'मोदी फूट पाडणारे नेते' या टाइमच्या लेखावरून इंटरनेटवर पडली फूट

फोटो स्रोत, Time cover screen grab
'टाइम' या प्रसिद्ध नियतकालिकाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकले आहेत. या लेखात त्यांना 'डिव्हायडर इन चीफ' म्हणजेच फूट पाडणारे नेते असं म्हटलं आहे. या लेखानंतर इंटरनेटवर मोदींच्या बाजूने आणि विरोधात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
2012 साली तत्कालीन गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाइम मॅगजीनच्या कव्हरवर झळकले होते. तेव्हा कव्हर स्टोरी होती 'मोदी मिन्स बिजनेस, बट कॅन ही लीड इंडिया.'
मोदी हे उद्यमशील आहेत पण ते भारताचं नेतृत्व करू शकतात का असा प्रश्न टाइम मॅगजीनने विचारला होता. 2015 मध्ये ते परत टाइम मॅगजीनवर झळकले. तेव्हा शीर्षक होतं. 'व्हाय मोदी मॅटर्स... कॅन ही डिलिव्हर' म्हणजे मोदी हे महत्त्वाचे आहेत पण ते वचनपूर्ती करतील का असा प्रश्न त्यावेळी विचारण्यात आला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
4 वर्षानंतर आता पुन्हा एकदा मोदी हे टाइम मॅगजीनच्या कव्हरवर झळकले आहेत. त्यांना यावेळी इंडियाज डिव्हायडर इन चीफ म्हणजे समाजात तेढ वाढवणाऱ्यांचे प्रमुख असं म्हटलं आहे. त्यांच्या या प्रतिमेत इतका बदल कसा झाला? असा प्रश्न ट्विटरवर विचारला जात आहे.
2014 साली मोदी हे लोकांच्या अपेक्षांचं प्रतीक होते पण आता ते असे राजकीय नेते आहेत जे आपली वचनं पाळू शकले नाहीत आणि दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत असं टाइम मॅगजीनने म्हटलं आहे.
या लेखातील भूमिकेशी साधर्म्य साधणारी प्रतिक्रिया युट्यूबर ध्रुव राठींनी दिली आहे.
राठींना वाटतं की पाच वर्षांपूर्वी मोदी हे भारतीयांचं आशास्थान होते पण आता ते लोकांमध्ये फूट पाडणारे बनले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
युवा काँग्रेसने देखील टाइम मॅगजीनच्या कव्हरवर प्रतिक्रिया दिली आहे. मोदींना अगदी समर्पक विशेषण लावल्याचं युवा काँग्रेसचं म्हणणं आहे. महिला काँग्रेसने देखील ही टाइम मॅगजीनची लिंक शेअर केली आहे.
हा लेख ज्या पत्रकाराने लिहिला आहे ते आतिश तासीर हे पाकिस्तानचे आहेत असं म्हटलं आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराकडून आणखी काय अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर कव्हर स्टोरी केली होती. टाइम मॅगजीनने मनमोहन सिंग यांना द अंडर अॅचिव्हर म्हटल्याची आठवणही काही जणांनी काढली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
याच मॅगजीनच्या कव्हरवर मोदींवर दुसरा लेख लिहिण्यात आल्याचं म्हटलं आहे. इयान ब्रेमर यांनी लिहिलेल्या लेखाचं शीर्षक आहे 'मोदी द रिफॉर्मर' पण या लेखाकडे दुर्लक्ष झाल्याचं देखील काही लोक म्हणत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
बीबीसी मराठीने टाइम मॅगजीनच्या मुखपृष्ठकथेबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या.

फोटो स्रोत, Facebook
त्यात विजय हटनकर यांनी म्हटलं आहे की आतिश तासीर हे पाकिस्तानी आहेत त्यामुळे ते मोदीविरोधी आहेत. इयान ब्रेमर हे जगप्रसिद्ध विश्लेषक आहेत त्यांनी मोदींची स्तुती केल्याचं हटनकर यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, facebook
गिरीश फोंडे हे वाचक म्हणतात की लेख कुणी लिहिला याला फारसं महत्त्व नाही तर टाइम मॅगजीनमध्ये तो छापून आला आहे याला महत्त्व आहे. नियतकालिकाची विश्वसनीयता अधिक असल्याचं ते सांगतात.

फोटो स्रोत, Facebook
टाइमच्या या लेखामुळे इंटरनेट मोदी विरोधक आणि मोदी समर्थक अशा दोन गटांत विभागलं गेलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)