उद्धव ठाकरे यांच्याकडून रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटींचा निधी

फोटो स्रोत, ANI
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच्यासह तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
पाहा शपथविधी सोहळा आणि त्याचं संपूर्ण विश्लेषण LIVE
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
मात्र अजित पवार हेच उपमुख्यमंत्री होणार, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि डीएमकेचे एम. के. स्टॅलिन या शपथविधीसाठी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेसुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते.
शिवाय इतर महत्त्वाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
शपथविधीनंतर लगेचच आज रात्री पहिली कॅबिनेट बैठक होणार आहे.
पाहा आजचे ताजे अपडेट्स

10.37 - संजय राऊतांचे चिमटे
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षाचे नेते झाल्याबद्दल शुभेच्छा देत चिमटे काढले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
10.15 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक झाली. या बैठकीत 2 निर्णय घेण्यात आले आहेत.
"हे सरकार सर्व सामान्यांचं सरकार असेल, मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या सर्व योजनांचं वास्तववादी चित्रण देण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत," अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्य टीकेला उत्तर देताना मंत्रिमंडळा कुठल्या विभागाचं आहे मग, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
यावेळी धर्मनिरपेक्ष शब्दावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मात्र उद्धव ठाकरे यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे. तसंच प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच त्यांनी 'सेक्युलरचा अर्थ काय' असा प्रतिसवाल केला.
9.00 - देवेंद्र फडणवीसांची टीका
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीका केली आहे. "महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
7. 10 - शपथविधी सोहळा संपन्न, मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
6.51 - शिवाजी पार्कवर आतषबाजी

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh
6.45 - उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.
6.38 - शपथविधी सोहळ्याला सुरुवात
उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं आहे, तसंच शरद पवार सुद्ध सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत.
6.36 - राज्यपालांचे आगमन
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं आगमन शिवाजी पार्कवर झालं आहे.
6.22 - राज ठाकरे शपथविधीच्या व्यासपीठावर
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या व्यासपीठावर राज ठाकरेसुद्धा उपस्थित आहेत.
6.00 - राहुल गांधींचे उद्धव ठाकरेंना पत्र
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहू न शकल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
5.50 - उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवाजी पार्ककडे रवाना झाले आहेत.
5.45 - शरद पवार शिवाजी पार्काकडे रवाना
राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार हे सहपरिवार सिल्व्हर ओकवरून शिवाजी पार्काकडे रवाना झाले आहेत.
4.57 - मराठी पत्रकात 'धर्मनिरपेक्ष' शब्द नाही
तिन्ही पक्षांच्य आघाडीनं एक पत्रक जारी करून त्यांचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला. मराठी आणि इंग्रजीमध्ये ही पत्रकं जारी करण्यात आली. त्यातील इंग्रजी पत्रकात 'secular' म्हणजेच धर्मनिरपेक्ष शब्द लिहिण्यात आला आहे. मात्र मराठी पत्रकात धर्मनिरपेक्ष शब्द टाळण्यात आला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
मात्र "ही आघाडी सर्वसामान्यांच्या हितासाठी, महाराष्ट्रात सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेल. यामध्ये भाषा, जात, धर्म असा कुठलाही भेदभाव केला जाणार नाही," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
4.15 - महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद सुरू
शिवसेनेा विधिमंडळाचे पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाची माहिती दिली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे -
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नोकरभरतीला प्राधान्य देणार
- अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत
- भाषा, जात, धर्म यावरून आम्ही भेदभाव करणार नाही
- संविधानाच्या तत्व आणि मुल्यांना अधारित ठेवून सरकार चालवणार
- शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापारी सर्वांच हित पाहिलं जाईल
- सर्व जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
- महिला सुरक्षेल प्राधान्य
- अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांचं मानधन वाढणार
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
3.00 - उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी राज ठाकरे शिवाजी पार्कवर जाणार आहेत.
2.30 - अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत, त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेणार आहेत.

फोटो स्रोत, SHARAD BADHE
"मी अजिबात नाराज नाही, मी नारज असल्याची चर्चाच कुठे येत नाही, बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मी मार्गदर्शन सुद्धा केलं मी त्यावेळेस भूमिका घेतली होती, त्याविषयी आता मला काही बोलायचं नाही, मी आणि सुप्रिया एकत्र शपथविधीला जाणार आहे," असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
1.40: आजच्या शपथविधीमध्ये शपथ घेणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता त्याबाबत काहीही ठरले नाही, त्याची माहिती नाही असं त्यांनी सांगितले.

फोटो स्रोत, TWITTER
1.34: आम्ही केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांना शपथविधिसाठी आमंत्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आम्ही आमंत्रण दिलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आदित्य ठाकरे यांनी स्वतः आमंत्रण दिलं आहे. राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्र्यांनाही आम्ही आमंत्रण दिलं आहे असं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
1.30: अजित पवार शरद पवार यांच्य़ा सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेलही तेथे उपस्थित आहेत.
1.20: भाजपानंही बहुमत सिद्ध केलं असतं. जर सर्वोच्च न्यायालयानं 24 तासांची मुदत देण्याची अट घातली नसती तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामे दिले नसते. 24 तासात बहुमत सिद्ध करणं कठिण होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
12.50: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगन भुजबळ यांच्याबरोबर जयंत पाटीलही शपथ घेण्याची शक्यता आहे.
12.40: शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई शपथ घेणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
12.36: दुपारी चार वाजता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही पक्षांची मुंबईत रंगशारदा सभागृहात एकत्र पत्रकार परिषद होणार आहे.

फोटो स्रोत, TWITTER
12.35: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज शपथ घेणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आज शपथ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्य़ा दोन आमदारांची नावे यादीत आहेत. त्या यादीत आपले नाव आहे असे छगन भुजबळ यांनी सांगितलं.
12.17: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन बंद केल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं समजत आहे. सततचे येणारे फोन टाळण्यासाठी त्यांनी फोन बंद केल्याचे आणि ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहातील असे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

फोटो स्रोत, ANI
12.00: द्रमुकचे अध्य़क्ष एम. के. स्टॅलिन नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 9

फोटो स्रोत, ANI
10.50: आज किती मंत्री शपथ घेतील हे माहिती नाही. परंतु मुख्यमंत्री आणि तीन पक्षांमधील काही मंत्री शपथ घेतील असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 10
संजय राऊत यांनी केलं ट्वीट... असली उडान बाकी है...
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 11
नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड
महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदासाठीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली.

फोटो स्रोत, TWITTER/SHIV SENA
ही घोषणा करताना ते म्हणाले, "मी यापूर्वी उद्धवजींना भेटलो नव्हतो. अलिकडेच माझी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच भेट झाली आणि मला त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप आवडलं." सरकारस्थापना दृष्टीपथात आल्यानंतर महाआघाडीच्या घरोब्याची सुरुवात ही अशी गोड शब्दांनी झाली. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात 'ज्यांना 30 वर्षं विरोध केला त्यांनीच नेतृत्वावर विश्वास ठेवला' असं म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची स्तुती केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 12
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)