संजय दत्तच्या कॅन्सरच्या चर्चेवरून मान्यता दत्तचं चाहत्यांना भावनिक पत्र

फोटो स्रोत, Getty Images
अभिनेता संजय दत्त यांना कॅन्सर झाल्याची बातमी सर्वत्र आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. संजय दत्त यांच्या पत्नी मान्यता दत्त यांनी यासंदर्भात एक सविस्तर निवेदन जारी केलं आहे.
त्या म्हणतात -
प्रति,
संजूचे सर्व चाहते आणि शुभचिंतक,
संजूला गेली इतकी वर्षं तुम्ही प्रेम आणि आपुलकी दिली आहे. याबद्दल तुमचे आभार मानल्याशिवाय मी सुरुवातच करू शकत नाही.
संजूने आयुष्यात बरेच चढ-उतार बघितले. मात्र, तुम्ही केलेलं कौतुक आणि तुम्ही दिलेला पाठिंबा याच्या बळावर त्यांनी आजवरच्या प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना केला आहे. आणि यासाठी आम्ही कायमच आपले ऋणी असणार आहोत. आमच्यापुढे आणखी एक आव्हान उभं ठाकलं आहे आणि तुमच्या प्रेमाच्याच बळावर ते हे संकटदेखील पार करतील, याची मला खात्री आहे.
एक कुटुंब म्हणून आम्ही या संकटाचा सकारात्मकतेने आणि नम्रतेने सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक कठीण संघर्ष आणि लांबचा प्रवास असणार आहे. त्यामुळे चेहऱ्यावर स्मित ठेवून शक्य तेवढं सामान्य आयुष्य जगण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि कुठलीही नकारात्मकता न ठेवता संजूसाठी आम्हाला हे करायचं आहे.
या कठीण काळात दुर्दैवाने मी स्वतः घरात क्वारंटाईन असल्याने पुढचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत असू शकत नाही. प्रत्येक युद्धातच एक दिशा दाखवणारा असतो आणि एक जण किल्ला लढवत असतो. आमच्या कुटुंबातर्फे चालवण्यात येणाऱ्या कॅन्सर फाउंडेशनमध्ये प्रियाने गेली दोन दशकं खूप काम केलं आहे. तिच्या आईने या आजाराशी दिलेली झुंज तिने स्वतः बघितली आहे. या लढाईत ती आमची मार्गदर्शक आहे. तर मी किल्ला लढवत आहे.
आपल्या माहितीसाठी, संजूवर प्राथमिक उपचार मुंबईत होतील. परदेशात कधी जायचं, यासंबंधीचे निर्णय कोव्हिडची परिस्थिती कशी आहे, यावर घेतला जाईल. सध्या संजूवर कोकिलाबेन हॉस्पिटलमधले तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.
मी हात जोडून सर्वांना विनंती करते की त्यांचा आजार कुठल्या टप्प्यात आहे, याचे अंदाज बांधू नका आणि डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या. या सर्व प्रक्रियेची आम्ही तुम्हाला नियमितपणे माहिती देत राहू.
संजू केवळ माझे पती आणि आमच्या मुलांचे वडील नाही तर आई-वडील गेल्यानंतर अंजू आणि प्रिया या भावंडांसाठी ते वडिलांसारखेच आहेत.
ते आमच्या कुटुंबाचा आत्मा आहेत.
आमचं कुटुंबही या आजाराने हादरून गेलं असलं तरी आम्ही संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे. ईश्वर आणि तुमच्या प्रार्थना आमच्या सोबत आहेत. या सर्वांच्या साथीने आम्ही यावर मात करू आणि विजयी होऊन बाहेर पडू.
वैद्यकीय उपचारांसाठी घेतला ब्रेक
मंगळवारी संजय दत्त यांनी आपण मेडिकल ट्रीटमेंटसाठी काही काळ कामापासून ब्रेक घेत असल्याचं म्हटलं.
'नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन', असं ट्वीट संजय दत्तने केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
माझे कुटुंबीय आणि मित्र माझ्यासोबत आहे. माझ्या प्रकृतीबद्दल कोणतेही अनावश्यक अंदाज व्यक्त केले जाऊ नयेत.
संजय दत्त यांची पत्नी मान्यता यांनीही बुधवारी (12 ऑगस्ट)ला एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
"संजयला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना, शुभेच्छा, आशिर्वाद देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार. या कठीण कालखंडातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षात आमच्या घराने खूप काही सोसलं आहे. पण मला खात्री आहे की हा अवघड काळही सरेल. परंतु संजूच्या चाहत्यांना एक कळकळीची विनंती आहे की कोणत्याही अफवा, अनाठायी शक्यता यांना बळी पडू नका. तुमचं प्रेम, पाठबळ आणि जिव्हाळा आमच्यावर असंच असू द्या," असं मान्यता दत्त यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या प्रकृतीबद्दल कोणत्याही चर्चा नको, असं संजय दत्त यांनी म्हटलं असलं तरी त्यांच्या आजारपणाबद्दल चर्चा सुरु झाल्या.
काही माध्यमांनी तसंच एन्टरटेन्मेंट पोर्ट्लसनं संजय दत्त यांना तिसऱ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं.
क्रिकेटपटू युवराज सिंह याने संजय दत्तला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेदना काय असतात, हे मला माहितीये असं एक वाक्य युवराजनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. युवराज सिंह स्वतः कॅन्सरवर मात करून मैदानावर परतला आहे. त्यामुळेच संजय दत्त यांना कॅन्सर झाल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पण स्वतः संजय दत्त किंवा हॉस्पिलनं याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही.
फिल्म ट्रेड अनालिस्ट कोमल नाहटा तसंच शेखर सुमन यांचा मुलगा आराध्य सुमन यांनीही ट्वीट करून संजय दत्तला कॅन्सरमधून बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
"संजय दत्तला फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचं कळलं. ही अतिशय दु:खाची गोष्ट आहे. पण संजू, तू लढवय्या आहेस. कारकीर्दीत नेहमी तु झुंजारपणा दाखवला आहेस. तू या आजारावर मात करशील आणि जिंकशील. आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुझ्या पाठिशी आहेत. देव तुझं भलं करो", असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
शेखर सुमनचा मुलगा आराध्य यानेही ट्वीट करून संजय दत्तला बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
संजय दत्तने 29 जुलैला त्याचा 61 वा वाढदिवस साजरा केला होता. याच दिवशी त्यांच्या केजीएफ 2 या त्याच्या आगामी चित्रपटातील त्यांचं 'कॅरेक्टर पोस्टर' पण रिलीज झालं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)