काँग्रेस आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यातील संबंधांचा दावा किती खरा?-फॅक्ट चेक

काँग्रेस-राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

सोशल मीडियावर गेल्या पाच-सहा दिवसांपासून एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. "देशात काँग्रेस सरकार सत्तेवर आलं तर रोहिंग्या मुसलमान हिंदूंना नामशेष करतील," असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी हा मेसेज ट्वीट केला आहे. त्यांचा दावा आहे, की भाजपच्या राज्यसभा खासदार सोनल मानसिंह यांनी हा मेसेज व्हॉट्स अॅपवर पाठवला आहे.

खरंच भाजपचे खासदार हा मेसेज पसरवत आहेत? बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने या दाव्याची पडताळणी केली. तीन मेल आणि दोन टेक्स्ट मेसेज केल्यानंतर आम्हाला सागर केसरी नावाच्या व्यक्तिकडून उत्तर आलं. संबंधित व्यक्तीनं सोनल मानसिंह यांच्याच नंबरवरुन उत्तर पाठवलं.

सोनल मानसिंह यांनी व्हॉट्स अॅपवरुन पाठवलेला मेसेज

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, सोनल मानसिंह यांनी व्हॉट्स अॅपवरुन पाठवलेला मेसेज

आपण सोनल मानसिंह यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम करत असल्याचं सागर केसरी यांनी सांगितलं.

सागर केसरी यांनी मेसेजमध्ये लिहिलं आहे, "माझं नाव सागर केसरी आहे आणि मी सोनल मानसिंह यांच्यासोबत काम करतो. मॅडमच्या फोनवरुन मी दोन-तीन लोकांना हा मेसेज पाठवला आहे. हा मेसेजमध्ये जे लिहिलंय ते खरं आहे का, याची पडताळणी करण्यासाठी मी तो पाठवला होता. पण मेसेज फॉरवर्ड करताना मी हे लिहायचंच विसरून गेलो. ही माझी चूक आहे. मी त्याबद्दल माफी मागतो. हा मेसेज पुढे पाठविण्याआधी अलका लांबा यांनी सोनल मानसिंह यांच्याशी संपर्क साधायला नको होता? पण या मुद्द्याचा राजकीय लाभ घेण्याच्या नादात त्यांनी असं केलं नाही.

बीबीसीनं याप्रकरणी आम आदमी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्या अलका लांबा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी म्हटलं, "मी सोनलजींना ओळखते. मात्र जेव्हापासून त्या भाजपच्या राज्यसभा खासदार झाल्या आहेत, तेव्हापासून भाजपच्या आयटी सेलनं बनवलेले असे मेसेज पसरवत असतात. यावेळी त्यांनी देशातील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या विरोधात अफवा पसरविल्यामुळे मी शांत बसू शकले नाही. मी म्हणूनच त्यांच्या मेसेजचा स्क्रीन शॉट घेतला आणि शेअर केला. एका घटनात्मक पदावर असताना असा विचार करणं त्यांना शोभत नाही.

आकडेवारी काय सांगते?

2017मध्ये तत्कालीन गृहमंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं होतं, की यापैकी 16,000 रोहिंग्या मुसलमान असे आहेत ज्यांची संयुक्त राष्ट्रांचे शरणार्थी म्हणून नोंद झाली आहे.

रोहिंग्या

फोटो स्रोत, Getty Images

एप्रिल 2019 मध्ये मिक्स्ड मायग्रेशन सेंटरच्या अहवालानुसार ऑक्टोबर 2018 पर्यंत भारतात 18000 स्थलांतरितांकडे संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांतर्फे देण्यात आलेलं शरणार्थी ओळखपत्र आहे.

मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की रोहिंग्याचं वर्चस्व कर्नाटक, केरळ, बंगाल, पंजाबमध्ये आहे. मात्र, हा दावा चुकीचा आहे. कर्नाटक वगळता बाकी राज्यांमध्ये बिगरभाजप पक्षांचं सरकार आहे.

कोणत्या राज्यात सर्वाधिक रोहिंग्या शरणार्थी?

मेसेजमध्ये जो दावा करण्यात आला आहे, त्याच्या अगदी उलट कर्नाटक, केरळ, बंगाल, पंजाबमध्ये शरणार्थींची संख्या कमी आहे.

  • जम्मू काश्मीर
  • आंध्र प्रदेश
  • हरियाणा
  • दिल्ली
  • राजस्थान

कोणत्या राज्यात शरणार्थींची संख्या कमी आहे?

  • कर्नाटक
  • तामिळनाडू
  • उत्तर प्रदेश
  • पश्चिम बंगाल

म्हणजेच कर्नाटक, केरळ, बंगाल आणि पंजाबमध्ये रोहिंग्या शरणार्थींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, हा स्क्रीन शॉटमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात येणारा हा स्क्रीन शॉट बनावट आहे.

रोहिंग्या कोण आहेत?

म्यानमारची लोकसंख्या बौद्धधर्मीयबहुल आहे. एका अंदाजानुसार म्यानमारमध्ये 10 लाख रोहिंग्या मुसलमान आहेत. यापैकी बहुतांश बांगलादेशातून आले असल्याचं सांगितलं जातं. म्यानमार सरकारने त्यांना नागरिकत्व देण्यास नकार दिला आहे. या लोकांच्या अनेक पिढ्या म्यानमारमध्ये राहत आहेत.

रोहिंग्या

फोटो स्रोत, Getty Images

रखाइन भागात 2012 पासून धर्माच्या आधारावर संघर्ष सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. एक लाखाहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत.

देशात 40 हजार रोहिंग्या शरणार्थी आहेत. यांच्यापैकी अनेकांकडे संयुक्त राष्ट्र उच्चायुक्ताकडून देण्यात आलेलं शरणार्थी ओळखपत्र नाही.

ऑक्टोबर 2018 मध्ये भारत सरकारने सात रोहिंग्या शरणार्थींना म्यानमारमध्ये परत पाठवलं. 2012 मध्ये बेकायदेशीर पद्धतीने सीमा पार केल्याप्रकरणाच्या आरोपाखाली फॉरिनर्स अक्टअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)