जितेंद्र आव्हाड पहिली मुलाखत : 'मी जगण्याची शक्यता फक्त 30 टक्केच होती'

आव्हाड
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे नुकताच कोव्हिड-19 मधून बरे होऊन घरी परतले आहेत. या आजारातून आपण मृत्यूच्या दाराला स्पर्श करून आलोत अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

आव्हाड यांना आता डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आव्हाड यांनी कोरोनावर कशी मात केली आणि त्यांचा सध्याचा रूटीन कसा आहे याबाबत आव्हाड यांनी बीबीसीशी चर्चा केली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

प्र. आता तुमची तब्येत कशी आहे?

उत्तर:आता मी एकदम ठणठणीत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे मी बरा झालो. आजारी असताना उभा महाराष्ट्र माझ्या पाठीशी होता. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सर्वांचा मी आभारी आहे. मी तुमच्या माध्यमातून पहील्यांदा महिन्याभरानंतर महाराष्ट्राच्या समोर आलो आहे. लोकांना हादरा बसेल असा तर मी नाहीये असं मला वाटतय.

प्र. 21 तारखेला तुम्ही अॅडमिट झालात. त्यावेळी काय घडलं? त्यापुढचा काळ कसा होता?

उत्तर: मला अतिशहाणपणाचा फटका बसला. काही खूप विकनेस होता. पण काही होत नाही, म्हणून मी लक्ष नाही दिलं आणि एक दिवस बेशुद्ध पडलो. त्यानंतर माझ्या बायकोला आणि मुलीला जे भोगावं लागलं त्याला जबाबदार मीच आहे. १० तारखेला माझी टेस्ट निगेटिव्ह आली. त्यानंतरही बाहेर फिरत राहीलो, बेफिकीरपणे काम करत राहीलो आणि त्याची किंमत मला मोजावी लागली.

लाईन

लाईन

प्र. कोव्हीड19 चा अनुभव घेतलेले तुम्ही नेते आहात. तुमच्याविषयी अनेक बातम्या येत होत्या. त्या तुमच्यापर्यंत पोहचत होत्या?

उत्तर:मी तुम्हाला सांगतो 23 एप्रिल ते 27 एप्रिल मला काही आठवतच नाही. त्यानंतर मी थोडा ठिकठाक झालो पण

देवाने शिस्त लावण्यासाठी, एक मर्यादा पाळण्यासाठी हे दिलं होतं असं वाटतं. या आजारातून एक शहाणपण मिळालं. आपल्याला काही मर्यादा नसतात अशा आजारांमुळे स्वत:ला बंधनं घालण्याचा शहाणपणा येतो. सामाजिक जबाबदारी ओळखून काम केलं पाहीजे. त्याचबरोबर काळजीही घेतली पाहीजे. जी मी नाही घेतली त्यामुळे देवाने हे चित्र दाखवलं असावं.

कोरोना
लाईन

प्र. पण तुमची तब्येत कशामुळे बिघडली? तुमची १० एप्रिलची टेस्ट निगेटिव्ह आली होती.?

उत्तर: माहिती नाही काय झालं...? त्याची शास्त्रीय कारणं मला खरच ंनाहीत पण देवाने त्या तीन-चार दिवसाच्या आठवणी माझ्या मेंदूतून पुसून टाकल्या. मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यानंतरचा प्रवास मला नाही आठवत... ऑस्कीजनचा पुरवठा माझ्या मेंदूला कमी होत होता. ऑक्सिजन 80-85 वर आलं होतं.

माझ्या डॉक्टर मित्राने सांगितलं,ऑक्सिजन खूप कमी होत चाललाय परिस्थिती हाताबाहेर जाईल त्याआधी अॅडमिट करा. मी तुमच्या माध्यामातून पहील्यांदा महाराष्ट्राशी बोलतोय. मी सर्व डॉक्टरांचे आभार मानतो की त्यांनी अतिशय गंभीर परिस्थितीतून मला बाहेर खेचून आणलं. मला एक नवं जीवनदान दिलं. स

र्वांचे खूप आभार... शदर पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सर्व सूत्र हातात ठेवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोज 8 वाजता डॉक्टरांशी बोलायचे. सहा डॉक्टर्सबरोबर कॉन्फरन्स कॉलवर माझ्या प्रकृतीविषयी चर्चा करायचे. यामुळे मंत्रीमंडळात असल्याचा आनंद तर आहेच पण एका घरात असल्यासारखं वाटतं.

माझी बायकोही पॉझिटीव्ह असल्यामुळे मुलीवर जबाबदारी येऊन पडली. माझी 70% केस हातातून गेली आहे. 30% चं केस आपल्या हातात आहे असं तिला डॉक्टरांनी सांगितलं. ते ऐकून माझी मुलगी 15 मिनिटं वेड्यासारखी वागायला लागली आणि त्यानंतर माझ्या मुलीने सर्व हातात घेतलं.

जितेंद्र आव्हाड

फोटो स्रोत, Getty Images

हॉस्पिटलमध्ये जाण्याआधी एक अल्लड नताशा होती पण मी या आजारातून आल्यानंतर बदललेली मॅच्युअर्ड नताशा आमच्या हातात मिळाली. ज्या घरात कोणी कधीही यायचं कधीही जेवायचं त्या घरात मी आता दुपारी 1 ला आणि रात्री 9 ला वेळेत जेवतो. काय खायचं हे मुलगी ठरवते. खरतर कोव्हीडचे आभारही मानायला हवेत. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर एक आनंदाच वेगळं वातावरण अनुभवतोय.

प्र. तुमच्या पत्नीची तब्येत आता कशी आहे? त्यासुध्दा पॉझिटिव्ह होत्या तुम्ही म्हणालात?

उत्तर:ती आता बरी आहे.. ती asymptotic होती. पण ती आता बरी आहे. आम्ही दोघांनी हे स्वत:वर ओढवून घेतलं. सगळ्याच राजकीय कुटुंबांची टिंगलटवाळी केली जाते. पण मी हॉस्पिटलमध्ये होतो, माझी पत्नी देखील पॉझिटिव्ह होती. घरी मोठं कोणी नव्हतं. सगळी जबाबदारी मुलीवर येऊन पडली.

या परिस्थितीत राजकीय कुटुंबाला जे भोगावं लागतं ते माझ्या कुटुंबाने भोगलं. तमाम महाराष्ट्राला मी एक प्रश्न विचारतो असं तुमच्या घरात झालं असतं तर? राजकीय घराण्याला ज्या मोठ्या किंमती मोजाव्या लागतात त्याचं मी एक ज्वलंत उदाहरण आहे. यात जर काही बरं वाईट झालं असतं तर काय झालं असतं हा विचार मनाला शिवतो तेव्हा यापुढे कसं वागावं याची बंधनं आल्यासारखी वाटतात.

प्र. तुम्ही व्हेंटिलेटरवर होतात हे खरय?

उत्तर: हो.. हे खरयं. मी व्हेंटीलेटरवर होतो. त्या आजारासाठी व्हेंटीलेटर लावण्याची गरज असतेच. मला श्वास घ्यायला त्रास होत होता त्यासाठी व्हेंटीलेटर लावलं होतं.

अनेक परदेशातल्या लोकांना कोव्हीड19 झालेला होता त्यांचे मेडीकल बुलेटीन यायचे पण तुमच्या तब्येतीची माहिती गोपनीय ठेवली गेली असं का केलं? जनतेला आपल्या नेत्याच्या तब्येतीविषयी जाणून घेण्याचा अधिकार आहे की नाही? तुमचं काय मतं आहे.

मी तर हॉस्पिटलमध्ये होतो. माझी पत्नी पॉझिटिव्ह असल्यामुळे तिला माझी काही बातमी दिली जात नव्हती. डॉक्टरचे १-२ फोन जायचे तेवढचं... पण माझ्या तब्येतीची बातमी दिली तर पुढे 24 तास घरच्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. घरच्यांना या सगळ्यापासून दूर ठेवण्याच्या भावनेतून शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता.

मी बरा आहे, एवढं कळणं पुरेसं आहे असं मला वाटतं. हे खूप संवेदनशील आहे. काही वेबसाईटवर पुरावा की जाळावा याची बातमी केली. पत्रकारांनी अस करू नये असं मला वाटतं. समाजामध्ये अस्वस्थता पसरेल अश्या बातम्या करू नये असं वाटतं. मला पुरायचं की जाळायचं? ही चर्चा सोशल मिडीयावर करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? मी हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणूनच मरणार आहे.. ते हिंदूंच्या रितीरिवाजानुसार होईल. माझ्या घरच्यांना त्याचा त्रास होतो.

प्र. या आजारातून बरे झाल्यावर तुमच्यात खूप बदल जाणवतायेत.. तुमचा या आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे?

लोकांना या आजाराबद्दल खूप घाबरवून ठेवलय. लोकांना खर्या अर्थाने आधाराची गरज आहे. बिल्डींग सील करा, त्याच्या घराच्यांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाका घेऊन जा... हे खूप विचित्र आहे. हे बदललं पाहीजे असं वाटतय. WHO नुसार हे या व्हायरस बरोबर जगावं लागेल वगैरे हे मला मान्य नाही. हा फ्लूसारखा एक दिवस निघून जाईल.

प्र. तुम्ही वारंवार सांगताय आता घराचा चार्ज मुलीने घेतलाय. भविष्यात ती तुमच्याबरोबर राजकारणातही काम करताना दिसेल?

उत्तर:माहिती नाही पण जर तिला रस असेल आणि तिचा राजकारणाकडे कल वळला तर आश्चर्य वाटायला नको शेवटी रक्तात आहे ते...

प्र. महाराष्ट्रामध्ये 30 हजार कोव्हीड रूग्णांचा आकडा पार केलाय. या आजारातून तुम्ही गेलाय तुम्ही या रुग्णांना काय सांगाल?

खूप सोप्या पद्धतीने आपण ही लढाई जिंकू शकतो. थोडी शिस्त लावण्याची गरज आहे. Asymptomatic रूग्णांची संख्या ही जास्त आहे. काही लोकं छोट्या मोठ्या औषधांनी बरे होतायेत. 20% लोकं या आजाराशी गंभीरतेने झुंज देतायेत. त्यामुळे घाबरण्याचं कारणं नाही. फक्त शिस्त पाळा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)