सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा

फोटो स्रोत, Getty Images
महेंद्र सिंह धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटपटू सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली आहे.
महेंद्र सिंह धोनीप्रमाणे मीही निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे असं त्याने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.
शैलीदार डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने महेंद्रसिंग धोनीच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त गोलंदाजी ही रैनाच्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्यं.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सातत्याने धावांची टांकसाळ उघडणारा रैना चेन्नई सुपर किंग्सचा हुकूमी एक्का मानला जातो.

फोटो स्रोत, ANI
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




