महाराष्ट्र विमान प्रवास नियम - सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन इत्यादी 9 नियम

लॉकडाऊन, कोरोना,

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, लॉकडाऊनमुळे विमानसेवा दोन महिन्यांकरता स्थगित झाली होती.

केंद्र सरकारने काल म्हणजेच 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू केला आहे. पण राज्य सरकारकडून ऐनवेळी नियमावली जाहीर करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

महाराष्ट्र सरकारने सोमवारी संध्याकाळी मुंबईसह राज्यातल्या इतर विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियामवली जाहीर केली आहे. यात विमानतळ व्यवस्थापन आणि प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विमानतळ व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत.

तुम्हीही जर विमान प्रवास करणार असाल किंवा तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही विमानतळावर जाणार असाल तर तुम्हाला कोणते नियम पाळावे लागतील ते पाहूयात...

1)सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. या अॅपवर प्रवाशांना स्वत:विषयी काही प्राथमिक माहिती जाहीर करायची आहे.

2)प्रवासी कुठल्याही कंटेनमेंट झोनमधून आलेला नसावा. तसंच प्रवाशाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणं नाहीत, हे सुद्धा जाहीर करणं बंधनकारक आहे.

एअरपोर्ट

फोटो स्रोत, Twitter AAI

3)शिवाय, गेल्या दोन महिन्यांत कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलेली नसून तुम्ही आता क्वारंटाईनमध्ये नाहीत, ही माहितीही जाहीर करायची आहे.

4)प्रत्येक प्रवाशाला आणि विमानतळ कर्मचारी, क्रू यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. सर्व प्रवाशी तसंच कर्मचाऱ्यांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जाईल, तसंच विमानतळांवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल, याची खबरदारी विमानतळ व्यवस्थापनाला घ्यायची आहे.

5)विमानतळावर उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या डाव्या हातावर शिक्का मारला जाईल. तसंच 14 दिवस क्वारंटाईन होणं बंधनकारक असेल.

6)अतिमहत्त्वाच्या कामासाठी विलगीकरण कक्षात राहण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

7)जे प्रवासी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी राज्यात राहणार आहेत, त्यांना क्वारंटाईन होण्यापासून सूट दिलेली आहे. पण त्यासाठी संबंधित प्रवाशाला रिटर्न तिकीट दाखवणे गरजेचे आहे.

8)कोणत्याही प्रवाशाला कंटेनमेंट झोनमध्ये जाता येणार नाही. शिवाय, प्रवासी कुठे राहणार आहे, राहण्याची पर्यायी सोय काय आहे, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणाहून विमानतळांकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करता येईल.

9) या सगळ्या नियमांचे पालन न करता तसंच खबरदारी न बाळगता प्रवास करत असतील तर संबंधित प्रवाशांवर कारवाई केली जाईल.

कोरोना
लाईन
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)