रिया चक्रवर्ती : निष्पक्ष सुनावणीचा प्रत्येकाला अधिकार - अॅम्नेस्टी इंटरनॅशनल

रिया चक्रवर्ती

फोटो स्रोत, RHEA CHAKRABORTY OFFICIAL / FACEBOOK

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीबाबत माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने वृत्तांकन होत आहे, त्याची दखल अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेनं घेतलीय.

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे भारतातील कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी रियाची प्रतिमा मलीन करणाऱ्या वृत्तांकनाबाबत खंत व्यक्त केलीय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"कुणालाही न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष सुनावणीचा आवश्यकता असते आणि हा अधिकार नाकारणं म्हणजे पीडिताइतकाच आरोपीवर अन्याय असतो. रिया आणि तिच्या कुटुंबाचं ज्या पद्धतीनं वार्तांकन होतंय, ते या अधिकारात अडथळाच आणत आहेत. न्यायव्यवस्थेला जबाबदार बनवण्यासाठी माध्यमं नक्कीच महत्त्वाची भूमिका निभावतात, मात्र ते काही न्याय देण्याच्या प्रक्रियेच्या पूरक संस्था नाहीत," अशा कठोर शब्दात अविनाश कुमार यांनी आपलं मत मांडलं आहे.

"कुणीही आरोपी दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत निष्पक्ष सुनावणीचा अधिकार भारताच्या राज्यघटनेनं दिलाय. शिवाय, भारत सदस्य असलेल्या नागरी आणि राजकीय हक्क (ICCPR) या आंतरराष्ट्रीय करारानंही दिलेत. शिवाय, यात महिलांचा खासगीपणा, सुरक्षा आणि मानवाधिकार जपण्याचंही यात नमूद आहे," असं म्हणत अविनाश कुमार पुढे म्हणाले, माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहेच, मात्र न्यायव्यवस्थेच्या प्रशासकीय क्षेत्रात हस्तक्षेप टाळायला हवं.

"गेल्या दोन महिन्यात रियाबाबत अनेक पुरुषसत्ताक टीका, लेख आणि अफवांवर आधारित माहिती पसरवली गेली. या सगळ्या वृत्तांकनात अनेकांना रस निर्माण झाला, परिणामी रियाविरोधात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह गोष्टींची उदाहरणं घडली. या सगळ्या गोष्टी पीडितांना न्यायापासून दूर ठेवतात, लैंगिक समानतेच्या ध्येयात अडथळे निर्माण होतात," अशी खंतही अविनाश कुमार यांनी व्यक्त केली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)