काश्मीर कलम 370 : 'श्रीनगरमधल्या बहुसंख्य भागांतील निर्बंध हटवले'

फोटो स्रोत, Shahid Choudhary / Twitter
सरकारच्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात श्रीनगरमधील सौरा प्रदेशातील नागरिकांनी निदर्शनं करण्याची बातमी बीबीसी मराठीनं दिली होती.
आता श्रीनगरमधल्या बहुसंख्य भागांतील निर्बंध हटवण्यात आले आहेत, असं ट्वीट श्रीनगरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी शाहिद चौधरी यांनी केलं आहे. काश्मीरमधील काही भागांमध्ये ईदच्या सणासाठी खरेदी सुरू असल्याचंही सोशल मीडियावर अनेकांनी प्रसिद्ध केले आहे.

फोटो स्रोत, Shahid Choudhary / Twitter
"श्रीनगरमधील 250हून अधिक एटीएम मशीन कार्यरत करण्यात आल्या आहेत, तसंच बँकाही उघडण्यात आल्या आहेत. ईदसाठीची पगाराची आगाऊ रक्कम बँक खात्यात आज (शनिवार) जमा करण्यात आली आहे," असं ट्वीट शाहिद चौधरी यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे श्रीनगर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भेट घेतल्याचंही ट्वीट शाहीद चौधरी यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Shahid Choudhary / Twitter
"तसंच श्रीनगरच्या बहुतेक भागांमधील बंधन हटवण्यात आली आहेत," असंही त्यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Shahid Choudhary / Twitter
"श्रीनगरच्या लाल चौक, जहांगीर चौक, बाटमालू, दाल गेट या परिसरातील, तर बारामुल्ला, गांदेरबाल, पुलवामा, बडगाम जिल्ह्यांतील नागरिक त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत," असा व्हीडिओ जम्म-काश्मीरमधील पोलीस अधिकारी इम्तियाज हुसेन यांनी ट्वीट केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"काश्मीरमधील स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. नागरिकांचाही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, J&K Police / Twitter
"नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काश्मीरमध्ये गेल्या 6 दिवसात गोळीबाराच्या घटना घडलेल्या नाहीत," असं पत्रक जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी जारी केलं आहे.

फोटो स्रोत, J&K Government
ईदची तयारी
ईदचा सण काही दिवसांवर आला आहे. ईद-उल-अजहा असं त्याचं नाव आहे. यात कुर्बानी हा विधी असतो.
लोकांनी या सणासाठी अनेक बकऱ्या आणि बोकड लोकांनी तयार ठेवले आहेत. आता बोकड खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








