सुशांत सिंह राजपूतवर मुंबईत अंत्यसंस्कार, बॉलिवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

फोटो स्रोत, Hindustan Times
अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत अंतिम संस्कार झाले.
सुशांत सिंहच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे कुटुंबीय पाटण्याहून आले होते. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी सुशांत सिंहला श्रद्धांजली वाहिली.
लॉकडाऊनमुळे खूप कमी लोकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या वांद्र्यातील राहत्या घरातच आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
त्याच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यात फास घेतल्यामुळे श्वास कोंडल्याने सुशांतचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तीन डॉक्टरांच्या टीमनं सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी केली. त्यानंतर वांद्रे ठाण्यात त्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे.
सुशांत सिंहने आत्महत्या केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत, अद्याप कोणतीही नोट मिळाली नसल्याचं मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी सांगितले आहे.
'सुशांत तू कोणत्या तणावाखाली होतास याची मला कल्पना होती'
प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की गेल्या सहा महिन्यांपासून आपण दूर होतो. जे तुझ्याबाबतीत घडलं त्यात तुझा दोष नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"सुशांत तुझ्या वेदनांची तुला ज्या लोकांनी दूर लोटलं आणि निराश केलं त्या लोकांबाबत मला माहीत आहे. त्याबद्दल सांगताना तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत होतास. गेल्या सहा महिन्यात तू तुझ्याबरोबर असायला हवा होतो. मला वाटतं तू माझ्याशी बोलायला हवं होतं. तुझ्यासोबत जे काही घडलं ते त्यांचं कर्म आहे तुझं नाही," असं शेखर कपूर यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्यांच्या या ट्वीटचा रोख कुणाकडे आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
सुशांत सिंह राजपूतच्या टीमने सांगितलं आहे की, "सुशांत सिंह राजपूत आपल्यात राहिला नसल्याचं सांगताना मोठं दु:ख होत आहे. पण आम्ही आपल्याला आवाहन करतो की, त्याच्या स्मृती कायम तुच्यासोबत राहू द्या. त्याने केलेलं काम आणि त्याचं आयुष्य सेलिब्रेट करा.'
या दु:खाच्या क्षणी प्रायव्हसी राखण्यासाठी आम्हाला मदत करा,' अशी विनंतीही सुशांतच्या टीमने केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्याचे कुटंबीय, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंहची माजी मॅनेजर दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतने इन्स्टाग्रामवर ही बातमी अत्यंत दुःखदायक असल्याचं सांगितलं होतं. दिशाचा परिवार आणि मित्र परिवार यांचं मी सांत्वन करतो, तुझ्या आत्म्याला शांतता लाभो असं त्यानं लिहिलं होतं.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्शी, एम. एस. धोनी, काय पो चे, सोनचिडिया या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती.
सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. पवित्र रिश्ता या सिरियलमुळे सुशांत सिंह घराघरात पोहोचला होता. अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण समजलं नाहीये.
ही सुशांत सिंह राजपूतने शेअर केलेली शेवटची इंस्टाग्राम पोस्ट आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
सुशांत सिंह यांच्या मृत्यूनंतर अनेक चाहत्यांनी ट्विटरवर हळहळ व्यक्त केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सुशांत सिंहच्या जाण्याने आम्हाला धक्का बसला आहे. तो अतिशय गुणी कलाकार होता असं एका चाहत्याने म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
सुशांत सिंह राजपूत या प्रतिभावान तरुण अभिनेत्या अकाली एक्झिट घेतली. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली. त्याचा मनोरंजन क्षेत्रातील उदय अनेकांसाठी प्रेरणादायी होता. त्याच्या मृत्युमुळे दुःख झाले. त्याच्या कुटुंबाचं आणि चाहत्यांचं मी सांत्वन करतो, ओम शांती, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
'आता तू क्रिकेटपटू म्हणूनही खेळू शकशील'
क्रिकेटपटू किरण मोरे यांनीही सुशांतबद्दल आठवणी सांगताना तो अत्यंत मेहनती असल्याचं सांगितलं. त्यांनी महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारण्यासाठी त्याला प्रशिक्षण दिलं होतं. सुशांत सिंग कधीही न डगमगता मेहनत करत राहिला असं त्यांनी सांगितलं.
"माझ्यासाठी हा क्षण व्यक्तीशः धक्कादायक आहे. मी सुशांतला महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेसाठी ट्रेनिंग दिलं होतं. त्याला ओळखणारा कुणीही यातून लवकर सावरू शकेल असं मला वाटत नाही. खूप लवकर गेलास मित्रा..
"तो आता एक क्रिकेटपटू म्हणूनही खेळू शकेल असं आपण त्याला सांगितल्याचं ते म्हणाले. धोनी ज्याप्रमाणे खेळायचा त्याप्रमाणे क्रिकेट बॅटिंगमधले शॉट्स शिकण्यासाठी त्याने अपार मेहनत केली होती," असं किरण मोरे म्हणाले.
सुशांत सिंह याच्या मृत्यूबद्दल अभिनेते सुमित राघवन यांनी दुःख व्यक्त केले आहे. झलक दिखला जा या नृत्य कार्यक्रमात राघवन सूत्रसंचालक होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना त्यानं मिळवलेल्या यशामुळे मला त्याचं फार कौतुक वाटायचं. तो ज्या पद्धतीने सराव करायचा, पाय मुरगळला तरी त्यानं जिद्दीनं मेहनत केली. ती जिद्द नंतरसुद्धा दिसून आली. या जिद्दीमुळं त्याच्या करिअरचा ग्राफ नेहमी वर जात राहिला. त्याच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. 2020 यावर्षातील पहिले सहा महिने संपले आहेत, त्यात अनेक वाईट घटना घडल्या आहेत." असं सुमित राघवनने म्हटलं आहे.
'एकटं राहणाऱ्या पुरुषांच्या मनाचा विचार करणं गरजेचं'
महाभारतातील कृष्णाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते नितिश भारद्वाज यांनी सुशांत सिंहच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त केली आहे.
"मला समजलं तेव्हा यावर विश्वासच बसला नाही. तो फार हुशार होता. मनमिळावू होता. वेगळ्या पद्धतीनं काम करायचा. माझ्या पुढच्या पिढीतला असला तरी आदर करायचा.एखादा पुरुष यशस्वी असतो तेव्हा तो एकाकीही असू शकतो हे दुर्देवाने लक्षात येत नाही. त्याच्या आजूबाजूला चांगले लोक आहेत का, त्याच्याशी बोलणारे लोक आहेत का याचा विचार सर्वांनी केलं पाहिजे. एकटं राहाणाऱ्या पुरुषाच्या मनाचा विचार करणं गरजेचं आहे. सिनेसृष्टीत वरवर जातो तसं एकाकी होत जातो. कुटुंबांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. आधार देणं गरजेचं आहे." अशा शब्दांमध्ये अभिनेते नितिश भारद्वाज यांनी आपल्या भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी केदारनाथ सिनेमासाठी सुशांतबरोबर काम केलं होतं.
अक्षय कुमारनेही त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
खरंतर या बातमीमुळे मला धक्का बसला आहे, मी निशब्द आहे. मला आठवतंय सुशांतचा 'छिछोरे' सिनेमा पाहिल्यानंतर मी साजिदला फोन करुन सांगितलं होतं की मला हा सिनेमा पाहताना खूप मजा आली आणि या चित्रपटाचा एक भाग होयला आवडलं असंत. खूप टॅलेंटेड अभिनेता होता... त्याच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये सोबत काम केलेल्या उषा नाडकर्णींनी ABP माझाला प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्या म्हणाल्या सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून खरंच वाटलं नाही.
"मला खरच नाही वाटतं. मला आता माझ्या एडिटरचा फोन आला, मला म्हणाला, आई सुशांतनी सुसाईड केलं. मला खरंच वाटलं नाही. मी म्हटलं, दोन दिवसापूर्वी त्याच्या सेक्रेटरी की बॉडिगार्डने सुसाईड केल्याचं मी वाचलं होतं, पण काय झालं असेल या मुलाचं. एवढं चांगलं आयुष्य होतं पुढे. मला तो आई म्हणायचा. मला म्हणायचा, आई कुछ घरसे करके लाओ ना, पण तेव्हा 7 ची शिफ्ट असल्यामुळे शक्य नाही व्हायचं. मजा करायचा, थोडा लाजाळू होता, पण मस्ती ही करायचा. आमची साडे पाच वर्षं सिरीयल चालली. तो दोन वर्षं होता आमच्या सोबत. फार मोठा नव्हता तो. खूप वाईट वाटलं ऐकून."
सुशांत सिंहच्या जाण्याने आपल्याला अतोनात दुःख झाल्याचं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
सुशांत सिंह याच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले. आमची कधीही भेट झाली नव्हती. पण त्यांनी धोनी सिनेमात सुंदर अभिनय केला होता. तो विसरणं शक्य नाही. मी त्यांना श्रद्धांजली वाहते, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. अशा शब्दांमध्ये लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
सुशांत सिंहची पार्श्वभूमी
सुशांत सिंग राजपूत मुळचा बिहारमधील पाटण्याचा. त्याचं कुटुंब बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातलं. आईच्या निधनानंतर त्याने दिल्लीमध्ये शिक्षणासाठी येण्याचा निर्णय घेतला. अभिनयाच्या आवडीमुळे तो आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करु शकला नव्हता.
त्यानंतर त्याच्या कुटुंबानं मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. 2008 साली किस देस मे मेरा दिल नावाच्या मालिकेतून त्याची छोट्या पडद्यावर एंट्री झाली. 2009 साली पवित्र रिश्ता मालिकेत मानव देशमुख ही भूमिका त्याला मिळाली आणि त्याच्या अभिनयातील करिअरला खरी गती मिळाली.
त्याने साकारलेला मानव देशमुख घराघरात पोहोचला. जरा नचके दिखा आणि झलक दिखला जा या डान्स शोमधून त्यानं आपलं नृत्यकौशल्य सर्वांसमोर सादर केलं. तेव्हापासूनच त्याच्या अभिनयाच्या आणि नृत्यकौशल्याची चुणूक सर्वांना दिसून आली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)