Exit Poll: नरेंद्र मोदींच्या NDAला मिळू शकतं बहुमत, एक्झिट पोल्सचा अंदाज

देशातल्या सर्व महत्त्वाच्या संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यानुसार जवळपास सर्वच संस्थांनी भाजपप्रणित NDAची सरशी होईल असं भाकित वर्तवलं आहे.
2014 मध्ये मात्र भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या आणि NDAला 336 जागा मिळल्या होत्या. यावेळी NDAला तेवढ्या जागा मिळू शकतील, असा अंदाज फक्त अॅक्सिस या संस्थेने इंडिया टुडेसाठी केलेल्या सर्व्हेत व्यक्त केला आहे. NDAला 339-365 जागा मिळू शकतील, असा अंदाज अॅक्सिसने व्यक्त केला आहे.
न्यूज एक्स आणि एबीपीनं त्यांच्या सर्व्हेत NDAला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असं भाकित वर्तवलं आहे. न्यूज एक्सनं एनडीएला 242 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर एबीपीनं 267 जागा NDAला मिळतील असं भाकित वर्तवलं आहे. या दोन्ही वृत्तवाहिन्यांच्या सर्व्हेनुसार NDAला सत्ता स्थापनेसाठी 15 ते 30 जाग कमी पडू शकतात.
सर्व एक्झिट पोल्सचं सखोल विश्लेषण तुम्ही इथं पाहू शकता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
महाराष्ट्रात पुन्हा युतीची सरशी होण्याची शक्यता
महाराष्ट्रातल्या आकड्यांवर एक नजर टाकली तर भाजप आणि शिवसेनेला मिळून 34 जागा मिळतील असं बऱ्यापैकी सर्वच संस्थांना वाटत आहे.
एबीपी-नील्सनच्या सर्व्हेनुसार भाजपला आणि शिवसेनेला 17 तर काँग्रेसला 4, राष्ट्रवादीला 9 तर इतरांना एक जागा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
तसंच साम सकाळच्या भाकितानुसार भाजपला 19, शिवसेनेला 10, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 8 तसंच इतर पक्षांना 3 जागा मिळतील.
सकाळच्याच सर्वेक्षणातील ज्या 3 जागा इतर पक्षांसाठी दाखवण्यात आल्या आहेत, त्या वंचित बहुजन आघाडी किंवा नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला जातात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

यूपीमध्ये भाजपच्या जागा कमी
उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा मात्र यंदा कमी होतील असं सर्वच संस्थांच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. 2014 मध्ये भाजपला 71 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र हा आकडा 60 पुढे जाताना दिसत नाही आहे. एबीपी नेल्सनच्या सर्व्हेत तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 22 जागा मिळतील असी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यूपीमध्ये भाजपनं अपना दल आणि निषाद पार्टी सारख्या छोट्या पक्षांना बरोबर घेतलं आहे.
बसप, सपा आणि राष्ट्रीय लोकदलानं केलेली महाआघाडी मात्र यंदा यूपीत भाव खाऊन जाईल असं चित्र एक्झिट पोलच्या आकड्यांवरून दिसत आहे.

एक्झिट पोलवर विश्वास नाही - ममता बँनर्जी
बंगालच्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून एक्झिट पोलवर त्यांचा विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या एक्झिट पोलची चर्चा करून त्यांचा ईव्हीएममध्ये छेडछाड किंवा त्या बदलण्याचा प्लॅन आहे, अशावेळी विरोधीपक्षांनी एकत्र राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला तोटा होताना दिसून येत आहे. 2014 मध्ये त्यांच्या पक्षाला इथं 42 पैकी 34 जागा मिळाल्या होत्या, पण यंदा मात्र 25च्या आसपास जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे.
भाजपची मात्र पश्चिम बंगालमध्ये सरशी होताना सर्वच सर्वेक्षणातून दिसून येत आहे. 2 वरून भाजप इथं किमान 10 जागांपर्यत मजल मारू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर काँग्रेसला 2 जागांवर तोटा होऊ शकतो जवळपास सर्वंच सर्व्हेंमध्ये काँग्रेसला 2 जागा मिळू शकतील असं सांगण्यात येत आहे. काँग्रेसला बंगालमध्ये गेल्यावेळी 4 जागा मिळाल्या होत्या.

मध्य प्रदेश
एबीपी आणि नेल्सन यांच्यानुसार मध्य प्रदेशात 29 जागांपैकी 24 जागा भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचं अनुमान आहे.
कर्नाटक
टाईम्स नाऊ-व्हीएमआरनुसार कर्नाटकमध्ये एनडीएला 21 तर काँग्रेसला 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. माय-एक्सिसनुसार भाजपला 23 तर यूपीएला 4 तर अन्य पक्षांना एक जागा मिळू शकते. न्यूज नेशनच्या मते एनडीएला 18 तर यूपीएला 10 जागा मिळू शकतात. चाणक्यच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला 23 तर यूपीएला 5 जागा मिळू शकतात. इप्सासनुसार एनडीएला 22 तर यूपीएला 6 जागा मिळू शकतात.
गुजरात
एबीपी-नेल्सननुसार गुजरातमध्ये 26 जागांपैकी 24 भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसला 2 जागा मिळू शकतात.
उत्तराखंड
एबीपी-नेल्सननुसार उत्तराखंडमध्ये भाजपला 4 तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळू शकतो.
दिल्ली
इंडिया टुडे-एक्सिसनुसार दिल्लीत 7 जागांवर भाजपला 6 जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिहार
टाइम्स नाऊ-व्हीएमआरनुसार एनडीएला 30 तर यूपीएला 10 जागा मिळू शकतात. जन की बातच्या मते एनडीएला 29 तर यूपीएला 10 जागांवर विजय मिळू शकतो. सी व्होटरनुसार एनडीएला 33 तर यूपीएला 7 जागा मिळू शकतात.
राहुल गांधींची टीका
एक्झिट पोल येण्याच्या काही मिनिटंआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. निवडणूक आयोगानं मोदींच्यासमोर लोटांगण घातल्याची टीका त्यांनी केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
कसा करतात एक्झिट पोल?
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे संचालक संजय कुमार सांगतात, "कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅंपल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो. ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते, जेवढी राज्यात असते."
"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो."

फोटो स्रोत, Getty Images
"या सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅंपलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते."
पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.
यावर ते सांगतात, "भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही."
"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते."
एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का?
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'द वर्डिक्ट…डिकोडिंग इंडियाज इलेक्शन' या पुस्तकात मिळतं.
या पुस्तकात 1980 ते 2018दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत.
त्यात ते लिहितात, "एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे."
त्यामुळे अगदी तंतोतंत नाही पण एक्झिट पोलमुळे आपल्याला राजकीय परिस्थितीचा अंदाज समजतो.
एक्झिट पोल महत्त्वाचे का?
निकडणुकीचे निकाल सांगणं आणि प्रेक्षकांची उत्सुकता भागवणं इतकंच एक्झिट पोलचं काम नसतं. Cvoters चे संस्थापक यशवंत देशमुख सांगतात, "कोणता पक्ष पुढे आणि कोणता मागे, हे सांगणं एक्झिट पोलचं पहिलं काम असतं. दुसरं म्हणजे प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर तो निकाल एक्झिट पोलशी कम्पेअर केला जातो, यातून मग डेमोग्राफिक्स कळतं. म्हणजे महिलांनी कुणाला मत दिलं, शेतकरी किंवा तरुणांनी कुणाला मत दिलं.
"कारण निवडणूक आयोग कोण जिंकेल किंवा हारेल, एवढचं सांगतं, पण कुणी कुणाला मत दिलं, हे एक्झिट पोलच सांगू शकतात."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








