराठा इतिहासाचा जवळून अभ्यास केला असेलच.
उत्तर - हा अवघड प्रश्न आहे, एका प्रश्नात लगेच याचं उत्तर देता येणार नाही. अनेक कारणं आहेत. सध्याचा टप्पा पाहिला तर जो 15 टक्के श्रीमंत मराठा वर्ग आहे त्याने 85 टक्के गरीब वर्गाला ज्या पद्धतीनं वर काढायला पाहिजे होतं ते झालं नाही. त्यांची गरिबी दूर झाली नाही. पण या प्रश्नाचं उत्तर एका प्रश्नात देता येणार नाही हा इतिहास आहे साडेतिनशे वर्षांचा.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )








