नारायण राणे :आदित्य ठाकरे सुशांतसिंह प्रकरणी कोठडीत जाईल

स

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर टीका केली.

त्यावर नारायण राणे यांनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन, उद्धव ठाकरेंनी या वेळचा दसरा मेळावा मुलाला क्लिनचिट देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. "मी पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा राखली, मात्र याला अपवाद सध्याचे मुख्यमंत्री आहेत. कसलाही ताळमेळ नसलेले, निर्बुद्ध आणि शिवराळ मुख्यमंत्री. ज्याप्रकारे ते बोलत होते, तसं भाषण कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नव्हतं," असं नारायण राणे म्हणाले.

"मुख्यमंत्रिपदाला हा माणूस लायक नाही. देशाच्या पंतप्रधानाबद्दल कामाबद्दल, धोरणाबद्दल बोलण्याची या मुख्यमंत्र्याची लायकी नाहीय. या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पाहावा, सांभाळावा," अशी टीका राणे यांनी केली आहे.

"हिंदुत्त्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. बेईमानी करून पद मिळवलं. कारण 145 आमदार यांचे नाहीत. 56 आमदारांवर हिंदुत्त्वाला मूठमाती देऊन पद मिळवलं," असाही आरोप राणेंनी केला.

आदित्य ठाकरेंवर आरोप

"सुशांत सिंह राजपूतची प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुशांतच्या प्रकरणात त्याला मारलं, कशानं मारलं सर्व बाहेर येईल. दिशा सालियनवर बलात्कार कुणी केली, तिला वरून कुणी टाकलं, हे सर्व समोर येईल," असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केलं आहे.

बाळासाहेबांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप

"उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना छळलं आहे. 2005-06 ची घटना सांगतो. बाळासाहेबांना वाटत होतं की, सेनाभवनासमोर दसरा मेळावा घ्यावा. नवीन शिवसेना भवन बांधून झालं होतं. तेव्हा नेत्यांना बोलावून बाळासाहेबांनी सर्व नेत्यांना सांगितलं. मात्र, दुसऱ्या दिवशी सामना वृत्तपत्रात आलं की, शिवाजी पार्कात दसरा होईल, असं आलं. बाळासाहेबांना धक्का बसला. मी घेतलेले निर्णय बदलले जातात, असं साहेबांना वाटलं." 27 जुलै 2006 साली वाढदिवसाला उद्धव ठाकरेंनी नवीन शिवसेना भवनाचं उद्घाटन केलं," असाही गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.

"उद्धव ठाकरेंनी अशी भाषा सोडली नाही, तर आमचा तोल गेल्यास महागात पडेल. साहेबांकडे पाहून गप्प बसलो. आमच्याकडे नजर टाकू नका, अन्यथा पळताभूई थोडी होईल. कुणाला वाघाची भाषा करता, शेळपट कुठलं!"

"उद्धव ठाकरेंना बजेट कळतो का, जीडीपी कळतो का, राज्याची अर्थव्यवस्था कळते का? शून्य माहिती आहे. अधिकारी हसतात. बुद्धू मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे, कालचा दसरा मेळावा हा फक्त विरोधकांना अपमानित करण्यासाठी द्वेषानं केलेलं भाषण आहे. त्या भाषणाला अर्थ नाही. बेडूक आला, अमूक आला-तमूक आला, अरे एका रेषेत काहीतरी बोला?"

"थापाबाज, दिशाभूळ करणारा मुख्यमंत्री आहे. मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. मराठ्यांचा द्वेष करणारा मुख्यमंत्री आहे."

"मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीत. शिवसैनिकही मानत नाहीत. वर्षावर भेटत नाहीत, मातोश्रीवर प्रवेश नाही. खेळण्यातला मुख्यमंत्री आहे. कठपुतळी आहे. कठपुतळी दुसऱ्याच्या हातावर नाचते तरी, यांना नाचताही येत नाही," असे आरोप राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत.

संजय राऊतांवर टीका

"आजच्या सामनात संजय राऊत म्हणतात, सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात, आमचं सरकार पाडून दाखवा. संजय राऊत हा विदुषक आहे. २५ वर्षं शिवसेना सत्तेत राहणार. कुठल्या धुंदीत बोलतोय हा," अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

उद्धव ठाकरे नारायण राणेंवर काय म्हणाले?

सध्या एक बेडूक आणि त्यांची दोन पिलं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणे तसंच त्यांचे पुत्र नीलेश आणि नितेश राणेंना टोला लगावला.

बेडकानं बैल पाहिला असं एक गाणं होतं. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला आणि वाघाची डरकाळी ऐकून बाबांना सांगितलं, असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)