Budget 2020: निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प 10 मुद्द्यांमध्ये

फोटो स्रोत, Twitter / @DDNewsLive
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाचे मुद्दे येथे जाणून घ्या
1) आयकर सवलती

वार्षिक उत्पन्न 15 लाखापर्यंत असलेल्या व्यक्तींना या अर्थसंकल्पामध्ये करसवलत मिळाली आहे.
वार्षिक उत्पन्न 15 लाख असणारी एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारची करसवलत घेत नसेल तर तिला आतापर्यंत 2.73 लाख रुपये करापोटी द्यावे लागायचे. आता त्यांना नव्या दरांनुसार 1.95 लाख रुपये द्यावे लागतील.
जर त्यांना करसवलतीसाठी प्रयत्न करायचे असतील, तर ते जुन्या दरांनुसार सवलतीसाठी प्रयत्न करू शकतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
2) बँकांमध्ये आता 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित
बँकांमधील तुमची 5 लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहील. त्यापूर्वी केवळ 1 लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित होती. पीएमसी बँकेसारखे एखादे प्रकरण उद्भवले तर लोकांचे पैसे सुरक्षित राहातील.
3) LICचे शेअर्स सरकार विक्रीसाठी काढणार
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC मधला वाटा सरकार निश्चित करेल. LIC मधला लोकांचा वाटा शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
4) DDT रद्द
Dividend Distribution tax (DDT) (लाभांश वाटप कर) रद्द करण्यात आला आहे. ज्यावेळेस कंपन्या आपल्या समभागधारकांना लाभांश वाटप करायच्या, तेव्हा हा कर आकारला जायचा.
आता मात्र तो लाभांश करपात्र ठरणार नाहीये.
5) खासगी रेल्वे गाड्यांची रेलचेल
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून (PPP) रेल्वेच्या आणखी गाड्या खासगी कंपन्यांद्वारे चालवल्या जातील. पर्यटन स्थळं जोडण्यासाठी तेजससारख्या आणखी गाड्या सुरू केल्या जातील.
6) 100 नवी विमानतळं
'उड़े देश का आम नागरिक' किंवा उडान या योजनेअंतर्गत 2024 पर्यंत देशात 100 नवी विमानतळं उभारली जातील.

फोटो स्रोत, TWITTER/@PIB_INDIA
7) शेतकऱ्यांसाठी विशेष मालवाहतूक व्यवस्था
नाशवंत माल बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी किसान रेल आणि किसान उडान योजना सुरू करण्यात येईल.
8) आयात महागणार
परदेशातून येणाऱ्या चपला, फर्निचर, वैद्यकीय उपकरणांवरील कस्टम ड्युटी आणि सेस वाढवल्यामुळे त्यांच्या किमती वाढतील.
9) तुमच्या घरांमध्ये प्रीपेड वीज मीटर
पुढील तीन वर्षांमध्ये प्री-पेड वीज-मीटर बसवण्यात येतील. त्यामुळे लोकांना आपला वीज पुरवठादार आणि वीजेचा वापर, या दोन्ही गोष्टींचा निर्णय घेता येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
10) मेगाभरती
राष्ट्रीय भरती विभागातर्फे बिगरअधिकारी कर्मचाऱ्यांची भरती सरकार करेल. हा विभाग कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी विविध परीक्षांचे आयोजन करेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)










