लोकसभा 2019 : राहुल गांधींची मोठी घोषणा, गरिबांना दरवर्षी 72 हजार देणार

राहुल गांधी

फोटो स्रोत, Reuters

सत्तेमध्ये आलो तर गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणार असल्याचं वचन राहुल गांधी यांनी दिलं आहे. देशातल्या 20 टक्के गरिब कुटुंबांना याचा लाभ दला जाईल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

ही योजना राहुल गांधींची गरिबांना वर्षाला 72 हजार देण्याची योजना खरंच गरिबी हटवू शकेल? अर्थतज्ज्ञांना याबाबत काय वाटतं, याचा आढावा तुम्ही इथे वाचू शकता.

महत्त्वाचे मुद्दे

  • 25 कोटी लोकांची गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करू
  • ज्या लोकांचे दरमहा उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना दरवर्षी 72 हजार रूपयांची मदत मिळणार
  • देशातील 5 कोटी कुटुंबांना फायदा होणार
  • मला महात्मा व्हायचं नाही. मला गरीबांना सन्मान मिळवून द्यायचा आहे.
  • आम्हाला सन्मान या देशात सन्मान मिळतो असं गरिबांना वाटेल अशी परिस्थिती निर्माण करायची आहे.

काँग्रेसनं यंदा सत्तेत आलो तर गरिबांसाठी The minimum income guarantee scheme म्हणजेच 'किमान उत्पन्न हमी योजना' आणू असं वचन दिलं आहे.

गरिबांचं उत्पन्न जर दरमहा 12 हजारांच्या खाली असेल तर ते 12 हजारांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू असं, राहुल गांधी यांनी म्हटलंय.

त्यासाठी साधारण 72 हजार रुपये मदत दिली जाईल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)