MPSCची 11 ऑक्टोबरची परीक्षा होऊ देणार नाही – संभाजीराजे छत्रपती

फोटो स्रोत, Twitter/@YuvrajSambhaji
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून अशा स्थितीत परीक्षा घेण्यात येऊ नयेत, राज्य सरकारने 11 ऑक्टोबरला MPSC परीक्षा घेतल्या तर त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
नवी मुंबईमध्ये आयोजित मराठा आरक्षण परिषदेत संभाजीराजे बोलत होते.
यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले असून, सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तसंच कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत नसल्याचं संभाजीराजे म्हणाले.
"11 ऑक्टोबरला MPSC परीक्षा होऊ नयेत, ही भावना माझी नाही, मराठा समाजाची आहे. कोरोना झपाट्याने वाढत असताना दोन लाख विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येतील. अशा स्थितीत त्यांच्या जिवाला धोका आहे. कोरोना प्रसार वाढण्याची शक्यता आहे. परीक्षेदरम्यान लांबलचक नियमावली विद्यार्थ्यांना पाळावी लागेल. अशा वातावरणात परीक्षा घेण्यापेक्षा राज्य सरकारने काही काळ थांबावे," असं संभाजीराजे म्हणाले.
"अन्यथा 11 ऑक्टोबर रोजी परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रांवर मराठा समाजाचे कार्यकर्ते जमा होऊन परीक्षा बंद पाडलील, राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा इशारा
दरम्यान, परीक्षेच्या दिवशी महाराष्ट्र बंद करूया, अशी मागणी कार्यकर्त्यांनी भाषणादरम्यान संभाजीराजे यांना केली. पण गेले सहा महिने लॉकडाऊन असल्याने गरीबाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद केल्यास हातावर पोट असलेल्या गरीब व्यक्तीला त्याचा त्रास होईल त्यामुळे महाराष्ट्र बंद न करता, केवळ परीक्षा केंद्र बंद पाडू, असं स्पष्टीकरण संभाजीराजे यांनी दिलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








