Maninder Singh: लाइव्ह टीव्ही शो वर दिली प्रेयसीच्या हत्येची कबुली

- Author, अरविंद छाबडा,
- Role, बीबीसी प्रतिनिधी, चंदिगडमधून
"आमच्या लग्नाची बोलणी सुरू होती. तिच्या घरचे लोक रोज नवा अडथळा तयार करायचे. त्यांच्या मुलीसारखी मला सरकारी नोकरी नाही असं ते म्हणायचे. म्हणून मी तिला संपवलं."
27 वर्षीय मनिंदर सिंहने याच शब्दांमध्ये चंदिगडमधून चालवल्या जाणाऱ्या एका खासगी टीव्ही वाहिनीच्या लाइव्ह कार्यक्रमात गुन्ह्याची कबुली दिली.
लाइव्ह टीव्ही शोमध्ये मनिंदर म्हणाला, 30 डिसेंबर 2019मध्ये त्याने आपली गर्लफ्रेंड सरबजीत कौरची हत्या केली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला अटक केली.
मनिंदरने आपल्या गर्लफ्रेंडची चंदिगडच्या इंडस्ट्रीयल एरिआमधील एका हॉटेलमध्ये धारधार शस्त्रानं हत्या केली होती.
आश्चर्य म्हणजे मनिंदर त्याआधीही एक हत्येचा खटल्यात होता. 2010 मध्ये त्याने हरियाणात आपल्या जुन्या गर्लफ्रेंडची हत्या केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
टीव्ही वाहिनीत काम करणाऱ्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्यानं, पोलीस स्टेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरच्या आपल्या कार्यालयात मनिंदर कसा घुसला होता हे बीबीसीला सांगितलं.
ते म्हणाले, त्यानं ऑफिसबाहेर उभ्या असलेल्या आमच्या एका कॅमेरामनला आपण एका महिलेची हत्या केल्याचं सांगितलं. ते ऐकून आमचा कॅमेरामन हादरला. पोलीस माझ्या कुटुंबाला त्रास देत आहेत आणि मला आत्मसमर्पण करायचे आहे.
त्याच्याशी बोलणं झाल्यावर त्यानं आमच्या क्राइम रिपोर्टरला बोलावून घेतलं. काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मनिंदरला टीव्ही स्टुडिओमध्ये नेण्यात आलं. त्या दरम्यान आम्ही पोलिसांनाही फोन केला.
मनिंदर एक अट्टल गुन्हेगार
लाइव्ह टी शोमध्ये मनिंदरने आपला गुन्हा कबूल केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार मनिंदर काही महिन्यांपूर्वीपर्यंत एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो त्या कंपनीत क्लार्कसुद्धा होता.
त्याची गर्लफ्रेंड सरबजीत कौर चंदिगडमध्येच नर्सचं काम करत होती.
चंदिगडच्या पोलीस अधिकारी नेहा यादव यांन मनिंदर एक पक्का गुन्हेगार असल्याचं सांगतात. त्या म्हणाल्या, सरबजीतच्या गळ्यावर ज्या प्रकारचे घाव आहेत, ते पाहाता तो एक अट्टल गुन्हेगार असल्याचं दिसतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्या म्हणतात, टीव्ही शो'मध्ये तो गेला तेव्हा त्याच्या डोक्यात दोन गोष्टी असाव्यात. एक तर त्याला प्रसिद्धी हवी असेल आणि त्याबरोबरच त्याला लोकांची सहानुभूती हवी असेल. म्हणूनच त्याने कुटुंबाचा उल्लेख केला. टीव्हीवर आल्यावर आपल्याला एखादा मोठा वकील मिळेल असं त्याला वाटलं असेल कारण त्याच्याकडे वकील नेमण्यासाठी पैसे नाहीत.
टीव्हीच्या फुटेजचा कोर्टात ठोस पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे.
नेहा यादव सांगतात, "त्यांना सरबजितवर संशय होता. ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी त्यांनी सरबजितला मोबाईल दाखवण्याची मागणी केली होती. सरबजितने नकार दिल्यावर त्यांच्यात वादही झाला. त्याआधीच्या खटल्यात सरबजितला आपल्या गर्लफ्रेंडच्या चारित्र्यावर संशय होता. त्यानंतर त्याने तिची हत्या केली होती."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनिंदरने सरबजितचा गळा दाबला आणि नंतर धारधार हत्यारानं सरबजितची गळा कापला.
त्या दोघांनी 30 डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये खोली घेतल्याचं हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आलं. त्याच दिवशी संध्याकाळी मनिंदर हॉटेलमधून निघून गेला होता.
जेव्हा दुसऱ्या दिवशी हॉटेलचे कर्मचारी खोलीत गेले तेव्हा त्यांना सरबजितच्या हत्येबद्दल समजले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








