Budget 2020: अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केल्या या महत्त्वाच्या घोषणा

फोटो स्रोत, loksabha tv
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ, सबका विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात येतोय, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
तीन वैशिष्ट्ये
अर्थमंत्र्यांनी सांगितलं की या अर्थसंकल्पाची तीन वैशिष्ट्यं आहेत - Aspirational India, Economic Devlopment आणि Caring Society.
"तरुणांच्या आशा आकांक्षाकडे या अर्थसंकल्पात पूर्ण केल्या जातील असा प्रयत्न केला जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांचा जो सबका साथ सबका विश्वास चा नारा आहे त्याप्रमाणेच हा अर्थसंकल्प आहे. त्याचप्रमाणे caring society म्हणजेच प्रत्येकाची काळजी घेईल असा हा अर्थसंकल्प असेल," असं त्या म्हणाल्या.
ही आहे नवी करमर्यादा
2.5 ते 5 लाख रुपये उत्पन्न असलेल्या करदात्यांना अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. या गटासाठी करमर्यादा 5 टक्के होती. आता ती शून्य टक्के झाली आहे.
यामुळे सरकारचा महसूल 40,000 कोटी रुपयांनी कमी होणार आहे.
अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा?
भाषणादरम्यान अर्थ मंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी बढाओ ही योजना यशस्वी झाल्याचं म्हटलं. त्यावर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. कृपया माझं भाषण ऐकून घ्या आणि या योजनेचं राजकीय भांडवल करू नका असं सीतारामन म्हणाल्या.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला म्हणाले की सर्व माननीय सदस्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
- महिलांसाठीच्या योजनांसाठी 28 हजार 600 कोटींची तरतूद करण्यात आलीय.
- अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन आणि पोषण अभियान : 2017-18 साली पोषण अभियान सुरु केलं गेलं. याचा फायदा महिलांना झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलाय. याच योजनेच्या अनुशंघानं देशातील 6 लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिले जातील आणि त्याद्वारे 10 कोटी घरांमधील पोषण अभियानाची माहिती मिळवली जाईल.
- पोषण योजनांसाठी आर्थिक तरतूद : 2020-21 या वर्षासाठी पोषणाशी संबंधित चालवण्यात येणाऱ्या योजनांसाठी 35 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.
- मुली शिकण्याचं प्रमाण वाढल्याचा दावा : बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा परिणाम सकारात्मक झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलाय. मुलांपेक्षा मुली शाळेत जास्त प्रवेश करत असल्याची नोंद झालीय.
- मुलींच्या माता बनण्याच्या वयोमर्यादेवर विचार होणार : 1978 साली शारदा अॅक्ट, 1929 नुसार मुलींच्या लग्नाचं वय 15 वरुन 18 करण्यात आलं. आता हे सरकार मुलींना माता बनण्याच्या किमान वयोमर्यादेवर विचार करेल. एक टास्क फोर्स तयार करुन 6 महिन्यात त्याबाबतचा अहवाल सोपवेल.
वित्तीय तुटीचं उद्दिष्ट 3.8
- आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये वित्तीय तुटीचं उद्दिष्ट 3.5%
- 2020 मध्ये वित्तीय तूट 3.8%
बॅंकांची स्थिती चांगली करणार
- शेड्युल्ड कमर्शियल बँकांवर नियामकांचं लक्ष असून बँकांची परिस्थिती चांगली
- सध्याची डिपॉझिट इन्शुरन्सची किंमत 1 लाखांवरून वाढवून 5 लाख करणार म्हणजेच बॅंका बुडाल्यावर एक लाख रुपये मिळत असत पण यापुढे पाच लाख रुपये मिळू शकतील.
- IDBI बँकेतला उर्वरित सरकारी हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विकणार
- LIC मधल्या सरकारी हिश्श्याची IPOद्वारे विक्री केली जाणार
करदात्यांचा छळ होऊ नये म्हणून
- Tax Payer Charter बनवण्यात येणार.
- करदात्यांचा छळ होऊ नये म्हणून नियमावली येणार
- 'टॅक्स हॅरासमेंट' खपवून घेतली जाणार नाही
- कंपनी अॅक्टमध्ये बदल करण्यात येणार
हवामान बदल
- हवामान बदलांसाठी विविध पावलं उचलली जाणार.
- 4400 कोटी - हवामान बदल विषयक प्रयत्नांसाठी
- जास्त प्रदूषण करणारे थर्मल प्लांट बंद करणार
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी योजना
- 3150 कोटींची तरतूद
- 5 पुरातन जागांचा विकास करण्यात येणार
- देशातल्या आणखी 4 वस्तूसंग्राहलायांची दुरुस्ती आणि विकास होणार
- पर्यटन क्षेत्रासाठी 2500 कोटी
सामाजिक कल्याण
- मागासवर्गांसाठी 85,000 कोटीची तरतूद
- मागास जमातींसाठी 53,700 कोटींची तरतूद
- 9500 कोटी - ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी तरतूद
माहिती आणि तंत्रज्ञान
- ग्रामपंचायत स्तरापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हीटी तयार होण्यासाठी डेटा सेंटरचा उपयोग होईल.
- नॉलेज ट्रान्सलेशन क्लस्टर तयार केले जाणार
- एक लाख ग्राम पंचायतींना इंटरेनट जोडणी
ऊर्जा आणि खनिज तेल
- ऊर्जा आणि अपारंपरिक उर्जा स्रोतांसाठी 22,000 कोटींची तरतूद
- नॅशनल गॅस ग्रीड 27,000 किमी पर्यंत वाढवणार
- स्मार्ट मीटर बसवले जाणार
पायाभूत सुविधा
- 100 लाख कोटी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणार
- उद्योग आणि व्यापार विस्तारासाठी 27,300 कोटींची तरतूद
- इन्फ्रा पाईपलाईनच्या माध्यमातून 6500 प्रोजेक्टस करणार
- रेल्वेच्या जमिनीवर सोलार पॉवर प्लान्ट उभारले जातील
- 27,000 किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे इलेक्ट्रिफिकेशन
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टला चालना
- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे 2023 पर्यंत पूर्ण होणार
- चेन्नई - बंगळुरू एक्स्प्रेस वे लवकरच सुरू होणार
- महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी तेजससारख्या नवीन गाड्या धावणारPPP च्या माध्यमातून 150 नवीन ट्रेन्स येणार
- PPPच्या माध्यमातून 150 नवीन ट्रेन्स येणार
- 2024 पर्यंत 100 नवीन विमानतळ बांधणार
उद्योग क्षेत्र
- Investment Clearance Cell ची स्थापना. वेबसाईटच्या माध्यमातून काम केलं जाणार
- नवीन निर्विक योजना जाहीर - ही योजना छोट्या निर्यातदारांसाठी आहे.
- मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, भाग भारतात तयार करायला प्रोत्साहन
- प्रत्येक जिल्हाचं प्रमुख ठिकाण हे उद्योगाचं ठिकाण व्हावं यासाठी प्रयत्न करणार.
- टेक्स्टाईल मिशनसाठी 1480 कोटी
शिक्षण
- लवकरच येणार नवीन शैक्षणिक धोरण
- वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सोय.
- वैद्यकीय क्षेत्रात असलेली डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार.
- स्टडी इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत परदेशी विद्यार्त्थ्यांना भारतात येण्यास प्रोत्साहन देणार
- शिक्षणासाठी 99,300 कोटींची तरतूद आणि कौशल्य विकासासाठी 3000 कोटींची तरतूद
- नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सीची स्थापना होणार
- सरकारी बँकांमधील नियुक्ती प्रक्रियेत बदल होणार
जलजीवन मिशन
- देशातील पाण्याची आणि सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी 3.6 लाख कोटीची तरतूद
आयुष्यमान भारत
- 122 जिल्ह्यांमध्ये आरोग्य छोट्या शहरांत आयुष्मान हॉस्पिटल बनवण्यात येतील. त्यांचा आरोग्यासाठी उपयोग होईल.
- 'टीबी हारेगा, देश जीतेगा' - 2025 पर्यंत भारत टीबीमुक्त होईल घोषणा.
- 69 हजार कोटी रुपये आरोग्यविषयक योजनांमध्ये वापरले जातील.
- आयुषमान' योजनेखाली नवीन हॉस्पिटल्सची निर्मिती केली जाईल.
2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट
- 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल असं सीतारामन म्हणाल्या. त्यासाठी शेतकऱ्यांना जोडव्यवसाय करण्यास प्रोत्साहित केलं जाईल. पीएम किसान योजनेअंतर्गत 16 कलमी कार्यक्रम राबवला जाईल.
- 100 दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यांसाठी खास कार्यक्रम राबवला जाणार आहे. शेतीसाठी सौरऊर्जा वापरायला प्रोत्साहन देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. सेंद्रिय खतं वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
- 2020 पर्यंत जनावरांसाठी 108 मिलियन टन पर्यंत चारा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
- मासळी उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना
- सागर मित्र योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसायात समुद्र किनारी राहणाऱ्या तरूणा वर्गाला रोजगार
- 2.83 लाख कोटी रुपयांची शेती आणि शेतीविषयक कामांसाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
महागाईवर नियंत्रण मिळवण्यास सरकार यशस्वी
गेल्या 2 वर्षांत 60 लाख नवीन टॅक्स पेयर्स तयार झाले, देशातील इन्स्पेक्टर राज संपवण्यात यश, बँकिंग व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली तसेच देशातल्या बँकांची स्थिती सुधारली असं अर्थ मंत्री म्हणाल्या.
आता भारत जगातली सर्वांत मोठी 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परकीय गुंतवणूक वाढली आहे.
अर्थ मंत्र्यांच्या हातात वहीखातं
अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हातात वही खातं आहे. गेल्यावेळी त्यांनी लाल पिशवीतून अर्थसंकल्पाची कागदपत्रं आणली होती. यावेळीही त्या वही खातं घेऊन आल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अनुराग ठाकूर यांची पूजा
अर्थसंकल्पाला निघण्यापूर्वी राज्य अर्थ मंत्री अनुराग ठाकूर यांनी पूजा केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
त्यापूर्वी म्हणजे आज शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 2019-20 या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहाणी अहवाल सादर करण्यात आला.
या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सरकार इंकम टॅक्स स्लॅब बदलणार का हे देखील पाहणे महत्त्वाचं राहील.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









