कोरोना व्हायरस : टोकियो ऑलिंपिक पुढे जाण्याची शक्यता, कॅनडानं रद्द केला सहभाग

Woman in mask walks past Olympic rings

फोटो स्रोत, Reuters

जगभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना जपानमधील ऑलिंपिक आणि पॅराऑलिंपिक स्पर्धांवरही त्याचं सावट पहायला मिळत आहे.

टोकियो ऑलिंपिक होणार की नाही, असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे कॅनडानं या ऑलिंपिकमधला आपला सहभाग रद्द केला आहे. 

पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी केल्यानंतर काही वेळातच कॅनडाने आपले खेळाडू ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. 

ऑलिंपिक स्पर्धा रद्द होणार नाही, पण ती पुढं ढकलणे हाच सध्याच्या परिस्थितीतला एकमेव पर्याय असल्याचंही शिंझो आबे यांनी म्हटलं होतं. 

ऑस्ट्रेलियन टीमनंही आपल्या खेळाडूंना 2021 च्या स्पर्धेसाठी तयार राहण्याची सूचना केली आहे. टोकियो ऑलिंपिक जुलै 2020 मध्ये होणार होती.

कोरोना
लाईन

कॅनडानं काय म्हटलंय?

देशातील अॅथलीट्स, स्पोर्ट्स ग्रुप तसंच कॅनडा सरकारशी चर्चा केल्यानंतर ऑलिंपिकमधून माघार घेण्याचा अतिशय 'अवघड' निर्णय आम्ही घेतला आहे, असं कॅनडाच्या ऑलिंपिक आणि पॅराऑलिंपिक समितीनं म्हटलं आहे.

त्यानंतर कॅनडाच्या ऑलिंपिक आणि पॅराऑलिंपिक समितीनं ऑलिंपिक समितीनं, आंतरराष्ट्रीय पॅराऑलिंपिक समिती आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशीही तात्काळ संपर्क साधून ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षासाठी पुढं ढकलण्याची विनंती केली.

ऑलिंपिक पुढं ढकलणं किती अवघड आहे, याची आम्हाला कल्पना आहे, पण तरीही आमच्या खेळाडूंच्या आणि एकूणच सर्वांच्या सुरक्षा आणि आरोग्याचा प्रश्न हा अधिक महत्त्वाचा आहे, असं कॅनडाच्या ऑलिंपिक समितीच्या निवेदनात म्हटलं आहे.कॅनडानं आपली भूमिका ट्वीटरवरुन स्पष्ट करताना म्हटलं आहे

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शिंझो आबेंनी काय म्हटलं होतं?

जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होत असतानाही जपानकडून ऑलिंपिक ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच पार पडणार, असं सांगण्यात येत होतं. मात्र सोमवारी (23 मार्च) संसदेमध्ये बोलताना पंतप्रधान शिंझो आबे यांनी प्रथमच कबूल केलं, की टोकियो ऑलिंपिक पुढे जाऊ शकते.

"पूर्ण क्षमतेनं स्पर्धा पार पडणं सध्याच्या परिस्थितीत शक्य दिसत नाहीये. त्यामुळे ऑलिंपिक पुढे ढकलणं अपरिहार्य आहे. आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे," असं आबे यांनी म्हटलं.

पण स्पर्धा पूर्णपणे पुढे ढकलण्यात येणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

शांततेच्या काळात ऑलिंपिक कधीही रद्द करण्यात आली नाही किंवा पुढे ढकलण्यातही आली नव्हती. 1940 साली टोकियोमध्ये होणारी ऑलिंपिक दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आली होती. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची भूमिका

रविवारी (22 मार्च) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं स्पष्ट केलं होतं, की स्पर्धांसंबधीचा निर्णय घेण्यासाठी आपण चार आठवड्यांचा वेळ घेत आहोत. स्पर्धा पुढं ढकलणं हा एक पर्याय झाला. त्याऐवजी स्पर्धा रद्द केली तर त्यानं समस्या सुटणार नाही किंवा कोणालाही कोणतीही मदत होणार नाही. 

अॅथलीट्सना लिहिलेल्या पत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी म्हटलं होतं, "मानवी आयुष्याचं मोल हे इतर कशापेक्षाही अधिक आहे... एखादी स्पर्धा आयोजित करण्यापेक्षाही अधिक... या अंधाऱ्या बोगद्यात आपण सगळे एकत्र प्रवेश करत आहोत, तो किती लांब आहे याची आपल्याला कल्पनाही नाहीये. पण या बोगद्यातून बाहेर पडताना ऑलिंपिकची ज्योत ही आपल्याला उजेड दाखवेल."

इतर देशातील खेळाडूंची भूमिका

सोमवारी (23 मार्च) ऑस्ट्रेलियानं आपल्या खेळाडूंना 2021 मधील उन्हाळी ऑलिंपिक आणि पॅराऑलिंपिकसाठी तयार राहायला सांगितलं आहे. ऑलिंपिक स्पर्धा जुलैमध्ये घेणं अवघड असल्याचं स्पष्ट असल्याचं ऑस्ट्रेलियन अधिकारी इयान चेस्टरमन यांनी म्हटलं होतं. अमेरिकन ट्रॅक अँड फील्ड संस्थेनं ऑलिंपिक स्पर्धा पुढं ढकलण्याचं सूतोवाच केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)