सुशांत सिंह मृत्यूप्रकरण महाराष्ट्र सरकार CBI कडे सोपवण्यास इच्छुक का नाही?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास CBI ने करावा की नाही याविषयीचा निकाल आज सुप्रीम कोर्ट देणार आहे.
सुशांतला आत्महत्येसाठी प्रवत्त करण्यात आलं होतं, अशी तक्रार त्याचे वडील के. के. सिंह यांनी बिहार पोलिसांत दाखल केली होती. यावरून बिहार पोलिसांनी तपास सुरू केला, पण मुंबईत तपासासाठी दाखल झालेल्या तपास अधिकारी, पाटण्याचे SP विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केल्याने वादाला सुरुवात झाली होती.
बिहारमध्ये दाखल करण्यात आलेलं प्रकरण मुंबईला हलवण्यात यावं अशी मागणी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने केली होती.
दरम्यान, बिहार पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. पण महाराष्ट्र सरकारने तपास CBI कडे सोपवायला विरोध केलाय.
मुंबई पोलीस या केसचा योग्य रीतीने तपास करत असून ती CBI कडे दिली जाणार नसल्याचं महाराष्ट्राचे गहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या प्रकरणाला आता राजकीय फायद्यासाठी वेगळं वळण देण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अत्यंत प्रोफेशनली तपास करत असून सत्य खोदून बाहेर काढण्यास सक्षम असल्याचंही गहमंत्री देशमुख यांनी म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
महाराष्ट्र सरकार हा तपास सीबीआयकडे द्यायला निरुत्सुक का आहे, याविषयी पत्रकार धवल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "सीबीआयकडे तपास गेला तर राज्याचं काहीच नियंत्रण राहणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने मागे म्हटल्याप्रमाणे सीबीआय हा पिंजऱ्यातला पोपट आहे. त्यामुळे जो कुठला पक्ष सत्तेत असतो त्याचं हत्यार किंवा शस्त्र अशापद्धतीने सीबीआयचा वापर केला जातो, असा एक समज आहे.
"दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये याविषयावर प्रचंड अंतर्गत राजकारण आहे. ही चौकशी सीबीआयकडे द्यावी ही मागणी सगळ्यात आधी कुणी केली होती, तर पार्थ पवार यांनी. त्यानंतर 3 दिवसांनी हा विषय भाजपने उचलून धरला. म्हणजे महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत, तेसुद्धा एका पानावर नाहीत, असं दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे बिहारमधल्या निवडणुका. शिवाय आदित्य ठाकेरंविरुद्ध जी भयानक 'व्हिस्परिंग कॅम्पेन' सुरू झालेली आहे, ते ही महत्त्वाचं कारण आहे," असं कुलकर्णी सांगतात.
तपासाचं अधिकार क्षेत्र कोणाचं?
या प्रकरणाचा तपास करायला मुंबई पोलिसांनी सुरुवात केली. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणातील FIR दाखल करण्यात आली.
पण सुशांतने आत्महत्या केली नसून त्याला यासाठी प्रवत्त करण्यात आल्याचं सांगत त्याचे वडील के के सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर मग बिहार पोलिसांनीही तपास सुरू केला. के. के. सिंह यांचं म्हणणं होतं की त्यांनी सुशांतच्या आत्महत्येपूर्वी मुंबई पोलिसांकडे मदत मागितली होती.

फोटो स्रोत, Rhea Chakraborty Instagram
बिहार पोलिसांची 4 जणांची टीम मुंबईत तपासासाठी आली, आणि एका राज्यातले पोलीस दुसऱ्या राज्यातल्या केसचा तपास करू शकतात का, यावरून वाद सुरू झाला.
त्यातच या टीमचं नेतत्त्वं करणारे एस.पी. विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केलं. देशांतर्गत विमान प्रवास करून येणाऱ्या लोकांसाठी असणाऱ्या नियमांनुसार हे करण्यात आल्याचं BMC चं म्हणणं होतं. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस आपल्याला सहकार्य करत नसल्याचं म्हणत याविषयी नाराजी व्यक्त केली होती.
मुंबई पोलिस कमिशनर परमबीर सिंह यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत सांगितलं , "सहकार्य न करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या (बिहार पोलीस) अधिकारात हे येतं की नाही यासाठीचा कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत. हे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचं त्यांना वाटत असेल, तर त्यांनी तसं सिद्ध करावं."
सुशांत बाय पोलर असल्याचं आपल्या तपासात समोर आल्याचं मुंबईचे पोलीस कमिशनर परमबीर सिंह यांनी याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
तर या आत्महत्या प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहारांकडे मुंबई पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोपही बिहार पोलिसांनी केलाय. गेल्या 4 वर्षांत सुशांतच्या खात्यात पन्नास कोटी क्रेडिट झाले आणि त्यातले जवळपास सगळे पैसे काढले गेले, गेल्या वर्षभरात डिपॉझिट झालेल्या 17 कोटींपैकीही पंधरा कोटी काढण्यात आले असं बिहार पोलिसांचं म्हणणं होतं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार पोलिसांकडचं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. ज्या राज्यात गुन्हा घडला त्या राज्याचं सरकार, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट एखाद्या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवू शकतं. पण ही घटना महाराष्ट्रात घडली असल्याने बिहार सरकारने केस सीबीआयकडे सोपवणं योग्य नसल्याचं रिया चक्रवर्तीकडून CBIच्या तपासाला विरोध करताना सांगण्यात आलंय.
मीडियाकडून हे प्रकरण भडकवलं जात असून आपल्याला राजकीय हेतूसाठी बळीचा बकरा बनवलं जात असल्याचं रिया चक्रवर्तीद्वारे सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये म्हटल्याची बातमी NDTVने दिली आहे.
या आत्महत्या प्रकरणाचा मनी लाँडरिंगशी संबंध असल्याचेही आरोप होत असून ED ने यासंंबंधी काल रिया चक्रवर्तीची चौकशी केली.
राजकीय आरोप प्रत्यारोप
महाराष्ट्र सरकार याप्रकरणी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी भाजपने अनेकदा केली होती.

तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणी भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारमधल्या एका मंत्र्यावर खळबळजनक आरोप केले होते. "सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला 50 दिवस उलटून गेले तरीही या प्रकरणात अद्याप कोणाला अटक का गेली नाही? 8 जूनला कोणाच्या घरी पार्टी झाली. 13 तारखेला सुशांतबरोबर झालेल्या पार्टीत कोण होतं? दिनो मोर्या कोण आहे? सुशांतच्या घराजवळ त्याचा बंगला आहे. तिथे या सरकारमधला एक मंत्री का येतो? 13 तारखेला बंगल्यावर जमून सुशांतकडे पार्टी करायला कोण गेलं? त्यांची चौकशी का होत नाही? सरकारवर दबाव का आहे," असे अनेक प्रश्न राणे यांनी उपस्थित केले होते.
राणे यांनी यावेळी कुठल्याही मंत्र्याचं नाव घेतलं नाही. पण राणे यांच्या या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंनी मात्र ट्विटरवरून त्यांची भूमिका जाहीर करत एक पत्रक प्रसिद्ध केलं.
हेही नक्की वाचा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








