कोरोना व्हायरसबद्दल व्हॉट्सअप ग्रुपवरून अफवा पसरवणं अॅडमिनला पडणार महागात

सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहे. कोव्हिड-19 चा प्रसार टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कामाला लागली आहे.

पोलीस प्रशासनही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. लोकांनी बाहेर न येण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे. कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई सुरू असताना व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवांना पेव फुटलं आहे.

कोरोना व्हायरसच्या आडून एखादी चुकीची माहिती पसरवणारे, चुकीचा व्हीडिओ चुकीच्या माहितीसह शेअर करणे किंवा एखाद्या विशिष्ट धर्माला कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार ठरवणारे अनेक मॅसेज सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत.

अशा अफवांवर आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.

सोशल मीडिया अॅडमिनवर होणार कारवाई

सोशल मीडियावरील बातम्यांमुळे मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील सार्वजनिक आरोग्य किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यास अशा अफवा रोखण्यासाठी संबंधित अकाऊंटच्या अ‍ॅडमिनविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी याबाबत आदेश दिला आहे. शुक्रवारी (10 एप्रिल) संध्याकाळी ट्विट करून पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

कोरोना
लाईन

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, की सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनवर दिशाभूल करणार्‍या व भीती पसरवणाऱ्या संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी आता दोषी आढळून आलेल्या संबंधित अ‍ॅप्लिकेशनवरील 'अ‍ॅडमिन' विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.नागरिकांना विनंती करण्यात येत आहे, की अशाप्रकारच्या कुठल्याही माहितीची देवाण-घेवाण करू नये. तसेच आदान-प्रदान केल्या जाणाऱ्या माहितीवर अ‍ॅडमिनने नियंत्रण ठेवावे. नियमांचं उल्लंघन झाल्यास आम्हाला कळवा, आम्ही तुमची ओळख जाहीर न करता कारवाई करू.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यासोबत जोडलेल्या आदेशात पोलिसांनी सोशल मीडिया अॅडमिनना काही सूचना दिल्या आहेत. त्या मोडल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येऊ शकते.

या अटी पुढीलप्रमाणे

1.व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया किंवा मेसेंजर प्लॅटफॉर्मवरून चुकीची माहिती पसरवणे

2.एखाद्या विशिष्ट समुदायाबाबत बदनामीकारक मजकूर पसरवणे

3.लोकांमध्ये दहशतीचं वातावरण किंवा संभ्रमावस्था निर्माण करणे.

4.कोव्हिड-19 वर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा करत असलेल्या उपाययोजनांबाबत अविश्वास निर्माण करणे व त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणे.

10 एप्रिल दुपारी 12 वाजल्यापासून 24 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू असेल.

ग्रुपमधील सर्व अॅडमिनना लागू

सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या अफवांची जबाबदारी सर्वस्वी ग्रुप अॅडमिनची असेल, असं पोलिसांनी आदेशात म्हटलं आहे. एक अथवा अधिक अॅडमिन असले तर सर्वांवर कारवाई करण्यात येईल. एखाद्या सदस्याने अशा प्रकारचा मॅसेज टाकलेला असला तरी त्याला मॅसेज टाकण्याची परवानगी दिल्याबद्दल अॅडमिनला जबाबदार धरलं जाऊ शकतं, असं या आदेशात म्हटलं आहे.

मुंबई पोलीस

फोटो स्रोत, Twitter

जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च रोजी कोरोना व्हायरसमुळे होणारा कोव्हिड-19 हा रोग जागतिक साथ म्हणजेच पँडेमिक असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी देशभरात संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला होता.

दरम्यान, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोरोना व्हायरससंबंधित चुकीची माहिती, अफवा, व्हीडिओ तसंच इतर आक्षेपार्ह मजकूर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असल्याचं आढळून आलं.

या मॅसेजमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण, तसंच संभ्रमावस्था निर्माण होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. सार्वजनिक आरोग्य तसंच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारचा मजकूर शेअर करणं आता गुन्हा समजला जाईल. ते कलम 188 नुसार शिक्षेस पात्र ठरतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)