केतकी चितळे यापूर्वी 'या' वादांमध्ये अडकली होती...

केतकी चितळे

फोटो स्रोत, facebook/Ketaki Chitale

फोटो कॅप्शन, केतकी चितळे

अभिनेत्री केतकी चितळेनं मुंबई उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं केतकीनं या याचिकेत म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी केतकीला 15 मे रोजी अटक करण्यात आली होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

केतकीनं याआधीही 'अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तकारींच्या आधारे दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटक कारवाईही बेकायदा आहे' असं म्हणत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हा दावा करतानाच व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याची विनंतीही केतकीने याचिकेद्वारे केली आहे.

केतकीच्या या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी हायकोर्टाला अर्जाद्वारे विनंती करणार असल्याची माहिती अॅड. घनश्याम उपाध्याय यांनी 7 जूनला दिली होती.

14 मे रोजी कळवा पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर 15 मे रोजी केतकीला अटक झाली. ठाणे न्यायदंडाधिकारी कोर्टाने केतकीला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.

केतकी चितळेला पोलीस तिच्या कळंबोलीतील घरातून ताब्यात घेऊन नेत असताना तिच्यावर शाई फेकण्यात आली, तसंच अंडीही फेकण्यात आली. शिवाय, कार्यकर्त्यांनी केतकीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

केतकी चितळे

फोटो स्रोत, FACEBOOK/Ketaki Chitale

यापूर्वीही केतकी वक्तव्यं आणि फेसबुक पोस्ट वादग्रस्त ठरल्या आहेत.

यापूर्वी केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याने शिवप्रेमी नाराज झाले होते. महाराजांनी दिलेली शिकवण विसरून जात त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद करतात असं केतकीने लिहिलं होतं.

यामुळे केतकीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. या पोस्टसंदर्भात शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने धमकी दिल्याचा आरोप करत केतकीने स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

काय लिहिलं होतं केतकी चितळे यांनी?

शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर 'मराठी' असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.

केतकी चितळे

फोटो स्रोत, Facebook

अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!

सुधारणा करा बाळांनो, शिका.

केतकीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये काय लिहिलं आहे?

"महाराजांच्या नावाचा तुम्ही एकेरी उल्लेख करता आणि वरती हसता. महाराष्ट्रामध्ये राहता, नाव कमावलं त्यांच्या जीवावर आणि आज त्यांचे नाव एकेरी. मला तुझं नाव लिहिता येत नाही बरोबर, मुद्दाम नाही लिहिलं केतकी. आणि महत्त्वाचं मी जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर ग्राहक संरक्षण संस्था आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेना विभागप्रुख आहे. पुन्हा खोटारडे लोक असं बोललीस तर बघ."

असं लिहिलेला स्क्रीनशॉट केतकीनं शेअर करत शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने ही धमकी दिल्याचं म्हटलं आहे.

निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकरांची टीका

'तरुण पिढी वादग्रस्त विधान करणाऱ्या मराठी अभिनेत्रीला माझ्याकडून हा घरचा अहेर. केतकी बाईला एकच प्रश्नच विचारायचा आहे, जेव्हा महाराष्ट्रावर मोठे संकट येते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनून तरुण मंडळी मदतीसाठी पुढे येतात. तेव्हा केतकीने त्यांचे कौतुक केले नाही. स्वत: अशी कोणती कामगिरी केली आहे. घरात टीव्ही बघून झोपा काढणाऱ्या केतकीला काय अधिकार आहे तरुण मंडळींना बोलण्याचा', असं टिळेकर यांनी म्हटलं आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 1

'अर्वाच्य भाषेत ट्रोलिंग आणि प्रत्युत्तर

वर्षभरापूर्वी केतकी हिंदीतून फेसबुक लाईव्ह करत होती. मी हिंदीतही काम केलंय, त्यामुळे हिंदी भाषेत लाईव्ह करते आहे असं तिने स्पष्ट केलं. मात्र लोकांनी अत्यंत अर्वाच्य, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत केतकीवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी केतकीने स्वतंत्र व्हीडिओ शेअर केला. टीका करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं.

केतकी चितळे

फोटो स्रोत, facebook/Ketaki Chitale

फोटो कॅप्शन, केतकी चितळे

टीकाकारांच्या मराठी भाषेच्या अज्ञानावरही जोरदार टीका केली. यानंतर ट्रोलिंग सुरू राहिल्याने केतकीने तक्रार दाखल केली. याप्रकरणी तिने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी प्रशासनाला सूचना देत ट्रोलर्सवर कारवाई करण्याची सूचना केली. यानंतर औरंगाबादमधून एकाला अटक करण्यात आली. केतकीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

युनिफॉर्म सिव्हिल कोडवरील पोस्टही वादाच्या भोवऱ्यात

केतकीने 1 मार्च रोजी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या निमित्ताने एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये बौद्ध समाजावर टीका केल्याने आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला होता.

केतकी चितळे

फोटो स्रोत, Facebook

भांडुप पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

'एपिलेप्सीमुळेच मालिकेतून काढलं'

"मला एपिलेप्सीचा त्रास आहे. हा आजार नसून एक व्यंग आहे. यामध्ये अचानक झटका आल्यासारखं होतं. हे मेंदूशी निगडीत व्यंग आहे. माझ्या भूमिकेला टीआरपी नसल्याचं कारण देत माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला आणण्यात आलं. माझ्या व्यंगामुळेच मला या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. मी याविरोधात आवाज उठवला कारण हा माझ्या एकटीवरचा अन्याय नसून, माझ्यासारखे या व्यंगाने त्रस्त असलेल्यांवरचा अन्याय आहे," असं केतकीने म्हटलं होतं.

केतकी चितळे

फोटो स्रोत, facebook/Ketaki Chitale

फोटो कॅप्शन, केतकी चितळे

दरम्यान, केतकीने केलेले आरोप 'लक्ष्मी सदैव मंगलम' मालिकेचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी फेटाळले आहेत.

"हा सोशल मीडियाचा गैरवापर आहे. तिच्या आजाराविषयी आम्हाला कल्पना होती. जेव्हा तिची तब्येत बरी नसायची तेव्हा आम्ही तिला आराम करू द्यायचो. तिच्या भूमिकेमुळे मालिकेला विशेष टीआरपी मिळत नव्हता. तिच्या भूमिकेबाबत लोकांचा सर्व्हे करून लोकांची मतं जाणून घेण्यात आली. त्यानंतरच अभिनेत्री बदलण्याचा निर्णय घेण्यात आला," असं सारंग यांनी म्हटलं होतं.

केतकीची आतापर्यंतची वाटचाल

केतकीने सोनी टीव्हीवरच्या 'सास बिना ससुराल' मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर 'भोभो' नावाच्या मराठी चित्रपटात तिने काम केलं होतं.

Facebook पोस्टवरून पुढे जा, 2

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 2

स्टार प्रवाह चॅनेलवरच्या 'आंबट गोड' मालिकेत केतकीने अबोलीचं पात्र साकारलं होतं. त्यानंतर तिने झी मराठीवरच्या 'तुझं माझं ब्रेकअप' मालिकेत काम केलं होतं. 'लक्ष्मी सदैव मंगलम'मध्ये तिची भूमिका होती. मात्र एका टप्प्यावर तिला मालिकेतून डच्चू देण्यात आला. केतकी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एपिलेप्सीसंदर्भात अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)