काँग्रेस: प्रियंका गांधी यांचाही फोन झाला होता हॅक

फोटो स्रोत, Getty Images
व्हॉटसअॅप स्पायवेअरच्या प्रकरणाने रविवारी एक वेगळं वळण घेतलं आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पिगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअपवर पाळत ठेवल्याची माहिती उघड झाली होती. आता काँग्रेसने आपल्या नेत्या प्रियंका गांधी यांचाही फोन हॅक झाल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज रविवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. त्यामध्ये हॅक झालेल्या लोकांच्या फोनवर व्हॉट्सअॅपनं मेसेज पाठवले होते तेव्हा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनाही असा मेसेज आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसनं 'अब की बार, जासूस सरकार' अशा नावानं काँग्रेसनं एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आहे. या माध्यमातून सुरजेवाला यांनी सरकारला काही प्रश्नही विचारले आहे. 2019 म्हणजेच यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सरकारनं राजकीय नेते आणि नागरिकांवर नजर ठेवायला या पिगॅसस स्पायवेअरचा उपयोग केला का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
2019 मे महिन्यापासूनच सरकारला याची कल्पना होती का? सरकारमध्ये बसलेले लोक यातले गुन्हेगार आहेत का ? असे प्रश्न सुरजेवाला यांनी सरकारला विचारले आहेत. व्हॉटसअॅपची मालक असणारी कंपनी फेसबूकने या प्रकरणाची माहिती भारत सरकारला एप्रिल 2019मध्ये दिली होती.
तसेच याबद्दल इंडियन कम्प्युटर रिस्पॉन्स टीमला (CERT-IN) सांगितलं होतं. CERT ने 17 मे ला एक अहवाल जाहीर केला. त्यातील माहिती धक्कादायक आहे. व्हॉटस्अॅपमधील माहिती दूरवरून चोरली जाऊ शकते अशी स्थिती निर्माण झाल्याचं यात लिहिलं आहे असं सुरजेवाला म्हणाले. सुरजेवाला यांनी हा अहवाल पत्रकार परिषदेत वाचून दाखवला.
गेल्या काही दिवसापांसून लोकांवर पाळत ठेवण्याचं काम आपल्या समोर आलं आहे. यातून भाजपचे कार्यकर्ते आणि सरकारी संस्था पिगॅससचा वापर करून देशातील विचारवंत, पत्रकार, संपादक, नेते यांचा फोन हॅक करत आहेत. या प्रकरणातून भाजपा सरकारची षडयंत्रकारी विचारधारा समोर आली आहे. लोकांना भाजपला आता भारतीय जासूस पार्टी असं नाव दिलं आहे, असा टोला सूरजेवाला यांनी लगावला.

फोटो स्रोत, Getty Images
सुरजेवाला या पत्रकार परिषदेत म्हणाले, "निवडणुकांच्या काळामध्ये आंदोलक, पत्रकारांवर पिगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवली गेली. यातून भाजप सरकारची षडयंत्रकारी विचारधारा दिसते. याची कागदपत्रे आम्ही उघड करणार आहोत. पिगॅसस आपली सेवा फक्त सरकारलाच देते. कोणत्या इंटरनेट सेवा पिगॅससने करप्ट केल्या त्याचीही कागदपत्रे समोर आली आहेत."
"सर्वांत जास्त धक्कादायक बाब म्हणजे नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर म्हणजेच राष्ट्रीय इंटरनेटचा कणा असणारी संस्था तसेच जी संस्था बीएसएनएल आणि व्हीएसएनएल चालवते तिथेही ही पिगॅसस स्पायवेअर सापडला. हे असं असेल तर देशातल्या सर्वोच्च न्यायालयापासून संसदेपर्यंत आणि देशातल्या राज्यांमधील सरकारांपर्यंत त्याच्या तावडीतून कोणीही सुटलेलं नाही," असंही सुरजेवाला यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही काल ट्वीट करून सरकारवर टीका केली आहे. "भाजप किंवा सरकारने जर इस्रायली संस्थेच्या मदतीने पत्रकार, वकील, आंदोलक, राजकीय नेत्यांच्या फोनमधील माहितीवर पाळत ठेवली असेल तर ते मानवाधिकारांचे मोठं उल्लंघन आहे. तसेच राष्ट्रसुरक्षेलाही तो धोका आहे. आता सरकारच्या उत्तराची वाट पाहात आहे," असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)