अशोक चव्हाणांनी कोरोनाला केलं नॉकआऊट, 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहतील

फोटो स्रोत, Twitter
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोना व्हायरस आजारावर मात केलीय. त्यांना रुग्णालयातून घरीही सोडण्यात आलं आहे, मात्र, 14 दिवस त्यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आलाय.
अशोक चव्हाण यांना 25 मे रोजी कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना नांदेडमधून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलं. त्यानंतर 10 दिवसांची अशोक चव्हाणांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी अशोक चव्हाण यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये ते लोकांना अभिवादन करत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधीलच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कोरोनावर मात केली होती.
एअर अॅंबुलन्सने नेण्यात आलं होतं मुंबईला
अशोक चव्हाण यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली होती असं कळलं होतं तेव्हा बीबीसी मराठीने काँग्रेस नेते राजीव सातव यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, "अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तसं चव्हाण यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कळवलं आहे. आणि आता ते पुढील उपचारासाठी मुंबईला येत आहेत."
"माझं अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं आहे. कोरोनाची काही मेजर लक्षणं त्यांना दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण, काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून ते मुंबईला येत आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करत आहोत," असंही सातव यांनी म्हटलं होतं.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीटरवर एका ट्वीटला रिट्वीट करताना म्हटलं आहे की, "अशोकजी तुम्ही लवकर बरे व्हा. तुमची तब्येत लवकर सुधारावी, यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करत आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सचिन सावंत यांनी अजय शेटे नावाच्या ट्वीटर यूझरचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. अजय शेटे यांच्या ट्वीटमध्ये अशोक चव्हाण हे नांदेडच्या हॉस्पिटलमधून चालत बाहेर येताना आणि मुंबईक़डे रवाना होताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Twitter
बीबीसी मराठीनं सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, "अशोक चव्हाण साहेबांना कोरोनाची लागण झाल्याचं व्हीडिओत दिसत आहे. काँग्रेसचे नेते कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहेत. ही मंडळी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. यांतील काहींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून लवकरात लवकर त्यांची सुटका व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत."
दरम्यान, अजय शेटे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "अशोक चव्हाण साहेब कोरोनाच्या संकटसमयी तुम्ही नांदडेच्या जनतेसाठी योद्ध्यासारखी भूमिका बजावली आहे. तुम्ही कोरोनाला हरवून पुन्हा नांदेडच्या जनतेसाठी रणांगणावर याल."
दरम्यान, अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते नांदेडमध्ये आशा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, पण आता पुढच्या उपचारासाठी ते मुंबईला येत आहेत, अशी बातमी एबीपी माझानं दिली आहे.
रविवारी त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते स्वत: दवाखान्यात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असल्याचंही बातमीत म्हटलं आहे.
काँग्रेसचे पदाधिकारी अभिजीत देशमुख यांनीही अशोक चव्हाण यांचा व्हीडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हीडिओत अशोक चव्हाण हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. तसंच ते कार्यकर्त्यांना हात हलवून अभिवादनन करत आहेत.
अभिजीत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, की व्हीडिओमध्ये साहेबांची प्रकृती स्थिर असल्याचं दिसत आहे. ते लवकरच बरे होऊन आपल्यासोबत येतील.
याआधी राज्य सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








